नि:शब्द (कथा)

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in जनातलं, मनातलं
10 Jul 2013 - 10:02 pm

त्या संध्याकाळी घरातून निघतानाच नीलेश टेन्शन मध्ये होता ... आज गुरुवार होता, संध्याकाळी देवाजवळ दिवाबत्ती करून स्तोत्र म्हटल्यावर आज घराबाहेर पडू नये असे तीव्रतेने वाटत होते. पण रमेशचा फोन पुन्हा आला तेव्हा साडेसात झाले होते. ...येतोस ना, मी वाट बघतोय......

रमेश आणि नीलेश ची दोस्ती अगदी कॉलेज पासूनची. नीलेश एका कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये अकाऊंटंट होता . मुंबईतली कार्गो लोजीस्टिक्स मधली नोकरी सोडून गेली 2/3 वर्षे आपल्याच गावशेजारी असलेल्या कंपनीत स्थिरावला होता. रमेश गेली दोन वर्षे सौदीला काढून सुट्टीवर आला होता . त्याची पिण्याच्या दृष्टीने सौदीला दोन वर्षे चांगलीच उपासमार झाली होती. त्यामुळे तिथी-वार-सण-उत्सव याची कसलीही फिकीर न करता तो पीत असे.

नीलेश चे मात्र तसे नव्हते. नीलेश ही प्यायचा ,पण महिन्यातून 3-4 वेळा , तेही फक्त रविवार –बुधवारीच ... तो तसा धार्मिक होता. पण लग्न होत नसल्याचे टेन्शन कधीकधी असह्य होई,आणि मग त्याला नाइलाजाने बारचा रस्ता धरावा लागे.

रमेशचा फोन आला तसा बाईकला किक मारून नीलेश निघाला. आईने विचारलेही……अरे आता रात्रीचा कुठे निघालास ?..रमेशने भेटायला बोलावले आहे ,लगेच येतो परत ..... असे आईला सांगून नीलेश निघाला .... घरापासून बारचे अंतर पंधरा मिनिटात कापून तो बारवर पोहोचला . रमेश आधीच आला होता. मग गप्पांची मैफिल जमली, आणि त्या नादात किती पेग झाले ,त्याचे भान कुणालाच राहिले नाही. नीलेशची एक क्वार्टर ची नेहमीची मर्यादा कधीच ओलांडली गेली होती.

डिसेंबर महिना, थंडी आपले रंग दाखवू लागली होती. म्हणून आज ओल्ड मंक होती. एव्हाना साडेदहा झाले होते ,आणि दोघांनीही प्रत्येकी तीन क्वार्टर च्या वर ओल्ड मंक संपवली होती. आता पुरे ....म्हणून बारच्या मॅनेजरनेच त्यांना थांबवले,आणि बार बंद करायचं आहे ,असे सांगून दोघांना उठवले ... मग शेजारच्याच चायनीज गाडीवर ट्रिपल राईस खाल्ला आणि रमेशला घरी सोडून नीलेशने बाइक आपल्या गावाच्या रस्त्याला वळवली .

साडेअकरा झाले, एव्हाना थंडी चांगलीच जाणवू लागली होती. गावाकडच्या रस्ता माळरानवरून जात असल्याने वारा सुद्धा भन्नाट लागत होता. थंडी आणि वारा यांचा एकत्रित इफेक्ट झाला आणि ओल्ड मंकने आपले रंग दाखवायला सुरुवात केली .नीलेशचा स्वत:च्या विचारांवर अजिबात कंट्रोल नव्हता . गाडी चालवण्याऐवजी आपण हवेतून उडत आहोत,असेच त्याला वाटू लागले. इतक्यात समोरून एक पॉश कार आली. आणि दामिनी कार चालवत होती. ...

दामिनी ........... नीलेशने दामिनीला 4-5 वर्षापूर्वी लग्नासाठी विचारले होते... तो कॉलेजमध्ये असल्यापासूनच तिच्या प्रेमात होता ... पण एकतर्फीच .... त्याला ती खूप आवडायची ... त्याच्या स्वप्नांची राणी तीच होती.... पण..पण... जेव्हा त्याने तिला विचारले ,तेव्हा तिने साफ उडवून लावले.... नीलेश खूप खोलवर दुखावला गेला....तिचा नकार त्याला पचला नाही. प्रेमभंगाचे दू:ख त्याला पेलले नाही. यापुढे लग्न/प्रेम या गोष्टींवर विचारच करायचं नाही ,असे त्याने ठरवून टाकले.....

आणि आत्ता , या अवस्थेत तीच दामिनी समोरून कार चालवत येत होती. चांगला डॉक्टर नवरा मिळाला होता तिला ,त्याचीच आलीशान कार घेवून ती निघाली होती... हॉस्पिटल नधून नवर्या.चा फोन आला होता... आज उशिरापर्यंत थांबावे लागणार होते... त्याच्यासाठी जेवण घेवून ती निघाली होती.....

