प्रेमकाव्य

म्हणूनच तर मी घोरत होते

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
17 Apr 2017 - 10:54 am

मध्यरात्री म्हणे तू कुजबूजाट केला
पण तेव्हातर मी झोपेत होते

मध्यरात्री म्हणे सळसळ थरथारायचे होते
माहितीए का पोट माझे थयथयाट करत होते

मध्यरात्री म्हणे शांतता भंगून हवी होती
म्हणूनच तर मी घोरत होते

प्रेर्ना

कविताप्रेमकाव्यअदभूतअनर्थशास्त्रजिलबीभूछत्री

एक कप तिचा....

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
16 Apr 2017 - 12:44 am

आयुष्याचा हिशोब साचा
एक कप तिचा,एक माझा!

दिसायला दोन्ही एकच
फ्लेवरंही सारखाच
फक्त चाखण्याची रित
ज... रा निराळी
म्हणूनच.. एक कप तिचा,एक माझा!

माझा आधी संपेल, तिचा नंतर
चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर..
त्यातूनच घडते जादू शेवटी
टेस्टी... लज्जतदार... सुरंगी
पण तरिही..
एक कप तिचा,एक माझा!

एकत्र असून थोडं वेगळेपण
वेगळं असूनही थोडस्सं एकत्रपण..!
तिचं सावधपण माझं अंधळेपण
जगण्यातली वागण्यातली
गोडी वाढवणारं..
त्याच कारणानी..
एक कप तिचा,एक माझा!

कविताप्रेमकाव्यमौजमजाकविता माझीमुक्त कविताशांतरस

आज तु आठवलीस...

Pradip kale's picture
Pradip kale in जे न देखे रवी...
13 Apr 2017 - 7:48 pm

आज तु आठवलीस

आज तु आठवलीस अन् डोळे अासवांनी ओघळले
कधी खंत तर कधी आनंद दोहोंमध्ये बरसत राहीले

खंत यासाठी की,
मी व्यक्त नाही झालो कधी तुझ्यापाशी
गुज करीत राहीलो स्वत:च स्वत:शी
भीती नव्हती बोलण्याची,
हो भीती नव्हतीच मुळी बोलण्याची
भीती होती ती नकाराची, आणि हो कदाचीत संस्कारांचीही

अन् आनंदाचे यासाठी की,
आठवतात ते क्षण, जेव्हा तु पहीली दिसलीस
अन् नसेल तुलाही माहीत कदाचीत, पण हे हृदय घेऊन गेलीस,
ताल बिघडले मनाचे,
हो तालचं बिघडले मनाचे
कारण तु सुरचं घेऊन गेलीस

कविताप्रेमकाव्यमुक्त कविता

कविता

फुत्कार's picture
फुत्कार in जे न देखे रवी...
7 Apr 2017 - 12:13 am

आज वाटते एक कविता अशी जन्मावी
हाताने तर नव्हेच आणि ती मी न लिहावी

तू नुकतीच नाहलेली अन ओलेती असावी
केस मोकळे, दवबिंदूंनी पापणी मिटावी
ऊन कोवळे लेऊन कांती तुझी चमकावी
आज वाटते ...

अशी पाहुनी तुला, मला अस्फूट स्फुरावी
जवळ येउनी तू माझ्या नयनी वाचावी
ह्या हृदयीची त्या हृदयी होऊन जावी
आज वाटते ...

मिठीत माझ्या दिठी तुझी ती अलगद यावी
गात्रांमधली थरथर होऊन तू प्रसवावी
ओठ टेकता तुझ्याच ओठांतून उमटावी

आज वाटते एक कविता अशी जन्मावी
हाताने तर नव्हेच आणि ती मी न लिहावी

कविताप्रेमकाव्यप्रेम कविताभावकवितारोमांचकारी.शृंगार

लाल टांगेवाला

रासपुतीन's picture
रासपुतीन in जनातलं, मनातलं
22 Mar 2017 - 12:44 pm

नमस्कार मिपाकरहो,

प्रकटनविचारसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतपाकक्रियाबालकथाप्रेमकाव्यबालगीतउखाणेव्युत्पत्तीशब्दक्रीडासामुद्रिकमौजमजाचित्रपट

"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
20 Mar 2017 - 1:04 am

"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही

तब्बल चार वर्षानंतर, पुन:लेखन करून, संवाद, लावण्या आणि प्रसंगात बदल करून, "वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

तुम्हां सर्व रसिक वाचकांना आणि लेखन करतांना हुरूप देत आपुलकीचे नाते जपणार्‍या MisalPav.com, Aisiakshare.com, MaayBoli.com येथील संचालक, सभासद यांना सविनय अर्पण.

