चांदणचुरा
वाहावतो चांदणचुरा
तुझ्या उंबर्याशी
दाटतो गहिवर
मंद श्वासांशी||
चालतो अनवट वाटा
पैंजणांच्या लयीने
ऐकतो ह्रदयभाषा
नयनांच्या तीराने||
उधळतो चांदणफुले
गुंफलेल्या हातांनी
झेलतो चंद्रमरवा
गंधाळलेल्या मिठीने||
मिटते रात्र मंदफूल
गवाक्षी झुले वारा
पडते प्राजक्तभूल
रंगला चांदणचुरा||
-भक्ती