रिमझिमत्या धारातून
आलीस होऊनिया चिंब
मला वाटले फुलावरती जणू जलाचे थेंब.
मातीस स्पर्शती धारा
गंधात नाहते धरा
तुझ्या तनुचा तसा दाटला, मनात मृदगंध.
पापण्या मिटून दूर
लाजून जाहली चूर
थरथरत्या ओठावर देशी तू दातांचा दाब.
दाटले मनी काहूर
डोळ्यात साठला पूर
उगा बावरी होऊ नको, का घाबरशी सांग?
प्रतिक्रिया
18 Feb 2022 - 12:02 am | सौन्दर्य
फारच छान उपमा.
पुढे मागे कधीतरी कविता करू लागलो तर ही उपमा नक्कीच चोरीन. (हलकेच घ्या)
18 Feb 2022 - 9:34 am | Deepak Pawar
18 Feb 2022 - 9:34 am | Deepak Pawar