आपल्या सगळ्या दू:खाला ही दामिनीच जबाबदार आहे, असा विचार नीलेशच्या मनावर गारुड करू लागला... बदला घे तिचा....... मार मार ................ विचारांचा स्फोट झाला मेंदूत ...................आणि मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याने बाइक तुफानी वेगात सरळ कारवर चढवली......................

जाग आली तेव्हा नीलेश हॉस्पिटल मध्ये होता ....रमेश समोर बसला होता ,आई पायाशी रडत बसली होती. अपघातात त्याच्या उजव्या हाताची नस कापली गेली होती.गेले चार दिवस तो बेशुद्ध होता . कारचे फार नुकसान झाले असले तरी दामिनीला मात्र जास्त दुखापत झाली नव्हती. सुदैवाने तिने नवर्याेला फोन करून अम्ब्युलंस मागवली, आणि नीलेशला हॉस्पिटल मध्ये आणले. मग दामिनीच्या नवर्यावने त्याच्या प्लॅस्टिक सर्जन मित्राला बोलावून ऑपरेशन केले . ...आणि नीलेशला जीवदान मिळाले होते......

थोड्याच वेळात दामिनी आणि तिचा डॉक्टर नवराही तिथे आला . नीलेश ने त्यांचे आभार मानले. पण हताश डोळ्यांनी तो दामिनीकडे बघत राहिला ............. जिला आपण आपले आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल दोषी ठरवून मारायला निघालो होतो...........तिच्यामुळेच आज मृत्युच्या दारातून आपण परत आलो.............हे समजल्यावर नक्की काय बोलावे तेच त्याला कळत नव्हते...........................!

वावरविचार

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

11 Jul 2013 - 11:20 am | दिपक.कुवेत

कथा फार अंतर्मुख करुन सोडते.....वाचुनच नि:शब्द झालोय.

मागच्या वेळी तुमच्याच कथेत बाईक जीप ला ठोकून जीप पुलात पडलेली ना =))

भारी विनोदी लिहिता ब्वा तुमी

दिपक.कुवेत's picture

11 Jul 2013 - 11:54 am | दिपक.कुवेत

अरे कथेत अ‍ॅक्सीडेंट महत्वाचा आहे मग तो कुठे/कसा का होईना.....त्याशीवाय कथानायकाला महत्व कसं येइल?

चंबु गबाळे's picture

11 Jul 2013 - 11:48 am | चंबु गबाळे

चांगला प्रयत्न

दिपक.कुवेत's picture

11 Jul 2013 - 11:58 am | दिपक.कुवेत

नीलेश टेन्शन मध्ये का होता? घराबाहेर पडू नये अस त्याला का वाट्त होतं?

कपिलमुनी's picture

11 Jul 2013 - 12:21 pm | कपिलमुनी

नीलेश , रमेश आहेत ..पण सुरेश कुठे आहे ? बहुतेक त्या पोरीने सुरेश सोबत लग्न केले असावे ..

त्यांच्या मुलांची नावे काय असतील :P

किसन शिंदे's picture

11 Jul 2013 - 4:14 pm | किसन शिंदे

जयेश नि राजेश!! =))

कवितानागेश's picture

11 Jul 2013 - 1:27 pm | कवितानागेश

असं बाईक चालवताना समोरुन येणारी कार 'कोण' चालवतय ते दिसतं का?
-झुक्झुक्गाडीतून फिरणारी माउ

आदिजोशी's picture

11 Jul 2013 - 1:33 pm | आदिजोशी

बाईकने गाडीला ठोकून बदला घेण्याचा विचारच किती भन्नाट विनोदी आहे. असे विचार सुचणार्‍या तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम :)

असो. गाडीला बाईकने ठोकण्याआधी तो मिपाकर विवाहितांशी बोलला असता तर लग्नाविषयीचं त्याचं मत बदललं असतं.

पैसा's picture

11 Jul 2013 - 1:41 pm | पैसा

पण लग्न न झाल्याचं टेन्शन असणारा माणूस असा "मुंगीने हत्तीला चिरडून टाकण्यासारखा" विचार करू शकेल ना सहज!

बाईकने गाडीला ठोकून बदला घेण्याचा विचारच किती भन्नाट विनोदी आहे. असे विचार सुचणार्‍या तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम

अरे त्यांच्या प्रत्येक कथेत हेच घडते .. सुरुवात वेगळी शेवट हाच. नशीब समज.. यावेळी गाडी पुलावरून खाली पडली नाही , फक्त भरपूर नुकसानच झाले .. बहुधा नायकाकडे स्कुटी असावी

विजुभाऊ's picture

12 Jul 2013 - 2:14 pm | विजुभाऊ

अपघात महत्वाचा.
मागे एक तै इथे त्यांच्या बहुतेक कथेत ट्रक खाली कोणालातरी चिरडुन मारायच्या.

