"असुं"या च्या जिद्दीने
व्यवहार सिद्ध होतो
असूया घर करते
सुंदर सत्यास कडवट मानत
खुले विनाअट प्रेम पारखे होते
कल्पना आणि विचार करा..
एकपत्नी व्रताचे बंधन तोडून
राधेकडे पाहिल्या बद्दल ..
सीता रामाची
अग्नी परीक्षा घेते
रेणुका जमदग्नीचा
प्राण मागते
अहल्या गौतमास
पत्थर होण्याचा
शाप देते
एखादा टिम मेंबर
दुसर्या टिम मधून
प्रेमाने खेळता
पझेसिव्ह असुरक्षीत
खोलवर जखमा
ऐकलेत कधी?
ऑनर पनिशमेंट्स
ऑनर किलींग्स
असूयेने पछाडलेली
व्यवहार पूर्णत्वास नेऊनही
प्राकृतिक प्रेमाचा निषेध करणारी
अप्राकृतिक बंधने
अटळच असावित का ?
दुसरी कडे
असूयेशी तडजोड करणारा पाण्डू
असूया रहीत अनसुय अत्री
जोडीदाराच्या निवड स्वातंत्र्याचे प्राकृतिक प्रेमाचा
आदर करणारे प्रगल्भ अनसुय प्रेम करणारा मानव
हि समाजव्यवस्था कधीच देऊ शकणार नाही ?
मानव आणि त्याचा समाज
कधीच का प्रगल्भ होणार नाही ?
मानवी स्वभाव
कडव्या कडवट वृत्ती
बाजूस ठेऊन
कधीच
शिवासारखे सुंदर सत्य
विनाअट प्रेमाने
स्विकारणार नाही ?
(काव्य प्रेर्ना : अलिकडे दोन वेगवेगळ्या कवितांवर पटली नाही असा शेरा पाहण्यात आला १ २, मागच्या काही मिपा चर्चा सुद्धा )
प्रतिक्रिया
29 Feb 2020 - 10:17 am | ज्ञानोबाचे पैजार
कल्पनेची भरारी उत्तुंग आहे पण वास्तव काही वेगळेच आहे.
एखादी स्थितप्रज्ञ व्यक्तीच आपल्या जोडीदारावर विनाअट किंवा निरपेक्ष प्रेम करु शकेल. पण मग तसे प्रेम ती व्यक्ती जगातल्या सर्व प्राणीमत्रांवर करत असेल.
उदा. मजनू जर लैलाला म्हणाला "माई तुझ्यात मला आई भवानीचा भास होतो" तर ते लैला ला कितपत आवडेल?
किंवा लोक जेव्हा मजनूला दगडांनी मारायला लागतात तेव्हा लैला जर म्हणाली "अरे पामरांनो तुम्ही ज्याला दगड मारत आहात ते केवळ एक शरीर आहे, ज्या आत्म्यावर मी प्रेम केले तो नश्वर आहे, अमर आहे" तर त्या वेळी मजनू तिच्या कडे मोठ्या कौतुकाने पाहिल का?
तातपर्य काय तर भौतिक जगात राहून आपल्या जोडीदारावर निरपेक्ष प्रेम करण्याचा दावा करणारे गणपत वाणी सुर्यावर बसून देखिल बीडी ओढू शकतात.
पैजारबुवा,
2 Mar 2020 - 2:48 pm | खिलजि
मागा काका , पैंबुकाका म्हणतात त्याप्रमाणे कल्पना खरंच उत्तुंग हाय ..
पण इथे विशेष भाव खाऊन गेलय त्ये म्हणजे आपल्या पैंबुकाकांचं ईशलेषण .. लाई आवडलं गेलंय.. ह्ही ह्ही ह्ही ह्ही