Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मंदार कात्रे on Wed, 07/10/2013 - 22:02
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
त्या संध्याकाळी घरातून निघतानाच नीलेश टेन्शन मध्ये होता ... आज गुरुवार होता, संध्याकाळी देवाजवळ दिवाबत्ती करून स्तोत्र म्हटल्यावर आज घराबाहेर पडू नये असे तीव्रतेने वाटत होते. पण रमेशचा फोन पुन्हा आला तेव्हा साडेसात झाले होते. ...येतोस ना, मी वाट बघतोय...... रमेश आणि नीलेश ची दोस्ती अगदी कॉलेज पासूनची. नीलेश एका कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये अकाऊंटंट होता . मुंबईतली कार्गो लोजीस्टिक्स मधली नोकरी सोडून गेली 2/3 वर्षे आपल्याच गावशेजारी असलेल्या कंपनीत स्थिरावला होता. रमेश गेली दोन वर्षे सौदीला काढून सुट्टीवर आला होता . त्याची पिण्याच्या दृष्टीने सौदीला दोन वर्षे चांगलीच उपासमार झाली होती. त्यामुळे तिथी-वार-सण-उत्सव याची कसलीही फिकीर न करता तो पीत असे. नीलेश चे मात्र तसे नव्हते. नीलेश ही प्यायचा ,पण महिन्यातून 3-4 वेळा , तेही फक्त रविवार –बुधवारीच ... तो तसा धार्मिक होता. पण लग्न होत नसल्याचे टेन्शन कधीकधी असह्य होई,आणि मग त्याला नाइलाजाने बारचा रस्ता धरावा लागे. रमेशचा फोन आला तसा बाईकला किक मारून नीलेश निघाला. आईने विचारलेही……अरे आता रात्रीचा कुठे निघालास ?..रमेशने भेटायला बोलावले आहे ,लगेच येतो परत ..... असे आईला सांगून नीलेश निघाला .... घरापासून बारचे अंतर पंधरा मिनिटात कापून तो बारवर पोहोचला . रमेश आधीच आला होता. मग गप्पांची मैफिल जमली, आणि त्या नादात किती पेग झाले ,त्याचे भान कुणालाच राहिले नाही. नीलेशची एक क्वार्टर ची नेहमीची मर्यादा कधीच ओलांडली गेली होती. डिसेंबर महिना, थंडी आपले रंग दाखवू लागली होती. म्हणून आज ओल्ड मंक होती. एव्हाना साडेदहा झाले होते ,आणि दोघांनीही प्रत्येकी तीन क्वार्टर च्या वर ओल्ड मंक संपवली होती. आता पुरे ....म्हणून बारच्या मॅनेजरनेच त्यांना थांबवले,आणि बार बंद करायचं आहे ,असे सांगून दोघांना उठवले ... मग शेजारच्याच चायनीज गाडीवर ट्रिपल राईस खाल्ला आणि रमेशला घरी सोडून नीलेशने बाइक आपल्या गावाच्या रस्त्याला वळवली . साडेअकरा झाले, एव्हाना थंडी चांगलीच जाणवू लागली होती. गावाकडच्या रस्ता माळरानवरून जात असल्याने वारा सुद्धा भन्नाट लागत होता. थंडी आणि वारा यांचा एकत्रित इफेक्ट झाला आणि ओल्ड मंकने आपले रंग दाखवायला सुरुवात केली .नीलेशचा स्वत:च्या विचारांवर अजिबात कंट्रोल नव्हता . गाडी चालवण्याऐवजी आपण हवेतून उडत आहोत,असेच त्याला वाटू लागले. इतक्यात समोरून एक पॉश कार आली. आणि दामिनी कार चालवत होती. ... दामिनी ........... नीलेशने दामिनीला 4-5 वर्षापूर्वी लग्नासाठी विचारले होते... तो कॉलेजमध्ये असल्यापासूनच तिच्या प्रेमात होता ... पण एकतर्फीच .... त्याला ती खूप आवडायची ... त्याच्या स्वप्नांची राणी तीच होती.... पण..पण... जेव्हा त्याने तिला विचारले ,तेव्हा तिने साफ उडवून लावले.... नीलेश खूप खोलवर दुखावला गेला....तिचा नकार त्याला पचला नाही. प्रेमभंगाचे दू:ख त्याला पेलले नाही. यापुढे लग्न/प्रेम या गोष्टींवर विचारच करायचं नाही ,असे त्याने ठरवून टाकले..... आणि आत्ता , या अवस्थेत तीच दामिनी समोरून कार चालवत येत होती. चांगला डॉक्टर नवरा मिळाला होता तिला ,त्याचीच आलीशान कार घेवून ती निघाली होती... हॉस्पिटल नधून नवर्या.चा फोन आला होता... आज उशिरापर्यंत थांबावे लागणार होते... त्याच्यासाठी जेवण घेवून ती निघाली होती..... आपल्या सगळ्या दू:खाला ही दामिनीच जबाबदार आहे, असा विचार नीलेशच्या मनावर गारुड करू लागला... बदला घे तिचा....... मार मार ................ विचारांचा स्फोट झाला मेंदूत ...................आणि मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याने बाइक तुफानी वेगात सरळ कारवर चढवली...................... जाग आली तेव्हा नीलेश हॉस्पिटल मध्ये होता ....रमेश समोर बसला होता ,आई पायाशी रडत बसली होती. अपघातात त्याच्या उजव्या हाताची नस कापली गेली होती.गेले चार दिवस तो बेशुद्ध होता . कारचे फार नुकसान झाले असले तरी दामिनीला मात्र जास्त दुखापत झाली नव्हती. सुदैवाने तिने नवर्याेला फोन करून अम्ब्युलंस मागवली, आणि नीलेशला हॉस्पिटल मध्ये आणले. मग दामिनीच्या नवर्यावने त्याच्या प्लॅस्टिक सर्जन मित्राला बोलावून ऑपरेशन केले . ...आणि नीलेशला जीवदान मिळाले होते...... थोड्याच वेळात दामिनी आणि तिचा डॉक्टर नवराही तिथे आला . नीलेश ने त्यांचे आभार मानले. पण हताश डोळ्यांनी तो दामिनीकडे बघत राहिला ............. जिला आपण आपले आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल दोषी ठरवून मारायला निघालो होतो...........तिच्यामुळेच आज मृत्युच्या दारातून आपण परत आलो.............हे समजल्यावर नक्की काय बोलावे तेच त्याला कळत नव्हते...........................!
  • Log in or register to post comments
  • 31825 views

