तुला बापू म्हणू की बाप्या ?
स्वतःच्याच
स्खलनशीलतेने
असुरक्षीत
ईतरांनाही
असुरक्षीतता वाटणारा
तुला बापू म्हणू की बाप्या ?
जीवातला शिव
भुकेला प्रणयाच्या लीलेला
निसर्ग सुंदर प्रकृती
मायेच्या प्रितीला
प्रितीची महती
निवड स्वातंत्र्याची रिती
न समजलेला
तुझ्यातला दांभिक
भद्रतेचे नाटक
रचणारा
केयलफिड्डी
कुरवाळणारा
अभद्र बाबूराव
मायेच्या प्रितीला
निवड स्वातंत्र्याची रितीला
पारखा झाला असेल
तर त्याला जरा ताळ्यावर
आण, शिकव त्याला
संस्कार प्रितीचा
निवड स्वातंत्र्याच्या रितीचा
शिखराला आधार असेल
जर अनसुय निरपेक्ष
समर्पित प्रितीचा
तरच तुला क्रौंच द्वयाच्या
मीलनाची शीखरावरच्या
स्खलनाची कल्पना
अनैसर्गिक असुरक्षीत
वाटणार नाही
स्खलनशीलता
वाटेल स्वाभाविक
निसर्ग सुंदर
होईल स्वतःतला
राजस सुकुमार
मदन साकार
शिव पार्वतीचा
कृष्ण राधेचा
प्रतिक्रिया
29 Apr 2021 - 4:29 pm | रंगीला रतन
पार डोक्यावरून गेली!
29 Apr 2021 - 6:17 pm | प्रसाद गोडबोले
०/१०
29 Apr 2021 - 6:41 pm | Bhakti
माझ्यातर डोक्याजवळपण नाही आली :)
29 Apr 2021 - 5:12 pm | नावातकायआहे
तुझे सुरज कहू या चंदा ची आठवण झाली.
कुठल्याच कवीता झेपत नाहीत त्यामुळे पास.
30 Apr 2021 - 7:18 am | पुष्कर
हा अभंगही आठवला
30 Apr 2021 - 5:36 pm | गॉडजिला
तुला बापू म्हणू की बाप्या ? असे विचारणे म्हणजे शेकन हवी की स्टीअर्ड विचारण्यासारखे वाटतय.