मागून मागून थकलेली माणसं आली कोणी ,
उतरले तोंड डोळा सुटलेले पाणी
ला ला ला ला , ला ..ला ला
गेलेच आहेत पैसे आता खिशात काही नाही
पैसे कुणा मागू आता मला कोण देई
बडबडत बसतो सारखा गेले पैसे पाण्यात
व्याज गेले माझे तरी मुद्दल द्या हातात
सांगायची आहे माझ्या शहाण्या मुला
नाडलेल्या लोकांची ही कहाणी तुला .....
ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला.... ||2||
आट-पाट नगरात वेडे होते फार
एकाकडे पैसे मागता काढून देती चार ||2||
रोज सकाळीस टोपीवाला टोपी सर्वा घाले ,
नवी टोपी लावायचे काल राहुनिया गेले
जमलेच नाही तुम्हा पैसे देणे जरी
आज परी काढणार तुमच्या खिशातून तरी
बातांच्या त्या गावामध्ये मारू मग फेरी
खरया खुऱ्या माणसांसाठी गोष्टीतली तुरी
बसवीन मी सगळ्यांना टेम्पोत चला
नाडलेल्या लोकांची ही कहाणी तुला ....
ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला.... ||2||
ऑफिसात उशिरा मिपावरी असायचो बसून
भंडावले डोके जाई व्यनी याचनेत द्रवून
एक एक पैसा गेला कधी कळेना निघून
एक एक क्षण जाई टोप्या त्या लावून
अशावेळी काही सांगू काय काय वाटे
भाकड कथांसोबत पाणी डोळ्यातून दाटे
वाटते कि उठूनिया तयापाशी जावे
त्याच्यासाठी मी मात्र कर्ण तो व्हावे
त्याने मागावे आणि मी द्यावे हातासरशी
आर्त त्याचे शब्दखेळ भिडावे मनाशी
दात विचकत तो बोले सर्वा काही
ऐकताना सारासार विचार उरणार नाही ||2||
मनापासून सल्ले द्यायचे लोक काही
लक्ष त्यांच्या बोलण्याकडे दिले कधी नाही
टोपीवाला सगळ्या जणा गंडा घाले कसा
क्षणा क्षणा आता ढाळतो अश्रू हा असा
सांगायची आहे माझ्या शहाण्या मुला
नाडलेल्या लोकांची ही कहाणी तुला .....
ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला.... ||2||
लुटलेले पैसे घेऊन टोपीवाला जाई
नवीन नवीन शेंड्या लोका लावीत येई
गोष्ट ऐकायला टाळकी जमायची कशी
मस्तकातला मेंदू मग गोठून बशी
तोच मेंदू सांगत आहे ऐक गाढवा काही
मी जरी पडलो खड्ड्यात तू पडायचे नाही
पोटापुरता पैसा अडका मिळतो ना तुला
दुपटीची हाव कधी धरू नकोस मुला ||2||
कितीतरी पैसे गेले देणाराच पण खुळा
अजूनही एकांतात मी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायची आहे माझ्या शहाण्या मुला
नाडलेल्या लोकांची ही कहाणी तुला ....
ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला.... ।।२।।
मनाला ह्या भिडलेली टोपीची पहिली गोष्ट फार
आणि लगेचच देऊन टाकले वीस तीस हजार
परत मिळण्यासाठी तेच सगळे म्हणती थांबा
तरी पण देत गेलो जसा धबधबा
लुटू -लुटू उभा राहत त्याने टाकलं पाउल पहिलं
दूरचंच पाहत राहिलो फक्त , जवळचं नाही दिसलं
आता गेलो आहे बाळा पुरा मी अडकून
हल्ली कोणी मदत मागता पाहतो दुरून ||2||
अश्या कश्या टोप्या तो सगळ्यांना लावतो
काहीही सांगतो आणि पैसे घेऊन खातो
शहाणपण ठेवले होते बासनात गुंडाळून
उरले काही नाही आता माझ्या बॅंकेमधून
जरी येती ओठी शिव्या त्याच्यासाठी तसे
नजरेत त्याच्या काही लवलेश नसे
ह्या जगातून माणुसकी हरवली का रे ?