प्रतिक्रिया

Submitted by बाळ सप्रे on Mon, 07/15/2013 - 14:33

In reply to बाईक आणि विमान by कपिलमुनी

Permalink

एकदा रजनीकांत नेटवर आपलेच

एकदा रजनीकांत नेटवर आपलेच जोक्स वाचत असतो .. आणि आपल्यावरच खूष होत असतो.. तो अचानक मिसळपाव उघडतो .. आणि चक्कर येउन पडतो .. का बरं ??????? :-)
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Sun, 07/14/2013 - 19:15

Permalink

काय खतरा लिहितोस, भाऊ..

३ क्वार्टर 'ओम' मारल्यावर हिरोला बाइक चालवता येते, थंडी वाजते, आणि रात्रीच्या वेळी समोरुन येणार्या कारमधली 'लाईन' ओळखून तिच्या कारला ठोकता पण येते !? :-D 'सुपरहीरो'च आहे की हा.. नुसता निशःब्दच नाही, गतप्राण झालोय मी.. ;-) च्यायला, तीन क्वर्टर मारल्यावरही माझी कल्पनाशक्ती एवढी तरल होणे शक्य नाही..:-D.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Sun, 07/14/2013 - 23:11

In reply to काय खतरा लिहितोस, भाऊ.. by चिगो

Permalink

च्यायला, तीन क्वर्टर

च्यायला, तीन क्वर्टर मारल्यावरही माझी कल्पनाशक्ती एवढी तरल होणे शक्य नाही
चिगो, कल्पनाशक्ती एवढी तरल व्हायला शुद्ध असावी लागते! तीन क्वॉर्टर मारल्यावर, जाऊदे.... :D - (क्वॉर्टरच्या हिशोबात पिणे बंद केलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Mon, 07/15/2013 - 21:32

In reply to च्यायला, तीन क्वर्टर by सोत्रि

Permalink

तेच ना राव

मी तर दारुच्या बाबतीत भैताडच आहे.. पण दहा-पाच कथांमध्ये दारु ओतलेल्या मंदाररावांनी अशी गफलत करावी म्हणजे लैच आहे की..
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Sun, 07/14/2013 - 19:30