स्पा's picture

11 Jul 2013 - 1:42 pm | स्पा

http://www.misalpav.com/node/23045

हीच ती कथा बहुतेक =))

बॅटमॅन's picture

11 Jul 2013 - 2:03 pm | बॅटमॅन

येस येस हीच =)) =)) =))

आदिजोशी's picture

11 Jul 2013 - 2:19 pm | आदिजोशी

उदयोन्मुख लेखकांना नाऊमेद करणार्‍या स्पा, बॅटॅ, मुनी आणि दिपक ह्या खलप्रवॄत्तींचा जाहीर निषेध. ह्या अशाच लोकांमुळे माझा लेखकराव होता होता राहिला. त्यावेळी नावं वेगळी होती पण प्रवॄत्ती हीच.

दिपक.कुवेत's picture

11 Jul 2013 - 2:43 pm | दिपक.कुवेत

मी आत्ता अगदि हेच म्हणायला आलो होतो......एनी वे माझं नाव वगळुन तुझ्या मताशी सहमत फ्क्त आपल्यात काय लिखाणाची ताकद नाहि.

स्पा's picture

11 Jul 2013 - 2:25 pm | स्पा

=)l

दिपक.कुवेत's picture

11 Jul 2013 - 2:51 pm | दिपक.कुवेत

कथेतल्या नायकाचा अ‍ॅक्सीडेंट केलाच आहेस तर काय काय दुखापत झाली ते पण सवीस्तर लिहि काय आहे प्लॅस्टिक सर्जन डॉ. मुळे नीलेशला जीवदान कोणत्या स्वरुपात मिळाले तर शेवट समजायला सोपा जाईल. शीवाय कारचा ईन्सुरस होता ना बाबा? काय आहे दुचाकि/चारचाकि चालवणार्‍यांच पहिलं प्रेम कार त्यांची बाईक/कार असते आणि मग पत्नी!

मी_आहे_ना's picture

11 Jul 2013 - 3:10 pm | मी_आहे_ना

म्हणजे तुम्हाला तो निलेश दुसरं प्रेम असफल झाल्यानं निराश होता असं म्हणायचंय का??

किसन शिंदे's picture

11 Jul 2013 - 4:16 pm | किसन शिंदे

पहिले पाच परिच्छेद वाचून कथा वाचतोय कि तळीराम पुराण वाचतोय हेच कळत नव्हतं.

आदिजोशी's picture

11 Jul 2013 - 4:31 pm | आदिजोशी

यादीत ह्यांचे पण नाव अ‍ॅड करावे अशी संपादक मंडळाला विनंती.

किसन शिंदे's picture

11 Jul 2013 - 4:38 pm | किसन शिंदे

:P

अग्निकोल्हा's picture

11 Jul 2013 - 4:47 pm | अग्निकोल्हा

हम्म! जिच्या जिवावर उठला तिनेच प्राणदान दिले. नीलेशला टाळायचा तिचा निर्णय अतिशय योग्य होता हेच यातुन स्पष्ट होते.

मंदार कात्रे's picture

11 Jul 2013 - 6:30 pm | मंदार कात्रे

नीलेश टेन्शन मध्ये का होता? घराबाहेर पडू नये अस त्याला का वाट्त होतं?

कारण तो गुरुवार होता ,आणि गुरुवारी तो पीत नसे....

मागच्या वेळी तुमच्याच कथेत बाईक जीप ला ठोकून जीप पुलात पडलेली ना smiley

मागच्या वेळी बाईकच्या ठोकरीने शुकला चे स्टेयरिंग वरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे जीप नदीत पडली होती.

बाईकने गाडीला ठोकून बदला घेण्याचा विचारच किती भन्नाट विनोदी आहे. असे विचार सुचणार्‍या तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम

दोन्ही वेळी बदला घेण्याचा विचार करणारा नायक fully drunk होता. ...........थंडी आणि वारा यांचा एकत्रित इफेक्ट झाला आणि ओल्ड मंकने आपले रंग दाखवायला सुरुवात केली .नीलेशचा स्वत:च्या विचारांवर अजिबात कंट्रोल नव्हता . गाडी चालवण्याऐवजी आपण हवेतून उडत आहोत,असेच त्याला वाटू लागले.

मंदार कात्रे's picture

11 Jul 2013 - 6:37 pm | मंदार कात्रे

एकदा कडाक्याच्या थंडीमध्ये ओल्ड मंक च्या दोन क्वार्टर पिऊन भरधाव बाइक चालवून बघा ............. वारा जसा कानात भरतो तशी ओल्ड मंक मेंदूत भिनू लागते..................!

-स्रोत-बेवड्याचे बायबल .लेखक - सुधाकर तळीरामपूरकर आणि बोकाजी बेवडे!

धमाल मुलगा's picture

12 Jul 2013 - 2:42 am | धमाल मुलगा

च्यायला! ओम बसल्याजागी दणका देते..ग्लासाचा तळ दिसेदिसेतो. दोन क्वार्टर ओम सलग मारुन बाईकपर्यंत गेल्यावर बोंबलायला किल्ली लावायला इगिन्शन स्विचच सापडत नाय पैले धा मिंटं. वार्‍यासोबत चढते ती व्होडका. रम नव्हे. रम जास्त झाल्यावर तोंडावर सोडा मारुन वार्‍याला बसवायची जुनी पध्दत आहे...पंधरा मिनिटं असं वारं तोंडावर घेऊन झालं की मग उदरभरण केल्यावर पोरं जाग्यावर येतात.

