प्रेमकाव्य

होळी

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
10 Mar 2020 - 6:52 am

होळी
अंगास रंग लावू दे,
अंगास अंग लावू दे,
सण होळिचा आहे,
प्रेम रंगात न्हाऊ दे..
*
दिवस आज मस्तीचा
प्रेमाचा व जबरदस्तीचा
गाली गुलाल फासू दे
थोडीशी मस्ती करू दे
*
उघडा खांदा रंगवू दे,
गोरे तन चिंब करू दे,
ओलेती तुला बघू दे,
प्रेम रंगात न्हाऊ दे,
*
तनू रंगात रंगली
सखी सचैल न्हाली
वस्त्रे तनूंस लिपटली
गुन्हे माफ,असे होळी

प्रेमकाव्य

ये दिल हे की मानता नही !

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Mar 2020 - 10:13 pm

ये दिल हे की मानता नही !
काय करणार माणसाच्या मनाचं असतच अस कितीही केल तरी ते ऐकतच नाही . मन हे तर न उलगडणार कोडच आहे माझ्यासाठी, ते मेंदू आणि हृदय नक्की कशात असत मुळी कळतच नाही . एरवी असा प्रश्न नाही पडत माला सगळ्याच गोष्टी मना प्रमाणे होतातच अस नाही . विचार सुचण किवा करण हे मनाच काम मग त्यावर प्रक्रिया करणे हे मेंदू किवा हृदयाच काम मग घडते ती कृती . असो ....... पण ह्यासगळ्यात काही गोष्टी अश्या गुंतागुंतीच्या होऊन जातात की मग कळतच नाही काय करव कसं वागाव .

प्रेमकाव्यआस्वाद

तुला बापू म्हणू की बाप्या ?

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
3 Mar 2020 - 10:26 am

तुला बापू म्हणू की बाप्या ?
स्वतःच्याच
स्खलनशीलतेने
असुरक्षीत
ईतरांनाही
असुरक्षीतता वाटणारा
तुला बापू म्हणू की बाप्या ?

जीवातला शिव
भुकेला प्रणयाच्या लीलेला
निसर्ग सुंदर प्रकृती
मायेच्या प्रितीला

अनर्थशास्त्रइशाराकखगकोडाईकनालगुलमोहर मोहरतो तेव्हाझाडीबोलीतहानप्रेम कविताकविताप्रेमकाव्य

मानव प्रगल्भ अनसुय कधीच होणार नाही ?

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
28 Feb 2020 - 6:21 pm

"असुं"या च्या जिद्दीने
व्यवहार सिद्ध होतो
असूया घर करते
सुंदर सत्यास कडवट मानत
खुले विनाअट प्रेम पारखे होते

कल्पना आणि विचार करा..

एकपत्नी व्रताचे बंधन तोडून
राधेकडे पाहिल्या बद्दल ..

सीता रामाची
अग्नी परीक्षा घेते
रेणुका जमदग्नीचा
प्राण मागते
अहल्या गौतमास
पत्थर होण्याचा
शाप देते

दुसरी बाजूप्रेम कवितामुक्त कवितावाङ्मयशेतीशृंगारसंस्कृतीधर्मकविताप्रेमकाव्यसमाज

ग चांदण्यांनो

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
24 Feb 2020 - 11:27 am

नका ग चांदण्यांनो
नका येऊ खिडकीत
तिच्या मनाचा ठाव
सांगा येऊन पडवीत

सांगा तिच्या गाण्यात
का, आहे नाव माझे?
माझ्याविन विरहाचे
का, सोसते ती ओझे?

ठावे तिलाही आहे
का, रात्री कवितांचे
येती जथ्थे, जाती
स्वप्न गाऊन उद्याचे?

आतूर प्रीत आत
रोज झुरते उरात
सांगा तिला हे सारे
चमचमत्या सुरात

तिचे चालणे बोलणे
भास होऊन छळते
लय श्वासांची तेव्हा
आठवांशी अडखळते

सारे आठव आठव
युगांच्या जणू फेऱ्या
रेखू पाहती नशीबाला
तळहातावर कोऱ्या

कविता माझीप्रेम कवितावाङ्मयकविताप्रेमकाव्य

एकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे.