Permalink

मंदार

आयुष्यात कधी भेट झालीच तर तुला ' ओल्ड मंक' किंवा म्हणशील तर सिक्कीममध्ये मिळते ती 'मंक' शेपच्या वाटलीतली रम भेट माझ्याकडून.. एवढा बेक्कार हसायचा चान्स दिलास तू, भाऊ.. =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by lakhu risbud on Mon, 07/15/2013 - 08:49

Permalink

या कथेचा शेवट

कात्रे साहेब या कथेचा शेवट अशी करता येऊ शकतो का बघा . दामिनीच्या नवर्याने चौकशी केल्यावर त्याला निलेश च्या दामिनिवरील प्रेमाबद्दल कळाले ……. मग त्याला निलेश च्या दामिनिवरील खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार होऊन तो संगम मधल्या राजेंद्रकुमार सारखा स्वतः च्या डोळ्यावर जळती मेणबत्ती मारून आंधळा होतो आणि निलेश आणि दामिनीच्या लग्नाला होकार देतो. ……………… मग त्याला निलेश च्या दामिनिवरील खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार झाला आणि दामिनिनेच त्याचे प्रेम नाकारले म्हणूनच निलेश या अवस्थेला पोचला या निष्कर्षावर पोचला . दामिनीला धडा शिकवण्यासाठी मग निलेश आणि दामीनीचा नवराच लग्न करण्याचा निर्णय घेतात.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Mon, 07/15/2013 - 09:09

In reply to या कथेचा शेवट by lakhu risbud

Permalink

दया ! रिसबुड दया!

अहो अगदी बुडापास्न हसु फुटल ना राव!
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Mon, 07/15/2013 - 14:59

In reply to या कथेचा शेवट by lakhu risbud

Permalink

हो आणि मग....

दामिनी त्या दोघांचं लग्न पाहुन नि:शब्द होते :D. बाय द वे दामिनीचा नवरा कोणत्या विषयात डॉ. होता?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 07/15/2013 - 15:04

Permalink

तो अर्धमागधी मधे डॉ. होता.

तो अर्धमागधी मधे डॉ. होता.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 07/15/2013 - 15:15

In reply to तो अर्धमागधी मधे डॉ. होता. by विजुभाऊ

Permalink

म्हंजे नक्की काय? मागधीचा

म्हंजे नक्की काय? मागधीचा अर्धा डॉ. होता की अर्धवट मागधी होता की अजून काही?
  • Log in or register to post comments

Submitted by कोमल on Mon, 07/15/2013 - 15:17

Permalink

च्या मारी...

:)) :)) :)) च्या मारी...
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Mon, 07/15/2013 - 16:18

Permalink

छान

मनोरंजक कथा !
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 10/31/2013 - 20:52

Permalink

माताय पुन्हा एकादा भैताड

माताय पुन्हा एकादा भैताड झालोय सगळे प्रतिसाद वाचून =))
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Sat, 11/02/2013 - 18:49

Permalink

एका प्रसंगाला कथेचा आत्मा करणं टाळा

मंदार, तुमच्या लेखनात सफाई आहे. पण फक्त एका प्रसंगाला वा घटनेला कथेचा आत्मा करण्यापेक्षा कथेतल्या पात्रांची व्यक्तिमत्व , त्यांच्यातले परस्पर संबध (केमिस्ट्री) ठळकपणे समोर येउ दया. मग कथेत जान येईल कथा मोठी होईल पण हरकत नाही , भरपूर वेळ घेवून लिहा. बाकी दारु ओल्ड मंक होती की RC की signature हे तितकेसे महत्वाचे नाही. तसेच क्वार्टर किती झालेत हे ही महत्वाचे नाहीत. दामिनीशी झालेला प्रेमभंग रमेश शी बार मध्ये होत असलेल्या गप्पांतून वाचकांसमोर समोर आला असता तर अजून काही संवादातून त्याची उद्विग्नताही वाचकांना कळाली असती. कदाचित त्याच्या दु:खाने वाचकांचे अंतःकरण हेलावले असते. आणि विनोदी अंगाने येणा-या प्रतिक्रिया कमी आल्या असत्या. फक्त कथानक सांगू नका, कथा फुलवा... All the best.
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Sun, 11/03/2013 - 12:40