गोष्टीच्या डिटेलिंगमध्ये लै गडबड झालीये. येकडाव नवं ड्राफ्टिंग मारुन बघा राव.

-आजीवन सचिव,
आर्य मदिरा मंडळ

अर्धवटराव's picture

12 Jul 2013 - 2:58 am | अर्धवटराव

>> येकडाव नवं ड्राफ्टिंग मारुन बघा राव.
-- किंवा धम्यासोबत रम आणि व्होडका कधी, का, व कशी उतरते हे प्रत्यक्ष्य बघायला एक-दोन बैठका होऊन जाऊ दे (अर्थात, कथा लेखकाची स्पॉन्सरशीप ;) )

अर्धवटराव

धमाल मुलगा's picture

12 Jul 2013 - 3:21 am | धमाल मुलगा

बघायला की अनुभवायला? ;)

साला खूप वर्षं लोटली, ओमची बैठकच नाय झाली, चवही विसरायलाशी झालीये. येताव काय दोस्तहो? हैऽऽ तिच्यायला! करु मज्जाऽऽ :)

चतकोरराव

-रेडी टु ड्रिंक

अर्धवटराव's picture

12 Jul 2013 - 3:42 am | अर्धवटराव

चतकोरराव
-रेडी टु ड्रिंक
--> पुढील बैठकीत पहिल्या पेगला हे आठवुन ठसका लागेपर्यंत हसणार हे नक्की =))

अर्धवटराव

धमाल मुलगा's picture

12 Jul 2013 - 6:56 pm | धमाल मुलगा

म्हणजे आमचा प्रयत्न सार्थकी लागणार तर. हसत रहा, हसवत रहा. :)

बॅटमॅन's picture

12 Jul 2013 - 11:08 am | बॅटमॅन

रेडी टु ड्रिंक>> =)) =))

बाळ सप्रे's picture

12 Jul 2013 - 10:24 am | बाळ सप्रे

ड्राफ्टींगच्या आधी ओमचा दणका बसला असेल तर?? डीटेलिंगमध्ये गडबड होणारच :-)
कात्रेजी हलकेच घ्या..

धमाल मुलगा's picture

12 Jul 2013 - 7:03 pm | धमाल मुलगा

मला मात्र उलटं वाटतं. ओमच्या कृपेनं एकदा तार लागली म्हणजे पहिल्या ड्राफ्टिंगमध्येच ष्टुरी तयार.

फू बाई फू चे स्किट्स लिहिताना पंचेस येण्यासाठी म्हणे नेहमीची ग्लेन ड्रमॉन्ड सोडून ओमची साधना करायचे आमचे लेखकूमित्र. हो ना रे अ‍ॅड्या? ;)

शैलेन्द्र's picture

14 Jul 2013 - 9:25 pm | शैलेन्द्र

अगदी बरोबर.. कमीत कमी कथा लिहण्याआधी एकदा ओम भरपूर प्यायची होती.

अर्धवटराव's picture

12 Jul 2013 - 2:55 am | अर्धवटराव

स्व. जसपाल भट्टींचा फ्लॉपशो आठवला. त्यात भट्टीसाहेब हॉरर सिरियल(का सिनेमा) बनवतात व त्याला सर्वोत्कृष्ट विनोदी सिरीयल(का सिनेमा)चं पारितोषीक मिळतं.

अर्धवटराव

आधीची कथा दणकट बांध्याची होती ना? यावेळच्या कथेत दामिनीला फारशी दुखापत झाली नसल्याने कार दणकट दिसतीये. ;)

आधीची कथा दणकट बांध्याची होती ना? यावेळच्या कथेत दामिनीला फारशी दुखापत झाली नसल्याने कार दणकट दिसतीये.

लॉजीक चुकलं रेवती..... दामिनी दणकट बांध्याची होती असे म्हणायला पाहिजे

नि३सोलपुरकर's picture

12 Jul 2013 - 10:39 am | नि३सोलपुरकर

मंदार मामा, काय खतरनाक लोजिक आहे.
------नीलेश टेन्शन मध्ये का होता? घराबाहेर पडू नये अस त्याला का वाट्त होतं?

---------कारण तो गुरुवार होता ,आणि गुरुवारी तो पीत नसे....

अवांतर : मिपावर आगामी धागा :"दारु पितांना तुम्ही वार पाळता का ?"

