तिथली दिवाळी.....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
9 Nov 2015 - 7:18 pm

तिथली दिवाळी.....

तीरकामठा रंगीत कागद
चिखलमाती अर्धा किल्ला....
शिवाजीच्या मावळ्यांहाती,
परत फराळ ठेवशील का?

पहाट झोपेत हळूच उठवून
घमघमणारी आंघोळ घालून,
फुलबाजांची हजार फुले
परत हातात ठेवशील का?

रांगोळीतील हुकले ठिपके
रेषांमधील नाजूक वळणे,
तुळशीमाईचे लगीन लटके
परत दणक्यात लावशील का?

किणकिण बांगड्या काचेच्या
घिरघीर झालरी पोरींच्या!
सुरसूर बत्त्या, चुटक्या टिकल्या
परत उडवण्या येशील का?

तिथली दिवाळी धमाल मजा
इथली दिवाळी शांत सजा!!
आठवणींचे व्याकुळ दिवे
परत घरी पोचतील का?

कविता माझीभावकविताविराणीसांत्वनाकरुणसंस्कृतीकवितासाहित्यिकसमाजजीवनमानदेशांतर

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

9 Nov 2015 - 7:50 pm | एक एकटा एकटाच

मस्त

आवडली

रेवती's picture

9 Nov 2015 - 7:53 pm | रेवती

कविता आवडली.

मधुरा देशपांडे's picture

9 Nov 2015 - 8:07 pm | मधुरा देशपांडे

आवडली.

मांत्रिक's picture

9 Nov 2015 - 9:16 pm | मांत्रिक

सुंदर अनुभव असतात तुमच्या कविता!!!
अगदी हृदयाला स्पर्श करुन गेली ही कविता सुद्धा...
अजून जास्त बोलणे म्हणजे कवितेचा अपमान करणे...
त्यापेक्षा परत परत वाचत बसतो. तो आनंद जास्त मोठा आहे...

मांत्रिक's picture

9 Nov 2015 - 9:20 pm | मांत्रिक

चिखलमाती अर्धा किल्ला....
शिवाजीच्या मावळ्यांहाती,
परत फराळ ठेवशील का

नकळत लहानपणची आठवण झाली आणि डोळे पाणावले. तो निरागस आनंद कुठेतरी खूप मागे सोडून आलोय...
ते चिखलाने बरबटलेले हात, आईच्या शिव्या, पाळलेल्या कुत्राचं तिथं लुडबुडणं, मित्रांचा दंगा, चिखलावर टाकलेला अळिवाचा सडा, सलाईनचं कारंज सगळं सगळं कुठेतरी हरवून गेलं.
या मिशा पुन्हा काही तो आनंद मिळू द्यायच्या नाहीत...