In reply to एका प्रसंगाला कथेचा आत्मा करणं टाळा by मराठी कथालेखक

Permalink

धन्यवाद

आपल्या सूचनान्बद्दल आभार .पुढील वेळी लक्षात ठेवीन ....
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 11/02/2013 - 23:39

Permalink

अरे हो दामिनी रमेश ला

अरे हो दामिनी रमेश ला पट्ट्याने / चाबकाने किंवा पट्टीने कसे आनि किती मारायची ते देखील लिहा
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Sun, 11/03/2013 - 15:02

In reply to अरे हो दामिनी रमेश ला by विजुभाऊ

Permalink

थोडी विश्रांती घ्या बरं वाटेल...

माझी कथा तुम्हाला आवडली नाही हे तर माहीत होते पण ती वाचून तुम्हांस मोठा धक्क बसलाय आणि तुमचे मानसिक संतुलन बिघडलेय हे आता समजले. आता तुमच्या या अवस्थेला अप्रत्यक्षपणे मीच जबाबदार आहे असल्याने तुमच्या वरील तिरसट प्रतिक्रियेबद्दल मी काही नाराजी व्यक्त करु शकत नाही. असो. तुम्हाला लवकर बरे वाटावे ही सदिच्छा. Get well soon मामू...
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 11/04/2013 - 03:15

In reply to थोडी विश्रांती घ्या बरं वाटेल... by मराठी कथालेखक

Permalink

>>>तुमचे मानसिक संतुलन

>>>तुमचे मानसिक संतुलन बिघडलेय हे आता समजले. बळंच? तुमच्या कथेसारखं एक वाक्य विजुभाऊंनी कोट केलं म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं? मग अशा अनेकानेक वाक्यांनी/परिच्छेदांनी भरलेली कथा लिहीणाराची मन:स्थिती कशी असेल बरं? बाकी आपली कथा नेमकी कुठून 'प्रेरित' झालेली असावी याचा अंदाज करतोय. :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Mon, 11/04/2013 - 11:14

In reply to >>>तुमचे मानसिक संतुलन by प्यारे१

Permalink

जिथल्या प्रतिक्रिया तिथेच द्याव्यात ना...

माझ्या कथेवरील कोणतीही प्रतिक्रिया त्या धाग्यावर दिली तर समजू शकतो. मी या धाग्यावर टाकलेली प्रतिक्रिया वाचताना माझे इतर लेखन आठवून त्यांचा ओढून ताणुन संदर्भ देणे चुकीचे आहे. एखाद्या पोस्टवर (मूळ लेखन वा प्रतिक्रिया) प्रतिक्रिया देतान फक्त त्या पोस्ट मध्ये "काय लिहिले आहे" त्यावरच प्रतिक्रिया व्यक्त करावी. ती पोस्ट "कुणी टाललीये", "टाकणा-याचे आधीचे लेखन" ई संदर्भ गरजेचे नाहीतच.
  • Log in or register to post comments

Submitted by रुस्तम on Mon, 11/04/2013 - 22:02

In reply to >>>तुमचे मानसिक संतुलन by प्यारे१

Permalink

+१११११११११११११११११११११११११११११

+१११११११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments

Submitted by रुस्तम on Mon, 11/04/2013 - 22:04

In reply to +१११११११११११११११११११११११११११११ by रुस्तम

Permalink

+१११११११११११११११११११११११११११११ प्यारे१ साठी आहे

+१११११११११११११११११११११११११११११ प्यारे१ साठी आहे
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 11/04/2013 - 12:40

In reply to थोडी विश्रांती घ्या बरं वाटेल... by मराठी कथालेखक

Permalink

कथेबद्दल जराही तिर्कस कमेंट

कथेबद्दल जराही तिर्कस कमेंट सहन करता येत नसेल तर अवघड आहे. विशेषतः इथे या कथेवरचे प्रतिसाद पाहिले तर कारण लक्षात येईल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Tue, 11/05/2013 - 11:50