कपिलमुनी's picture

12 Jul 2013 - 1:39 pm | कपिलमुनी

काय काय करताना वार पाळायचे ..याचा कोष्टक बनवून प्रसिद्ध केल पायजे

मृत्युन्जय's picture

12 Jul 2013 - 2:06 pm | मृत्युन्जय

पुढच्या कथेत कात्रे बहुधा स्वत:च्याच गाडीवर स्वतःचीच बाइक चढवणार. किंवा गाडीमध्ये बाइक घालुन नदीत ड्गकलुन देणार. त्यावेळेस त्यात निलेश, रमेश सुरेश तिघेही असणार बहुधा.

एवढ्या रात्री पॉश गाडी तून दामिनी एकटीच कुठे गेली होती/चालली होती?

विजुभाऊ's picture

12 Jul 2013 - 7:11 pm | विजुभाऊ

हार्ट सर्जन जीव वाचवू शकेल. पोटाचा सर्जन जीव वाचवू शकेल,
प्लास्टीक सर्जरीने जीव कसा वाचू शकेल हे इथले कोणी जाणकार सांगु शकेल का?
तदमाताय .... हे म्हणजे एकता कपूरची सिरीयल वाटायला लागलीय.
ढॅण्ण........... ढॅण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण ........ ढॅण्ण........... ढॅण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण

जेपी's picture

13 Jul 2013 - 11:15 am | जेपी

अपघातात हाताची नस कापली .... फाटली असेल :-)

त्या लॉजीकवर टेलर देखील जीव वाचवू शकेल
प्यान्ट फाटली ती त्याने शिवून दिली. त्यामुळे प्यान्टच्या शिवणी मध्ये पाय अडकून पडला नाही. अपघात टळला .जीव वाचला.
सही: सही रे सही. भरली माझी वही

भावना कल्लोळ's picture

13 Jul 2013 - 5:31 pm | भावना कल्लोळ

काय खतरनाक चिरफाड केली आहे सर्व मिपा बंधूनी, पहिल्या जन्मी सर्वजण सर्जन व्हता का रा बंधुनो? काहि तरी सर्जनशीलता (सज्जनशीलता) दाखवा, किती ते नामोहरम… वाचवत नाही हो … बाकी अजून प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत. Nerd smiley face

विजुभाऊ's picture

13 Jul 2013 - 5:53 pm | विजुभाऊ

ही घ्या सर्जनशीलता. अर्थात आमच्या अल्पमती प्रमाणे
http://misalpav.com/node/25166

रेवती's picture

15 Jul 2013 - 4:08 am | रेवती

सर्वजण सर्जन व्हता का
व्हय जी! पन कोंच्या प्रकारचे ते म्हायतीये का? ;)

भाते's picture

13 Jul 2013 - 8:47 pm | भाते

हे ओल्ड मंक (ओम) आहे तरी काय? सगळे एवढी तारीफ करताहेत त्याची?
एकदा गावठी पिऊन बघा, कशी नशा होते ते. रस्त्यावरची गाडी काय, आपण आकाशात विमान चालवतो आहोत असे वाटते, च्यामायला.

आपण आकाशात विमान चालवतो आहोत
झाऽऽऽलं, मिळाली नवीन कल्पना! आता बघाच फुडल्या ष्टोरीत काय होतय!

कपिलमुनी's picture

15 Jul 2013 - 2:25 pm | कपिलमुनी

पुढच्या वेळी ते बाईकने विमानाला धडक देणार..

गवि , टंकनिकेला बोलवा ...नविन ष्टूरी येणार आहे ..विमान अपघाताची

बाळ सप्रे's picture

15 Jul 2013 - 2:33 pm | बाळ सप्रे

एकदा रजनीकांत नेटवर आपलेच जोक्स वाचत असतो .. आणि आपल्यावरच खूष होत असतो..
तो अचानक मिसळपाव उघडतो .. आणि चक्कर येउन पडतो ..
का बरं ???????
:-)

चिगो's picture

14 Jul 2013 - 7:15 pm | चिगो

३ क्वार्टर 'ओम' मारल्यावर हिरोला बाइक चालवता येते, थंडी वाजते, आणि रात्रीच्या वेळी समोरुन येणार्या कारमधली 'लाईन' ओळखून तिच्या कारला ठोकता पण येते !? :-D 'सुपरहीरो'च आहे की हा.. नुसता निशःब्दच नाही, गतप्राण झालोय मी.. ;-) च्यायला, तीन क्वर्टर मारल्यावरही माझी कल्पनाशक्ती एवढी तरल होणे शक्य नाही..:-D.

सोत्रि's picture

14 Jul 2013 - 11:11 pm | सोत्रि

च्यायला, तीन क्वर्टर मारल्यावरही माझी कल्पनाशक्ती एवढी तरल होणे शक्य नाही

चिगो, कल्पनाशक्ती एवढी तरल व्हायला शुद्ध असावी लागते! तीन क्वॉर्टर मारल्यावर, जाऊदे....
:D

- (क्वॉर्टरच्या हिशोबात पिणे बंद केलेला) सोकाजी

चिगो's picture

15 Jul 2013 - 9:32 pm | चिगो

मी तर दारुच्या बाबतीत भैताडच आहे.. पण दहा-पाच कथांमध्ये दारु ओतलेल्या मंदाररावांनी अशी गफलत करावी म्हणजे लैच आहे की..

