एकांत

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
29 Aug 2015 - 5:32 pm

कोणते हे फूल, वा
काय त्याचे नाव?
विचारतो ना सांगतो
तो स्वतः शी बोलतो!

कळी आज लाजते
फूल उद्याला हासते
पाहतो! ना बोलतो,
तो स्वतः शी हासतो!

रंग हिचा केशरी
गर्द तिचा सोनेरी
स्पर्शतो ना तोडतो
तो स्वतःशी रंगतो!

...... .....
फूल त्याच्या अंतरीचे
किती कसे कळलावे?
डोलते ना थांबते
वाऱ्यातून हुरहुरते!

भावकविताकविताप्रवास

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

29 Aug 2015 - 6:58 pm | जव्हेरगंज

मनमोहनसिंगावरची कविता आवडली....:)

पैसा's picture

29 Aug 2015 - 9:59 pm | पैसा

छान आहे कविता!

मांत्रिक's picture

29 Aug 2015 - 10:17 pm | मांत्रिक

सुंदर आहे कविता.
अबोलीच्या छोट्याशा फुलासारखीच.
कोड्यात पण पाडणारी आणि सौंदर्याने खेचून पण घेणारी.
वार्यावर हळूच हळूच डुलणारी...

रातराणी's picture

29 Aug 2015 - 11:47 pm | रातराणी

आवडली कविता :)