In reply to कथेबद्दल जराही तिर्कस कमेंट by बॅटमॅन

Permalink

कमेंट योग्य ठिकाणी असावी

कथेबद्दल जराही तिर्कस कमेंट सहन करता येत नसेल तर अवघड आहे. विशेषतः इथे या कथेवरचे प्रतिसाद पाहिले तर कारण लक्षात येईल.
मला कमेंट सहन करता येत नाही वगैरे अनुमान काढू नये. माझ्या कथेवर कमेंट करण्यासाठी तिचा धागा आहे ना , तिथे कितीही तीव्र कमेंट आली तरी ते मी समजू शकतो. पण इतर ठीकाणी मी काही लिहिले असेल तर त्यावर कमेंट करताना माझ्या त्या कथेचा संदर्भ ओढुन ताणुन जोडणे न समजण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by lakhu risbud on Sun, 11/03/2013 - 15:33

Permalink

एवढी बी भारी नवती

वो मराठी कथालेखक राव तुम्च्जी कथा एवढी बी भारी नवती कि इजुभौंचे संतुलन बिन्तुलन बिघडल. "मोकालाया दाही दिशा " ह्येच्या एवढी तुमच्या कथेमदी कीचक नाय बगा !
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Mon, 11/04/2013 - 05:37

Permalink

लोचा!

नि:शब्द वर प्रतिसाद द्यायला त्याचा सगळा इतिहास भुगोल माहित पाहिजे. नाहीतर मिपावर नवीन असलेल्यांचा असा लोचा होतो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Mon, 11/04/2013 - 11:20

In reply to लोचा! by भाते

Permalink

कोणत्याही लेखनावर (खास करुन

कोणत्याही लेखनावर (खास करुन ते ललित लेखन असेल तर) त्यावर प्रतिक्रिया देताना कोणताही इतिहास, भूगोल माहित असणे गरजेचे आहे असे मला वाटत नाही. तसेच सदस्य मिपावर नवीन आहे की जुना याने काही फरक पडत नाही. मिपा हे केवळ एक व्यासपीठ आहे. ती पोस्ट कुठेही असू शकते. मंदार यांची ही कथा वाचून मला जे वाटले ते मी व्यक्त केले, त्याकरिता मला त्यांच्या जुन्या लेखनाचा अभ्यास करायची गरज नाही. झालंच तर त्यांना माझी प्रतिक्रिया अनुचित वाटली असे जाणवत नाही. तरी मला हा निरर्थक वाद वाढविण्यात रस नाही. मी मंदार यांना जे सुचविले त्या मुद्यांवर अधिक काही चर्चा करायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Mon, 11/04/2013 - 06:37

Permalink

एखादी कथा

एखादी कथा तितकीशी दर्जेदार नाही वाटली आपल्याला,म्हणून त्या लेखकालाच दर्जाहीन (?) ठरवण्याचा इतका अट्टाहास ? मिपा सदस्यान्कडून हे अपेक्षित नव्हते . माझ्या इतर कथान्चा सन्ग्रह इसाहित्य प्रतिश्ठान तर्फे २ महिन्यापुर्वी प्रकाशित झाला ,त्याला भरघोस आनि चान्गला प्रतिसाद मिळाला ,हे इथे नमूद करू इच्छितो . http://www.esahity.com/2013/09/blog-post_28.html मी इत्के दिवस मजा म्हणून घेत होतो, पण टवाळक्या आणि कुचाळक्याच करायच्या असतील ,तर नेट वर येताच कशाला राव?
  • Log in or register to post comments

Submitted by रुस्तम on Mon, 11/04/2013 - 22:08

In reply to एखादी कथा by मंदार कात्रे

Permalink

404 - Page Not Found

http://www.esahity.com/2013/09/blog-post_28.html 404 - Page Not Found Sorry, the page you are looking for does not exist
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Tue, 11/05/2013 - 23:24

In reply to 404 - Page Not Found by रुस्तम

Permalink

लिन्क

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/abhas_haa.pdf
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 11/04/2013 - 12:29

Permalink

नेट

टवाळक्या, कुचाळक्या नको तर नेट वर लिहुच्च नये मु ळा त. तरी बर अजुन दुध सागर, सद्दाम, मोठ्या विचारी लोकांणी अजुन लक्ष घातलेले दिसत नै.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Mon, 11/04/2013 - 12:50