चिगो's picture

14 Jul 2013 - 7:30 pm | चिगो

आयुष्यात कधी भेट झालीच तर तुला ' ओल्ड मंक' किंवा म्हणशील तर सिक्कीममध्ये मिळते ती 'मंक' शेपच्या वाटलीतली रम भेट माझ्याकडून.. एवढा बेक्कार हसायचा चान्स दिलास तू, भाऊ.. =)) =))

lakhu risbud's picture

15 Jul 2013 - 8:49 am | lakhu risbud

कात्रे साहेब या कथेचा शेवट अशी करता येऊ शकतो का बघा .

दामिनीच्या नवर्याने चौकशी केल्यावर त्याला निलेश च्या दामिनिवरील प्रेमाबद्दल कळाले …….

मग त्याला निलेश च्या दामिनिवरील खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार होऊन तो संगम मधल्या राजेंद्रकुमार सारखा स्वतः च्या डोळ्यावर जळती मेणबत्ती मारून आंधळा होतो आणि निलेश आणि दामिनीच्या लग्नाला होकार देतो.

……………… मग त्याला निलेश च्या दामिनिवरील खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार झाला आणि दामिनिनेच त्याचे प्रेम नाकारले म्हणूनच निलेश या अवस्थेला पोचला या निष्कर्षावर पोचला . दामिनीला धडा शिकवण्यासाठी मग निलेश आणि दामीनीचा नवराच लग्न करण्याचा निर्णय घेतात.

स्पंदना's picture

15 Jul 2013 - 9:09 am | स्पंदना

अहो अगदी बुडापास्न हसु फुटल ना राव!

दिपक.कुवेत's picture

15 Jul 2013 - 2:59 pm | दिपक.कुवेत

दामिनी त्या दोघांचं लग्न पाहुन नि:शब्द होते :D. बाय द वे दामिनीचा नवरा कोणत्या विषयात डॉ. होता?

विजुभाऊ's picture

15 Jul 2013 - 3:04 pm | विजुभाऊ

तो अर्धमागधी मधे डॉ. होता.

बॅटमॅन's picture

15 Jul 2013 - 3:15 pm | बॅटमॅन

म्हंजे नक्की काय? मागधीचा अर्धा डॉ. होता की अर्धवट मागधी होता की अजून काही?

कोमल's picture

15 Jul 2013 - 3:17 pm | कोमल

:)) :)) :))
च्या मारी...

मनीषा's picture

15 Jul 2013 - 4:18 pm | मनीषा

मनोरंजक कथा !

विजुभाऊ's picture

31 Oct 2013 - 8:52 pm | विजुभाऊ

माताय पुन्हा एकादा भैताड झालोय सगळे प्रतिसाद वाचून =))

मंदार,

तुमच्या लेखनात सफाई आहे. पण फक्त एका प्रसंगाला वा घटनेला कथेचा आत्मा करण्यापेक्षा कथेतल्या पात्रांची व्यक्तिमत्व , त्यांच्यातले परस्पर संबध (केमिस्ट्री) ठळकपणे समोर येउ दया. मग कथेत जान येईल कथा मोठी होईल पण हरकत नाही , भरपूर वेळ घेवून लिहा.
बाकी दारु ओल्ड मंक होती की RC की signature हे तितकेसे महत्वाचे नाही. तसेच क्वार्टर किती झालेत हे ही महत्वाचे नाहीत.
दामिनीशी झालेला प्रेमभंग रमेश शी बार मध्ये होत असलेल्या गप्पांतून वाचकांसमोर समोर आला असता तर अजून काही संवादातून त्याची उद्विग्नताही वाचकांना कळाली असती. कदाचित त्याच्या दु:खाने वाचकांचे अंतःकरण हेलावले असते. आणि विनोदी अंगाने येणा-या प्रतिक्रिया कमी आल्या असत्या.

फक्त कथानक सांगू नका, कथा फुलवा... All the best.

मंदार कात्रे's picture

3 Nov 2013 - 12:40 pm | मंदार कात्रे

आपल्या सूचनान्बद्दल आभार .पुढील वेळी लक्षात ठेवीन ....

विजुभाऊ's picture

2 Nov 2013 - 11:39 pm | विजुभाऊ

अरे हो दामिनी रमेश ला पट्ट्याने / चाबकाने किंवा पट्टीने कसे आनि किती मारायची ते देखील लिहा

मराठी कथालेखक's picture

3 Nov 2013 - 3:02 pm | मराठी कथालेखक

माझी कथा तुम्हाला आवडली नाही हे तर माहीत होते पण ती वाचून तुम्हांस मोठा धक्क बसलाय आणि तुमचे मानसिक संतुलन बिघडलेय हे आता समजले. आता तुमच्या या अवस्थेला अप्रत्यक्षपणे मीच जबाबदार आहे असल्याने तुमच्या वरील तिरसट प्रतिक्रियेबद्दल मी काही नाराजी व्यक्त करु शकत नाही.
असो. तुम्हाला लवकर बरे वाटावे ही सदिच्छा.
Get well soon मामू...