प्रकटनविचारआस्वादसंस्कृतीनृत्यनाट्यवाङ्मयप्रेमकाव्यविनोद

कुणीतरी असावे, कवि:समाधान कदम

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
24 Feb 2017 - 9:44 am

,,,, ,,,

संबंधीत विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळे पर्यंत या धाग्यातील मजकुर वगळला आहे. तसदी बद्दल क्षमस्व.

कवि: समाधान कदम
कर्मविर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर

कर्मविर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील नवकवि समाधान कदम यांनी त्यांची कविता २२/२/२०१७ च्या मराठी विकिपीडीया कार्यशाळे दरम्याने त्यांची कविता मराठी विकिपीडियावर प्रकाशित केली होती, मराठी विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय परिघात कविता लेखन बसत नसल्यामुळे ती मराठीतून वगळली गेली. ती इथे प्रकाशित केली

मराठी विकिपीडियावर जशी आली तशी प्रकाशित केली (उत्तरदायकत्वास नकार लागू)

प्रेमकाव्य

मला ती आवडायची...... - कवि: राजू पवार

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
24 Feb 2017 - 9:40 am

,,,, ,,,

संबंधीत विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळे पर्यंत या धाग्यातील मजकुर वगळला आहे. तसदी बद्दल क्षमस्व.

कवि: राजू पवार
विद्यार्थी, कर्मविर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर

कर्मविर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील विद्यार्थी नवकवि राजू पवार यांनी त्यांची कविता २२/२/२०१७ च्या मराठी विकिपीडीया कार्यशाळे दरम्याने त्यांची कविता मराठी विकिपीडियावर प्रकाशित केली होती, मराठी विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय परिघात कविता लेखन बसत नसल्यामुळे ती मराठीतून वगळली गेली. ती इथे प्रकाशित केली

मराठी विकिपीडियावर जशी आली तशी प्रकाशित केली (उत्तरदायकत्वास नकार लागू)

प्रेमकाव्य

प्रेम

पराग देशमुख's picture
पराग देशमुख in जे न देखे रवी...
14 Feb 2017 - 12:08 pm

प्रेम म्हणजे साला ,
अंधार झालाय अंधार .
अब्रू वेशींवर टांगलेली नि,
भावनांचा चाललेला व्यापार .

नजर वखवखणारी असूनही येथे,
कोवळ्या कळ्यांना धुमारे फुटू लागतात.
अन प्रेमाचा पाऊस पडला तरी कुजण्याइतकी,
नात्यांची बीजे भिकार असतात.

संस्कृतीकविताप्रेमकाव्यशब्दक्रीडाकविता माझी

१०० नंबरी प्रेम

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जे न देखे रवी...
14 Feb 2017 - 10:47 am

---------------------------------------------
बायकांच्या बडबडीने जेव्हा
इच अँड एव्हरीजण कंटाळला
'रोज शंभरच शब्द बोलायचे'
सरकारने नियम काढला

मला फारसा त्रास नव्हता
नेहमीच मी कमी बोलायचो
गप्पा,भांडण,उपदेश
मोजक्या शब्दांत मांडायचो

नियम लागू व्हायच्या थोडं आधी
मला भलताच नाद लागला
एका गोग्गोड बडबड्या पोरीवर
नकळंत जीव जडला

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तिला
प्रपोज करायचं ठरवलं
शंभर शब्द काय बोलायचे
गणित मांडायला घेतलं

कविताप्रेमकाव्यभाषाशब्दक्रीडाप्रेम कविताहास्य