मैत्र झुलवून बघ
लेखनविषय:
काव्यरस
मैत्र झुलवून बघ
चेहऱ्यावरती खिळू नकोस
आत उतरून बघ
अंतरीच्या झोपाळ्यावर
मैत्र झुलवून बघ
नितळलेल्या तळावरती
विश्वासाचे घर
हाय, हॅलो जाऊ देत
हात घट्ट धर
शर्थ, अटी काही नकोत
खुले-खुले सांग
तेव्हा तुला कळेल माझ्या
हृदयाचा थांग
दिसतो तसा नाही मी
कठोर आणि क्रूर
काळिजाच्या सप्तकाला
अवरोहाचे सूर
देत बसत नाही मित्रा
पुन्हा पुन्हा ग्वाही
पण तू जसा समजतोस
मी तसा नाही
मोजत बसू नकोस मित्रा
स्पंदनाची धग
डोळे मिटून खांद्यावरती
मान ठेवून बघ
चिंता नकोस करू मित्रा
'अभय'तेने तेव
वादळासंगे लढेन मी
इतका विश्वास ठेव
- गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चेहऱ्यावरती खिळू नकोस
आत उतरून बघ
अंतरीच्या झोपाळ्यावर
मैत्र झुलवून बघ
नितळलेल्या तळावरती
विश्वासाचे घर
हाय, हॅलो जाऊ देत
हात घट्ट धर
शर्थ, अटी काही नकोत
खुले-खुले सांग
तेव्हा तुला कळेल माझ्या
हृदयाचा थांग
दिसतो तसा नाही मी
कठोर आणि क्रूर
काळिजाच्या सप्तकाला
अवरोहाचे सूर
देत बसत नाही मित्रा
पुन्हा पुन्हा ग्वाही
पण तू जसा समजतोस
मी तसा नाही
मोजत बसू नकोस मित्रा
स्पंदनाची धग
डोळे मिटून खांद्यावरती
मान ठेवून बघ
चिंता नकोस करू मित्रा
'अभय'तेने तेव
वादळासंगे लढेन मी
इतका विश्वास ठेव
- गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाचने
4340
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
छान जमलीय! शर्थ, अटी काही
In reply to छान जमलीय! शर्थ, अटी काही by जडभरत
धन्यवाद
मस्तच!
In reply to मस्तच! by खेडूत
धन्यवाद!
छान. आवडली कविता.
In reply to छान. आवडली कविता. by प्रचेतस
धन्यवाद
आवडली.
In reply to आवडली. by नाव आडनाव
धन्यवाद
ज्यांना-ज्यांना मी
जे-जे मला जीवाभावाने मित्र समजतात.....
आवडली कविता.
In reply to आवडली कविता. by अभिजीत अवलिया
प्रवचनाशी सहमत.
काका....एक नंबर
In reply to काका....एक नंबर by जावई
मामा
छान आहे.
अहाहा, मस्त कविता मुटेसर.
काका