प्यारे१'s picture

4 Nov 2013 - 3:15 am | प्यारे१

>>>तुमचे मानसिक संतुलन बिघडलेय हे आता समजले.
बळंच?
तुमच्या कथेसारखं एक वाक्य विजुभाऊंनी कोट केलं म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं?
मग अशा अनेकानेक वाक्यांनी/परिच्छेदांनी भरलेली कथा लिहीणाराची मन:स्थिती कशी असेल बरं?
बाकी आपली कथा नेमकी कुठून 'प्रेरित' झालेली असावी याचा अंदाज करतोय. :)

माझ्या कथेवरील कोणतीही प्रतिक्रिया त्या धाग्यावर दिली तर समजू शकतो.
मी या धाग्यावर टाकलेली प्रतिक्रिया वाचताना माझे इतर लेखन आठवून त्यांचा ओढून ताणुन संदर्भ देणे चुकीचे आहे.

एखाद्या पोस्टवर (मूळ लेखन वा प्रतिक्रिया) प्रतिक्रिया देतान फक्त त्या पोस्ट मध्ये "काय लिहिले आहे" त्यावरच प्रतिक्रिया व्यक्त करावी. ती पोस्ट "कुणी टाललीये", "टाकणा-याचे आधीचे लेखन" ई संदर्भ गरजेचे नाहीतच.

+१११११११११११११११११११११११११११११

+१११११११११११११११११११११११११११११ प्यारे१ साठी आहे

कथेबद्दल जराही तिर्कस कमेंट सहन करता येत नसेल तर अवघड आहे. विशेषतः इथे या कथेवरचे प्रतिसाद पाहिले तर कारण लक्षात येईल.

मराठी कथालेखक's picture

5 Nov 2013 - 11:50 am | मराठी कथालेखक

कथेबद्दल जराही तिर्कस कमेंट सहन करता येत नसेल तर अवघड आहे. विशेषतः इथे या कथेवरचे प्रतिसाद पाहिले तर कारण लक्षात येईल.

मला कमेंट सहन करता येत नाही वगैरे अनुमान काढू नये. माझ्या कथेवर कमेंट करण्यासाठी तिचा धागा आहे ना , तिथे कितीही तीव्र कमेंट आली तरी ते मी समजू शकतो. पण इतर ठीकाणी मी काही लिहिले असेल तर त्यावर कमेंट करताना माझ्या त्या कथेचा संदर्भ ओढुन ताणुन जोडणे न समजण्यासारखे आहे.

lakhu risbud's picture

3 Nov 2013 - 3:33 pm | lakhu risbud

वो मराठी कथालेखक राव तुम्च्जी कथा एवढी बी भारी नवती कि इजुभौंचे संतुलन बिन्तुलन बिघडल.
"मोकालाया दाही दिशा " ह्येच्या एवढी तुमच्या कथेमदी कीचक नाय बगा !

भाते's picture

4 Nov 2013 - 5:37 am | भाते

नि:शब्द वर प्रतिसाद द्यायला त्याचा सगळा इतिहास भुगोल माहित पाहिजे. नाहीतर मिपावर नवीन असलेल्यांचा असा लोचा होतो.

मराठी कथालेखक's picture

4 Nov 2013 - 11:20 am | मराठी कथालेखक

कोणत्याही लेखनावर (खास करुन ते ललित लेखन असेल तर) त्यावर प्रतिक्रिया देताना कोणताही इतिहास, भूगोल माहित असणे गरजेचे आहे असे मला वाटत नाही. तसेच सदस्य मिपावर नवीन आहे की जुना याने काही फरक पडत नाही. मिपा हे केवळ एक व्यासपीठ आहे. ती पोस्ट कुठेही असू शकते.

मंदार यांची ही कथा वाचून मला जे वाटले ते मी व्यक्त केले, त्याकरिता मला त्यांच्या जुन्या लेखनाचा अभ्यास करायची गरज नाही. झालंच तर त्यांना माझी प्रतिक्रिया अनुचित वाटली असे जाणवत नाही. तरी मला हा निरर्थक वाद वाढविण्यात रस नाही. मी मंदार यांना जे सुचविले त्या मुद्यांवर अधिक काही चर्चा करायला आवडेल.

मंदार कात्रे's picture

4 Nov 2013 - 6:37 am | मंदार कात्रे

एखादी कथा तितकीशी दर्जेदार नाही वाटली आपल्याला,म्हणून त्या लेखकालाच दर्जाहीन (?) ठरवण्याचा इतका अट्टाहास ? मिपा सदस्यान्कडून हे अपेक्षित नव्हते .