मदत करणाऱ्या माणसा वेडा ठरवती सारे ? ||2||
खरी मदत मागायला कोणी येई दारामध्ये
त्याच्यासाठी जाईल का हात खिश्यामध्ये ?....
ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला.... ।।२।।
ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला.... ।।२।।
प्रतिक्रिया
30 Apr 2016 - 9:19 pm | टवाळ कार्टा
मी पयला
आणि खि खि खि
30 Apr 2016 - 9:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मी दुसरा....ख्या ख्या ख्या....एका नुतन चिट फंड मालकाची आठवण येउन ड्वॉळे पाणावले =))
30 Apr 2016 - 9:23 pm | माम्लेदारचा पन्खा
आसुसून मिपावर् यावसं वाटलं त्यामुळे.........
30 Apr 2016 - 9:23 pm | टवाळ कार्टा
तुजी पेर्ना वायली, चिमण्या म्हणतोय ते वायले =))
30 Apr 2016 - 9:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ते वायले नव्हेत ते आपणचं मालक. =))
30 Apr 2016 - 10:24 pm | टवाळ कार्टा
मला वाटतेय त्यांची पेर्णा वेगळी आहे
30 Apr 2016 - 10:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
टका चिट फंडाबद्दल बोल्तोय बे मी.
30 Apr 2016 - 9:25 pm | जेपी
शिर्षका वरुन गंभीर वाटली पण..
=))=))=))=))
30 Apr 2016 - 9:32 pm | कानडाऊ योगेशु
पार बाजार उठवला.!
बाकी त्या तो मल्ल्या मला ६५०० ची शेंडी लावुन पळाला दूरदेशी!
30 Apr 2016 - 9:48 pm | प्रचेतस
गंभीरच प्रकार दिसतोय राव. सावध करा भो.
30 Apr 2016 - 10:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज़रा स्पष्ट सांगता का ?
-दिलीप बिरुटे
30 Apr 2016 - 10:41 pm | खटपट्या
सावकाशीने वाचतो. लय मोठी हाय कविथा...
30 Apr 2016 - 10:53 pm | आदिजोशी
मल्ल्या निदान युके मधे आहे हे माहिती तरी आहे, इथे तर ठावठिकाण्याचीही बोंब.
पुलंनी लिहील्यावर जसं आपल्याच मनातलं लिहिले असं लोकांना वाटायचं, तसंच ही कविता वाचून शे दोनशे मिपाकरांना वाटेल ह्यात शंका नाही.
असो. रात गई बात गई असं म्हणुन पुढे जायचं. किसका मिला है जो तेरा मिलेगा.
30 Apr 2016 - 10:56 pm | टवाळ कार्टा
शे-दोनशे?????
30 Apr 2016 - 11:16 pm | आदिजोशी
हजार पाचशे का?
1 May 2016 - 4:42 am | वैभव जाधव
विषय जुना आहे का नवा काही किस्सा आहे?
30 Apr 2016 - 10:58 pm | मितभाषी
मलाही फोन आला होता. कानाकानसुळावरून गेलं. थोडक्यात बचावलो.
30 Apr 2016 - 11:51 pm | मुक्त विहारि
खरी मदत मागायला कोणी येई दारामध्ये
त्याच्यासाठी जाईल का हात खिश्यामध्ये ?
=========================================
अजिबात जात नाही...
दूधाने तोंड पोळले की मांजर पण सुधारते.....
असो,
==
===
1 May 2016 - 6:34 am | अत्रुप्त आत्मा
क्या हुवा मा. प? .
1 May 2016 - 6:51 am | चांदणे संदीप
कुछ तो गडबड है दया! तोडदो... नाही... असूदे!
मस्त विडंबन! यामागची पेर्णा काकू मध्ये घ्या आता! :)
Sandy
1 May 2016 - 9:21 am | माझीही शॅम्पेन
खिक्क
:) कुच तो लोग कहेन्गे
1 May 2016 - 9:38 am | स्पा
जेन की हिंदु धर्म हो?=))
1 May 2016 - 10:13 am | कपिलमुनी
या कवितेला मल्याशी जोडणे मंजे काखेत कळसा न् गावाला वळसा !
1 May 2016 - 10:16 am | मितभाषी
हाहाहा सही बोल रैला