प्रेमकाव्य

सजणूक दे फुलोर्‍याची

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
19 Dec 2021 - 10:23 am

वेड असो वा प्रिती
वसंतात मने जुळती
पण, प्रणय उचंबळून येता
हा दोष कुणाचा साथी?

हरखुन सळसळणारे
हास्य आपुल्या गाली
अलवार सांगते तेव्हा
संगित नाचते ताली

नवनीत क्षण सरण्यापूर्वी
पाकळी पाकळी मखमली
रूतलेल्या हुंकारांना
अंधारात सुलगव खुशाली

खुलती सुगंध कायेचे
कोवळी फुले सु'मनाची
स्वप्नांचे पंख पांखरुनी
सजणूक दे फुलोर्‍याची

* येथून सु'डंबण प्रेर्ना

गुलमोहर मोहरतो तेव्हाप्रेम कविताफुलपाखरूभूछत्रीमुक्त कवितारतीबाच्या कवितालाल कानशीलविडम्बनशृंगारस्पर्शशांतरसप्रेमकाव्य

(स्वप्ना, जागृती, सीमा)

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जे न देखे रवी...
18 Dec 2021 - 8:58 pm

स्वप्ना, जागृती, सीमा
आल्या तिघीही घरी
कुणास घेवु कवेत
अन कुणास ठेऊ दुरी?

सीमेसोबत जरा लोळलो
कामज्वराच्या धगीं पोळलो
स्वप्ना, जागुस शेजेघेऊनी
षड्-मोहघटांसवे खेळलो

(स्वसंपादित)
(अतिशृंगारिक कडवी स्वसंपादित)
(स्वसंपादित)

आवेगाचे वेग अनावर
असे गळुनी पडताना
एकांमेकीं विरुनी जाऊ
द्वैत आपुले विस्मरताना

- शृंगार्_रात्रीं

अदभूतआयुष्यकॉकटेल रेसिपीचाटूगिरीरोमांचकारी.शृंगारस्पर्शप्रेमकाव्यमौजमजा

कोळीगीतः समींदरा, जपून आण माझ्या घरधन्याला

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
18 Dec 2021 - 2:09 am

समींदरा रे समींदरा,
तू जपून आण माझ्या घरधन्याला
लई दिवसांन परतून येईल घराला ||धृ||

नको उधाण आणू तुज्या पाण्याला
नको मस्ती करू देऊ वार्‍याला
काय नको होवू देऊ त्याचे होडीला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||२||

नारळ पौर्णिमेचा सण आता सरला
तुला सोन्याचा नारल वाढवला
नेल्या होड्या त्यानं मासेमारीला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||३||

मी कोलीण घरला एकली
सारं आवरून बाजारा निघाली
म्हावरं विकून येवूदे बरकतीला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||४||

festivalskokanकोळीगीतसंस्कृतीनृत्यसंगीतकविताप्रेमकाव्यसमाजजीवनमानमत्स्याहारी

तुझे गाणे

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
12 Dec 2021 - 11:51 am

मी पाऊस झालो सखे
तू माती होशील का?
स्पर्शाने माझ्या अलगद
तू सुगंध होशील ना?

मी दरीत येऊन पडलो
तू वारा होशील का?
शीर्षासन करून मग मी
जग पायाखाली घेईल ना.

तू रात्र अबोली हो ना
मी चंद्र सखा तुज भेटेल.
तू पहाट होशील तेव्हा
मी तुझ्याच कुशीत झोपेन.

सुख बिंदू झेलायला
तू गवताचे पाते हो ना.
आयुष्याच्या धक्क्यांना मग
मी अलगद सोशीत जाईल.

जरी विस्कटली घडी जीवनाची
तू अशीच हसरी राहशील?
मी वचनाने मज बांधून घेतो
हे गाणे तुझ्याच साठी गाईल.