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
19 Feb 2020 - 4:05 pm

ज्या कृष्णांना राधा नसतात
आणि ज्या राधांना कृष्ण नसतात
त्यांनी काय करावे ?
ज्या कृष्णांना राधा असतात
आणि ज्या राधांना कृष्ण असतात
त्यांचे मनोमन कौतुक करावे
त्यांच्या प्रेमाच्या पावित्र्याचा
आदर करावा किमान राधेच्या
चारित्र्याचे उगाचच जज बनू नये.

आरोग्यदायी पाककृतीकालगंगाकैच्याकैकविताखिलजी उवाचप्रेम कविताफ्री स्टाइलमुक्त कवितारतीबाच्या कविताशांतरसप्रेमकाव्यमुक्तक

मिलिंदमिलन

मायमराठी's picture
मायमराठी in जे न देखे रवी...
16 Feb 2020 - 12:10 pm

नशिबात पापण्यांच्या मिटणे अजून नाही
धुरळाही द्वारकेचा का दारात येत नाही
ग्रीष्मात वाहते यमुना भिजे विरहात ओली
नयनांत राधिकेच्या अश्रू दिसणार नाही

"क्षण एक आसवांचा झेलू अशी कशी मी
अवचित येई स्वारी पाहू त्याला कशी मी?
हृदयातल्या रणाला थांबवू आता कशी मी
झाकूनही दिसावी त्या मूर्तीस लपवू कशी मी?"

मग कृष्णही महाली तुळशीस काही सांगे
अंगणात राधिकेच्या रुजले नवीन धागे
देहात पाकळ्यांच्या सजली अशी कळी ती
गोकुळीचे सुगंधी श्वास द्वारकेस जाती

प्रेमकाव्य

रोमांचक भूल !

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
14 Feb 2020 - 12:45 pm

..

चकित किंचित चिंतित उभी तू
उभी आहेस जणू चितारलेले चित्र तु
मदिर मकरंद सदृश सौंदर्य
कळी कोवळी नव उन्मीलित तू

पयोधर पीन किन्तु कटि क्षीण
विधात्या ची रोमांचक भूल !
बाहे आहेत कि चन्द्रिका पुंज
चेहरा कि पौर्णीमाचा चन्द्र.
कवी रचित सुरस श्रृंगारतू

प्रेमकाव्य

एकदाच ओलांडून अंतर...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
12 Feb 2020 - 9:07 am

एकदाच ओलांडून अंतर
पोहोचले मी तव हृदयाशी,
आठवते का तुला अजुनी
घडले जे जे काही नंतर?

उभी राहुनी टाचांवरती,
ओठ भिडवले धिटपणाने.
दात पकडती अलगद हल्लक
ओठांमधली मधाळ साखर..

वितळून गेले सभोवतालच,
विसरून गेले काळवेळ मी.
हात शोधती अधीर काही
स्पर्शही झाला हळवा कातर...

नको घडाया भलते काही
मनावरी ठेवलास पत्थर
पण...
मिठी अशी ती कातील होती
अजून होते तनात थरथर...

कविता माझीप्रेमकाव्य

एका उदास संध्याकाळी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
5 Feb 2020 - 8:12 pm

एका उदास संध्याकाळी
कोणी गात होती विराणी ||

शब्दांत अशी आस नव्हती
चाल नव्हती अशी कोणती
धारही नव्हती त्या शब्दांना
तरी काळीज जाय चिरूनी ||

संधीप्रकाश निळा जांभळा
खालून गेला वर आभाळा
कुंद हवा अन वारा पडला
हवेत सूर राही भरूनी ||

धिरगंभीर सूर कवळूनी
गीत हृदयीचे आळवूनी
उलगडे आर्त सरगम
भरूनी राहिली कानी ||

- पाषाणभेद
०५/०२/२०२०

प्रेम कविताविराणीशांतरसकविताप्रेमकाव्य