अत्तर
बादशहांच्या दरबारात खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आमंत्रितां समोर दौलतीची शान मिरविण्यासाठी बादशहा, बीरबल समारंभाच्या तयारीकडे जातीने लक्ष पुरवित होते.
काही नोकर चांदीच्या अत्तरदाण्या घेऊन आले.
बादशहांना पाहून सलाम करत होते.
या गोंधळात एकाच्या हातातील अत्तरदाणी पडून अत्तर उंची गालीचावर सांडले.
न राहवून बादशहाने ते चटकन बोटाने टिपून आपल्या अंगरख्याला लावले.
बीरबलाकडे पाहताच बादशहा खजील झाले. बीरबल मिश्कीलपणे हसत होता.
बादशहाने रागारागाने आपल्या अधिकार्याला हुकूम फर्मावला, की तेथे असलेल्या हौदात पाण्याऐवजी अत्तर भरा.