Permalink

पति-पत्नी रथाची दोन चाके

पति-पत्नी रथाची दोन चाके. दोन्ही असली, तरच संसाराचा रथ चालणार, तद्वत या दोन्ही 'निशब्द' कथा आहेत. एक-दुसर्‍याशिवाय अधुर्‍या. दोन्ही वाचल्यावरच खरा वाचनानंद लाभणार. http://www.misalpav.com/node/25166
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 11/04/2013 - 13:15

Permalink

एखादी किरकोळ कथा वाचून

एखादी किरकोळ कथा वाचून मानसीक संतुलन बिघडण्याइतके कोणी इथे असेल असे वाटत नाही. बाकी माझी प्रतिक्रीया या कथेत काय भर टाकता येईल याच्यासंदर्भात होती. नवर्‍याला/ बायकोला पट्ट्याने बडवणार्‍या कथा केवळ एखाद्याचीच मक्तेदारी असेल असे मी तरी मानत नाही. एखाद्याला काय आवडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लिहीणाराने लिहीत जावे. टीका झाली तर ती हसतखेळत घ्यावी. जर टीका बोचरी वाटत असेल तर अभीव्यक्तीचा आग्रह ठेवू नये ही अम्मळ सूचना. असो. रच्याकने माझे मानसीक संतुलन हरवलेय हा शोध लावल्याबद्दल "वाढदिवसाच्या शुभेच्छा"..
  • Log in or register to post comments

Submitted by रुस्तम on Mon, 11/04/2013 - 22:10

In reply to एखादी किरकोळ कथा वाचून by विजुभाऊ

Permalink

हा हा हा :) "वाढदिवसाच्या शुभेच्छा"..

रच्याकने माझे मानसीक संतुलन हरवलेय हा शोध लावल्याबद्दल "वाढदिवसाच्या शुभेच्छा"..
:ड :ड
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Tue, 11/05/2013 - 11:55

In reply to एखादी किरकोळ कथा वाचून by विजुभाऊ

Permalink

योग्य ठिकाणि करा ना टीका

टीका झाली तर ती हसतखेळत घ्यावी. जर टीका बोचरी वाटत असेल तर अभीव्यक्तीचा आग्रह ठेवू नये ही अम्मळ सूचना.
काय टीका करायची ना ती माझ्या कथेच्या धाग्यावर येवून करावी... कुठेपण उगाचच कुरापत काढण्यात काय धन्यता. असो. आता हा निरर्थक वाद मला वाढवायचा नाही. या धाग्यावर फक्त या (म्हणजे नि:शब्द) कथेबद्दल बोलायला /सकारात्मक चर्चा करायला मला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 11/05/2013 - 15:15

Permalink

या कथेत मी कुठेही तुम्च्या

या कथेत मी कुठेही तुम्च्या कथेचा संदर्भ थेट दिलेला नाही. कथेत काही अ‍ॅड करण्यासाठीची ती सूचना होती. त्यामुळे कोणाला मिरच्या झोंबण्याचे कारण नव्हते. अवांतर : या कथेवर एक विडंबन लिहून दुसरा स्वतन्त्र कथेचा धागा काढला गेला होता http://misalpav.com/node/25166 या कथेच्या कथालेखकाने तो धागा हसतखेळत घेतला. सकारात्मक चर्चेबद्दल.... या धाग्यावर ओल्डमंक च्या कीक बद्दल चर्चा झालेली आहे. फक्त एका कॉमेन्ट्स मुळे जर कुरापत काढली असे वाटत असेल तर मग बोलणेच खुंटले. असो. मलादेखील असल्या कुरापतखोरीत इन्टरेस्ट नाहिय्ये. सकारात्मक म्हणायचेच असेल तर "या पुढे माझ्याकडून हा विषय बंद" हे सकारात्मक वाक्य.
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Tue, 11/05/2013 - 23:22

Permalink

ही घ्या लिन्क

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/abhas_haa.pdf
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 10/29/2015 - 20:17

Permalink

अनुराग कश्यप आगामी सिनेमा साठी कथानकाच्या शोधात आहेत .

त्यांना सदर कथा फाॅरवर्ड करत आहे. बघा खालील video: Watch "100 crore ka Qtiyapa : Bollywood Qtiyapa (ft. Anurag Kashyap)" on YouTube - https://youtu.be/veLfT68kJ8w
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 05/25/2016 - 14:51

Permalink

हा हा हा

हा हा हा
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com