मैत्र झुलवून बघ

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
5 Aug 2015 - 12:55 am

मैत्र झुलवून बघ

चेहऱ्यावरती खिळू नकोस
आत उतरून बघ
अंतरीच्या झोपाळ्यावर
मैत्र झुलवून बघ

नितळलेल्या तळावरती
विश्वासाचे घर
हाय, हॅलो जाऊ देत
हात घट्ट धर

शर्थ, अटी काही नकोत
खुले-खुले सांग
तेव्हा तुला कळेल माझ्या
हृदयाचा थांग

दिसतो तसा नाही मी
कठोर आणि क्रूर
काळिजाच्या सप्तकाला
अवरोहाचे सूर

देत बसत नाही मित्रा
पुन्हा पुन्हा ग्वाही
पण तू जसा समजतोस
मी तसा नाही

मोजत बसू नकोस मित्रा
स्पंदनाची धग
डोळे मिटून खांद्यावरती
मान ठेवून बघ

चिंता नकोस करू मित्रा
'अभय'तेने तेव
वादळासंगे लढेन मी
इतका विश्वास ठेव

               - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अभय-काव्यभावकवितावाङ्मयशेतीकविता

प्रतिक्रिया

छान जमलीय!
शर्थ, अटी काही नकोत
खुले-खुले सांग

इथे अटी शर्थी काही नकोत असं पाहिजे होतं. म्हणजे लय कायम राहील.

गंगाधर मुटे's picture

6 Aug 2015 - 3:49 pm | गंगाधर मुटे

नोंद घेतलीय. बदल करतोय
अटी-शर्ती काही नकोत, असे करतोय

धन्यवाद!

खेडूत's picture

5 Aug 2015 - 9:20 am | खेडूत

मस्तच!
कविता आवडली .

प्रयत्नांची शर्थ असते . इथे अटी ता अर्थाने शर्ती हवे !

गंगाधर मुटे's picture

6 Aug 2015 - 3:50 pm | गंगाधर मुटे

नोंद घेतलीय. बदल करतोय
अटी-शर्ती काही नकोत, असे करतोय

धन्यवाद!

प्रचेतस's picture

5 Aug 2015 - 9:51 am | प्रचेतस

छान.
आवडली कविता.

गंगाधर मुटे's picture

6 Aug 2015 - 3:51 pm | गंगाधर मुटे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

नाव आडनाव's picture

5 Aug 2015 - 9:53 am | नाव आडनाव

आवडली.

गंगाधर मुटे's picture

6 Aug 2015 - 3:51 pm | गंगाधर मुटे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

गंगाधर मुटे's picture

7 Aug 2016 - 1:14 pm | गंगाधर मुटे

ज्यांना-ज्यांना मी मित्रासारखा दिसतो

जे-जे मला जीवाभावाने मित्र समजतात.....
त्या सर्व माझ्या मित्र-मैत्रिणींना......
ऋणानुबंधाच्या
मुसळधार पावसासारख्या
ओल्यागच्च हिरव्यागार शुभेच्छा ......!!

- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

ईश्वरसर्वसाक्षी's picture

7 Aug 2016 - 2:01 pm | ईश्वरसर्वसाक्षी

असे का म्हणताय सर, अहो मैत्रि म्हटलि कि थोडेसे मतभेद कधि कधि असायचेच. ईथे सगळेच तुम्हाला मित्र समजतात.

अभिजीत अवलिया's picture

7 Aug 2016 - 5:56 pm | अभिजीत अवलिया

आवडली कविता.

थोडे प्रवचन -
'ज्यांना-ज्यांना मी मित्रासारखा दिसतो

जे-जे मला जीवाभावाने मित्र समजतात.....'

- कितीही होऊ नये असे म्हटले तरी मिपावर थोडेफार वाद होतात लोकांचे. जरी वाद झाला तरी ते लगेच विसरून जावे हे उत्तम. जर जुन्या वादांच्या स्मृती सतत मनात ठेवलात तर विनाकारण मानसिक शांतता निघून जाईल आणी सतत स्कोर सेटलिंग ची संधी शोधत बसाल. कोणतीही व्यक्ती (स्वतःस धरून )100% 'सद्गुणी' नसते हे मान्य केले की एकूणच जीवन सुसह्य होते.

प्रवचन समाप्त.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Aug 2016 - 6:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मैत्री दिनाच्या सर्व अबाल वृद्ध मिपाकरांना माझ्या शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

जावई's picture

7 Aug 2016 - 6:54 pm | जावई

काका....एक नंबर

चांदणे संदीप's picture

7 Aug 2016 - 8:39 pm | चांदणे संदीप

तरी म्हणायचत! ;)

मुटेसर कविता शॉल्लेट!

Sandy

पेशवा भट's picture

8 Aug 2016 - 12:21 pm | पेशवा भट

छान आहे.

मोजत बसू नकोस मित्रा
स्पंदनाची धग
डोळे मिटून खांद्यावरती
मान ठेवून बघ

हे जास्त आवडले.

अभ्या..'s picture

8 Aug 2016 - 12:23 pm | अभ्या..

अहाहा, मस्त कविता मुटेसर. आवडली

मितभाषी's picture

8 Aug 2016 - 9:22 pm | मितभाषी

लै भारी.