प्रेम कवितामाझी कवितामुक्त कविताकविताप्रेमकाव्य

चांदणचुरा

Bhakti's picture
Bhakti in जे न देखे रवी...
30 Nov 2021 - 10:40 pm

वाहावतो चांदणचुरा
तुझ्या उंबर्‍याशी
दाटतो गहिवर
मंद श्वासांशी||

चालतो अनवट वाटा
पैंजणांच्या लयीने
ऐकतो ह्रदयभाषा
नयनांच्या तीराने||

उधळतो चांदणफुले
गुंफलेल्या हातांनी
झेलतो चंद्रमरवा
गंधाळलेल्या मिठीने||

मिटते रात्र मंदफूल
गवाक्षी झुले वारा
पडते प्राजक्तभूल
रंगला चांदणचुरा||

-भक्ती

कविताप्रेमकाव्य

मी एकटी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
24 Oct 2021 - 10:05 pm

तांबडा का तो चंद्र नभीचा
का न असे नेहमीचा चंदेरी
ओळख असूनी अनोळखी
प्रित लपवीत रागावली स्वारी

फुले कळ्या घेवून पाने
मी एकटी उभी कधीची
वाट पाहूनी रात्र संपली
पहाट उजाडली नभाची

- पाषाणभेद
२४/१०/२०२१

प्रेम कविताकविताप्रेमकाव्य

समुद्र..

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
28 Sep 2021 - 10:26 am

समुद्र ,सागर नजर टाकावी  तिथपर्यंत अथांग असतो.म्हणूनच तो मला कायम खुणावतो. सागर किनारा अलवार लाटांच घर असतं.कधी त्या दुडू दुडू अवखळपणे धावत येतात बिलगतात त्या किनाऱ्याला,तर कधी उंच उंच होत जोरात धडकतात.. पटकन किनारी मोकळ्या होतात. लाटांचा आवाज म्हणजे सागराच हृदयाची स्पंदने भासतात.अजूनही डोळे बंद करतातच कानात नादमधुर लाटांचे आवाज घुमतात.या आवाजात हळुवार फुंकर असते.सागर कितीही खोल असला.खूप काही दडलेल असलं तरी सागर किनाराच रम्य वाटतो.

प्रेमकाव्यमुक्तकआस्वाद

शब्दांची कर्णफुले

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
24 Sep 2021 - 9:18 am

शब्दांची कर्णफुले

प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी
प्रेम बरसले अवचीत अवकाळी
नाहत्या ओलेत्या भोर केशांतून
थेंब तयाचे अवतरले भाळी

ओठी शब्द फुलून आले
शब्दांचे मग मोती झाले
तु ते हळूवार उचलूनी घेत
कर्णफुलांसम कानी ल्याले

इशाराकविता माझीजिलबीप्रेम कवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितालावणीवाङ्मयशेतीवाङ्मयकविताप्रेमकाव्य

मिसळपाव दिवाळी अंक २०२१ - आवाहन

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
18 Sep 2021 - 6:19 am

अपडेट : भरघोस प्रतिसादासाठी सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. दिवाळी अंकात निवडी विषयीचा निरोप सर्व लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवला जाईल
काही सदस्यांनी साहित्य संपादक तसेच ईमेल आयडीवर मुदत वाढवण्यासंदर्भात विचारणा केल्याने मुदत येत्या रविवार पर्यंत वाढवत आहोत.
आजपर्यंत प्राप्त झालेल्या लेखनावर निर्णयप्रक्रिया + मुद्रितशोधन सुरू आहे. लेख दिवाळी अंकासाठी स्वीकारला गेला अथवा नाही, हे लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवण्यात येईल.
-दिवाळी अंक समिती

नमस्कार मिपाकरहो...

हे ठिकाणसंस्कृतीवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिक

कळेना मला

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
16 Aug 2021 - 11:57 am

मनात मोर कसे नाचतात
हे तुला पहिल्यांदा पाहिल्यावर...
...मला कळालं!

जीभ कशी अडखळते
हे तुझ्याशी पहिल्यांदा बोलताना...
...मला कळालं!

हृदय कसे धडधडते
हे तुझा हात पहिल्यांदा हातात घेताना...
...मला कळालं!

पुन्हा भेटायचयं हे माहीत असूनही
तुझा निरोप घेताना, दरवेळी
डोळ्यातलं पाणी कस अडवावं
हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही!

- संदीप चांदणे

माझी कविताकविताप्रेमकाव्य