ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल.
शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक.
नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच!
पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा. पण डुकरांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून त्याला आपण वराहगंधर्व म्हणूयात. कसें?
नारदमुनी म्हणाले, "नारायण, नारायण! हे वराहकुलभूषणा, इथे पृथ्वीवर काय करतोयेस?"
वराहगंधर्व: "हँ हँ, काही नाही, आपले नेहमीचेच"
नारदमुनी: "अरे पण तुझी जागा तर स्वर्गात आहे."
वराहगंधर्व: "का? स्वर्गात काय आहे?"
नारदमुनी: "अरे स्वर्गात अमृतफळे लागणारी झाडे, दुधातुपाच्या नद्या, मधूर कूजन करणारे पक्षी आहेत."
वराहगंधर्वः "मग?"
नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर."
वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?"
नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?"
वराहगंधर्वः "छे छे, मग मी स्वर्गात येऊन काय करू. मला याच गोष्टी अतिप्रिय आहेत. मला स्वर्गात यायचे नाही. लई बिल झाले. मारा डबल आणि निघा."
असो.
आपला,
(स्वर्गवासी नारदमुनी) आजानुकर्ण
प्रतिक्रिया
15 Nov 2007 - 11:52 am | सर्किट (not verified)
कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-)
बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-)
- सर्किट
15 Nov 2007 - 12:07 pm | सहज
.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर."
वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?"
नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?"
वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का?
नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल.
वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$#
:-)
(संपूर्ण काल्पनिक)
15 Nov 2007 - 12:17 pm | आनंदयात्री
समजले हो ... अगदिच पिच्छा पुरवलाय रे बाबा !!
15 Nov 2007 - 12:12 pm | विसोबा खेचर
मुलांनो, काय गडबड सुरू आहे? :)
15 Nov 2007 - 12:15 pm | बेसनलाडू
नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा!
(मस्तीखोर)बेसनलाडू
15 Nov 2007 - 12:45 pm | मनिष
हे काय चालले आहे?
15 Nov 2007 - 12:46 pm | बेसनलाडू
न्यू ऍडमिशन दिसतोय :))
(सिनिअर)बेसनलाडू
15 Nov 2007 - 3:07 pm | प्रकाश घाटपांडे
लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत.
१) देव गंधर्व - भास्करबुवा बखले
२) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर
३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी
४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस
५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे
६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे
७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर
८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर
९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे
१०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर
वंचित गंधर्व
प्रकाश घाटपांडे
20 Sep 2012 - 4:41 pm | प्रभाकर पेठकर
'वंचित गंधर्व'
प्रकाश घाटपांडे
वंचित का म्हणून आपण 'किंचित गंधर्व' म्हणूया तुम्हाला.
17 Nov 2007 - 2:41 pm | लबाड मुलगा
जरा समजावुन सांगा
15 Nov 2007 - 11:27 pm | देवदत्त
डोंगराला आग लागली पळा पळा....
20 Sep 2012 - 4:35 pm | मन१
:)
8 Nov 2012 - 8:31 pm | ईन्टरफेल