माझ्या इतर कथान्चा सन्ग्रह इसाहित्य प्रतिश्ठान तर्फे २ महिन्यापुर्वी प्रकाशित झाला ,त्याला भरघोस आनि चान्गला प्रतिसाद मिळाला ,हे इथे नमूद करू इच्छितो .

http://www.esahity.com/2013/09/blog-post_28.html

मी इत्के दिवस मजा म्हणून घेत होतो, पण टवाळक्या आणि कुचाळक्याच करायच्या असतील ,तर नेट वर येताच कशाला राव?

रुस्तम's picture

4 Nov 2013 - 10:08 pm | रुस्तम

http://www.esahity.com/2013/09/blog-post_28.html

404 - Page Not Found
Sorry, the page you are looking for does not exist

मंदार कात्रे's picture

5 Nov 2013 - 11:24 pm | मंदार कात्रे
विनायक प्रभू's picture

4 Nov 2013 - 12:29 pm | विनायक प्रभू

टवाळक्या, कुचाळक्या नको तर नेट वर लिहुच्च नये मु ळा त.
तरी बर अजुन दुध सागर, सद्दाम, मोठ्या विचारी लोकांणी अजुन लक्ष घातलेले दिसत नै.

चित्रगुप्त's picture

4 Nov 2013 - 12:50 pm | चित्रगुप्त

पति-पत्नी रथाची दोन चाके. दोन्ही असली, तरच संसाराचा रथ चालणार, तद्वत या दोन्ही 'निशब्द' कथा आहेत. एक-दुसर्‍याशिवाय अधुर्‍या. दोन्ही वाचल्यावरच खरा वाचनानंद लाभणार.
http://www.misalpav.com/node/25166

विजुभाऊ's picture

4 Nov 2013 - 1:15 pm | विजुभाऊ

एखादी किरकोळ कथा वाचून मानसीक संतुलन बिघडण्याइतके कोणी इथे असेल असे वाटत नाही.
बाकी माझी प्रतिक्रीया या कथेत काय भर टाकता येईल याच्यासंदर्भात होती. नवर्‍याला/ बायकोला पट्ट्याने बडवणार्‍या कथा केवळ एखाद्याचीच मक्तेदारी असेल असे मी तरी मानत नाही.
एखाद्याला काय आवडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लिहीणाराने लिहीत जावे. टीका झाली तर ती हसतखेळत घ्यावी.
जर टीका बोचरी वाटत असेल तर अभीव्यक्तीचा आग्रह ठेवू नये ही अम्मळ सूचना.
असो. रच्याकने माझे मानसीक संतुलन हरवलेय हा शोध लावल्याबद्दल "वाढदिवसाच्या शुभेच्छा"..

रच्याकने माझे मानसीक संतुलन हरवलेय हा शोध लावल्याबद्दल "वाढदिवसाच्या शुभेच्छा"..

:ड :ड

मराठी कथालेखक's picture

5 Nov 2013 - 11:55 am | मराठी कथालेखक

टीका झाली तर ती हसतखेळत घ्यावी.
जर टीका बोचरी वाटत असेल तर अभीव्यक्तीचा आग्रह ठेवू नये ही अम्मळ सूचना.

काय टीका करायची ना ती माझ्या कथेच्या धाग्यावर येवून करावी... कुठेपण उगाचच कुरापत काढण्यात काय धन्यता.
असो. आता हा निरर्थक वाद मला वाढवायचा नाही. या धाग्यावर फक्त या (म्हणजे नि:शब्द) कथेबद्दल बोलायला /सकारात्मक चर्चा करायला मला आवडेल.

विजुभाऊ's picture

5 Nov 2013 - 3:15 pm | विजुभाऊ

या कथेत मी कुठेही तुम्च्या कथेचा संदर्भ थेट दिलेला नाही. कथेत काही अ‍ॅड करण्यासाठीची ती सूचना होती.
त्यामुळे कोणाला मिरच्या झोंबण्याचे कारण नव्हते.
अवांतर : या कथेवर एक विडंबन लिहून दुसरा स्वतन्त्र कथेचा धागा काढला गेला होता http://misalpav.com/node/25166

या कथेच्या कथालेखकाने तो धागा हसतखेळत घेतला.
सकारात्मक चर्चेबद्दल.... या धाग्यावर ओल्डमंक च्या कीक बद्दल चर्चा झालेली आहे.
फक्त एका कॉमेन्ट्स मुळे जर कुरापत काढली असे वाटत असेल तर मग बोलणेच खुंटले. असो. मलादेखील असल्या कुरापतखोरीत इन्टरेस्ट नाहिय्ये.
सकारात्मक म्हणायचेच असेल तर "या पुढे माझ्याकडून हा विषय बंद" हे सकारात्मक वाक्य.

त्यांना सदर कथा फाॅरवर्ड करत आहे. बघा खालील video:
Watch "100 crore ka Qtiyapa : Bollywood Qtiyapa (ft. Anurag Kashyap)" on YouTube - https://youtu.be/veLfT68kJ8w

विजुभाऊ's picture

25 May 2016 - 2:51 pm | विजुभाऊ

हा हा हा