एकदाच ओलांडून अंतर...

Primary tabs

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
12 Feb 2020 - 9:07 am

एकदाच ओलांडून अंतर
पोहोचले मी तव हृदयाशी,
आठवते का तुला अजुनी
घडले जे जे काही नंतर?

उभी राहुनी टाचांवरती,
ओठ भिडवले धिटपणाने.
दात पकडती अलगद हल्लक
ओठांमधली मधाळ साखर..

वितळून गेले सभोवतालच,
विसरून गेले काळवेळ मी.
हात शोधती अधीर काही
स्पर्शही झाला हळवा कातर...

नको घडाया भलते काही
मनावरी ठेवलास पत्थर
पण...
मिठी अशी ती कातील होती
अजून होते तनात थरथर...

कविता माझीप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

12 Feb 2020 - 9:10 am | प्रचेतस

क्या बात है...!
एकदम रोम्यान्टिक.

Rohini Mansukh's picture

12 Feb 2020 - 11:11 am | Rohini Mansukh

उत्कट भावना अलगदपणे टिपणारे हळुवार आणि नाजूक काव्य!!!

श्वेता२४'s picture

12 Feb 2020 - 2:00 pm | श्वेता२४

मानलं तुम्हाला! खूप आवडली.

प्राची अश्विनी's picture

13 Feb 2020 - 7:16 am | प्राची अश्विनी

:).

चौथा कोनाडा's picture

12 Feb 2020 - 5:23 pm | चौथा कोनाडा

सुंदर, तरल, अप्रतिम !

नको घडाया भलते काही
मनावरी ठेवलास पत्थर
पण...
मिठी अशी ती कातील होती
अजून होते तनात थरथर...

हे तर खासच !

शा वि कु's picture

12 Feb 2020 - 5:46 pm | शा वि कु

शृंगारिक कविता फार नाही वाचल्या, त्यामुळे फार आवडली.

मनात जे जे दडून होते नकळत आकळते
कसे दुज्याच्या स्पर्शाने 'मीपण' झगमगते
ही जाणीव अवघी जरतारी . . .
हर श्वासातुन परिमळणारी . . .
हर गात्रातुन तगमगणारी . . .

प्राची अश्विनी's picture

13 Feb 2020 - 7:16 am | प्राची अश्विनी

धन्यवाद सर्वांनाच.

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Feb 2020 - 11:45 am | ज्ञानोबाचे पैजार

लै म्हणजे लैच आवडली,

नको घडाया भलते काही
मनावरी ठेवलास पत्थर

हे भलते अवघड असते पण जमवावेच लागते नाहीतर मग वाट लागते.....

पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

19 Feb 2020 - 9:50 am | प्राची अश्विनी

विडंबन नाही आलं अजून???

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Feb 2020 - 12:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली. धीट कविता.

-दिलीप बिरुटे

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

15 Feb 2020 - 10:41 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुरेख

प्राची अश्विनी's picture

19 Feb 2020 - 9:49 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!!

आगाऊ म्हादया......'s picture

10 Apr 2020 - 11:09 pm | आगाऊ म्हादया......
चलत मुसाफिर's picture

13 Apr 2020 - 8:15 am | चलत मुसाफिर

एकदा धीर करून अंतर ओलांडले की काहीच 'भलते' रहात नसते.

कविता छानच.

मदनबाण's picture

14 Apr 2020 - 4:49 pm | मदनबाण

उभी राहुनी टाचांवरती,
ओठ भिडवले धिटपणाने.
दात पकडती अलगद हल्लक
ओठांमधली मधाळ साखर..

आहाहा...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Badshah - Genda Phool | JacquelineFernandez | Payal Dev