हळूवार वेच ती
प्राजक्ताची फुले
रानपाखरे वेलीवरती
घेती तेथे झुले.
मधुर गोजिरी होते किलबिल.
तुझ येण्याची देती चाहूल.
प्राजक्त ही मग बहरून येतो
शुभ्र फुलांची रास घालीतो
केस मोकळे शुर्भ वसने
पायावर ते अलगत बसणे
फुल फुलाशी घेते वेचून
असेच मजला वाटे पाहून
चोरुन घेई गंध नेटका
अंगणी वाहे वारा अवखळ
प्राजक्ताचा गंध सुगंधी
की आसे तो तुझाच दरवळ
प्रतिक्रिया
29 Apr 2020 - 1:18 pm | जव्हेरगंज
सुंदर!!
30 Apr 2020 - 12:57 pm | मनोज
धन्यवद जव्हेरगंज
29 Apr 2020 - 4:28 pm | चांदणे संदीप
भेट सजविण्या तिची एकांती, ये पुन्हा पुन्हा बहरूनि
धवल केसरी गालिचा तू ठेव तिथे पसरूनि
अशा ओळी आठवल्या.
सं - दी - प
30 Apr 2020 - 12:56 pm | मनोज
धन्यवाद सं - दी - प
2 May 2020 - 6:39 pm | अत्रुप्त आत्मा
सुंदर!
3 May 2020 - 12:54 am | MipaPremiYogesh
मस्तच मनोज..