बालगीत

'बाळाची शर्यत-' (बालकविता)

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
13 Mar 2014 - 5:51 pm

'
एक दोन एक दोन
बाळाची पावलं
मोजणार कोण . .

तीन चार तीन चार
बाळाच्या पैंजणाचा
नादच फार . .

पाच सहा पाच सहा
बाळाची दुडुदुडु
ऐट किती पहा . .

सात आठ सात आठ
बाळाने धरली
ताईची पाठ . .

नऊ दहा नऊ दहा
बाळाने शर्यत
जिंकली पहा . .
.

बालसाहित्यबालगीत

<काही शंका......>

प्यारे१'s picture
प्यारे१ in जनातलं, मनातलं
13 Mar 2014 - 1:49 pm

गेली कित्येक वर्षे काही शंका मनांत आहेत.

१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का?

२. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत)

३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे?

४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती?

५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले?

६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली?

बालगीतविडंबनशुद्धलेखनराहती जागाकृष्णमुर्तीविरंगुळा

कस्टर्ड ड्रॅगन (Translated Poem)

शुचि's picture
शुचि in जे न देखे रवी...
12 Jan 2014 - 10:18 pm

इवल्याशा खेड्यातील इवल्याशा घरात
बेलिंडा रहात असे सुखात आनंदात
तिच्याकडे होता एक उंदीर, मांजर, कुत्रा
लहान लाल गाड़ी अन ड्रॅगन एक भित्रा
.
मांजराचे नाव तिने ठेवले होते इंक
कार्ड़याशा उंदराला ती हाक मारे ब्लिंक
पिवळा कुत्रा वागायला होता मोठा परखड़
त्याचे नाव मस्टर्ड अन ड्रेगनचे कस्टर्ड
.
कस्टर्ड दिसे भयंकर फार खूंखार
अंगावरती खवले त्याची नखे धारदार
मुख त्याचे आग ओके नाक धूर फेके
त्याला पाहताच सर्वांची उड़े फेफे फेफे
.
बेलिंडाच्या शौर्याला नव्हता पारावार

हास्यबालगीत

कविता - एक खेळ

जेपी's picture
जेपी in काथ्याकूट
2 Dec 2013 - 10:58 am

आम्हाला कविता करन कधी जमलच नाही . पण कविता वाचायला भारी आवडत.
काही गोड प्रसंगी इतरांच्या कविता स्वतच्या नावावर खपवायचा प्रयत्न हि केला .

पूर्वी एका वर्तमान पत्रात कवितेचा एक खेळ यायचा .
तोच खेळ येथे देत आहे .

या खेळाचे नियम फार सोपे आहेत .

मी तुम्हाला काव्याच्या दोन पंगती देत आहे .
तुम्ही प्रतिसादात कमीतकमी दोन जास्तीतजास्त चार ओळी लिहा .

नवरसा पेकी कुठल्या हि रसाच्या आसु द्या .
फक्त वरच्याशी जुळणाऱ्या आणि खालच्याला पूरक आसु द्या .
मी खाली माझ्या दोन ओळी देत आहे .

( चला नांगरूया शेत सारे )

मोदक's picture
मोदक in जे न देखे रवी...
15 Oct 2013 - 3:49 pm

आमचे लाडके लोककवी हभप श्री धनाजीराव यांच्या काव्यजीवनातील चरणकमलांचे तंतोतंत अनुकरण करण्याच्या आमच्या छोट्या प्रयत्नांचे हे पुढचे पाऊल.

चल परत नव्याने सुरू करू सारे या काव्यातून पेरणीचा मनोदय व्यक्त करणार्‍या धनाजीरावांनी नांगरणीवर काहीच भाष्य केले नसल्याने धनाजीरावांच्या गोधडीला ठिगळ लावण्याचा हा प्रयत्न गोड मानून घ्यावा..

***************************************************

अभय-काव्यकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीवाङ्मयशेतीभयानकबालगीतविडंबनव्युत्पत्तीसमाजजीवनमानतंत्रक्रीडाशिक्षणमौजमजा

" चिऊ चिऊ चिडकी - " (बालगीत)

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
25 Jul 2013 - 10:56 am

बाळ दिसला
हळूच हसला
"ये ये" म्हणाला
खाऊ घे म्हणाला -

चिऊ चिऊ चिडकी
बंद खिडकी
चोच आपट
काचेवर टकटक -

बाळाने उघडली
चिऊ चिऊ आली
लाडूचा खाऊ
चोचीने घेऊ -

बाळाने मुठीत
लाडू लपवला
बाळ हळूच
खुदकन हसला -

चिऊ चिऊ चिडली
खाऊसाठी रडली
खिडकी बाहेर
"चिऊचिऊ" ओरडली !
.

बालसाहित्यबालगीतमौजमजा

बाळूचे स्वप्न - (बाल कविता)

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
8 Jul 2013 - 9:08 pm

सशाने धरले सिँहाचे कान
गरगर फिरवून मोडली मान ।

शेळीने घेतला लांडग्याचा चावा
लांडगा ओरडला-धावा धावा ।

मुंगीची ऐकून डरकाळी कानात
हत्ती घाबरून पळाला रानात ।

कासवाने लावली हरणाशी शर्यत
हरीण दमले धापा टाकत ।

उंदराने बोक्याच्या पकडून मिशा
काढायला लावल्या दहा उठाबशा ।

बाळूने मोजले दोन सात चार
स्वप्नात बाळू मोजून बेजार !

'

बालसाहित्यबालगीत

मि.पा. येते.... आणिक जाते

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
15 Jun 2013 - 11:24 pm

ढिशुम क्लेमर ;) --- गेल्या काही दिवसात,मि.पा.चे जे "झाले'',ते स्पॅम अ‍ॅटॅक मुळे झाले,पण प्रस्तुत जिल्बी ही,आंम्हाला मि.पा... आले..आले...अश्या बातम्या लागल्यावर..मि.पा.वर येता येता,जे काही "झाले"..त्यामुळे आलेली आहे,ती तितक्या'च मजेनी चाखावी,ही णम्र विणंती...! :p

(ही जिल्बी,आंम्ही मठ्ठा पीत,मा.आगोबास समर्पित करीत आहोत! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-pillow-fight-games-smiley-emoticon.gif )

कॉकटेल रेसिपीबालसाहित्यहास्यबालगीतविडंबनशुद्धलेखनजीवनमानऔषधोपचारफलज्योतिषमौजमजा

उंदीर मांजराचा खाऊ

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
1 Jun 2013 - 1:29 am

उंदीर मांजराचा खाऊ

एकदा थंडी वाजते म्हणून
एका माऊने केली गाऊ
तेथला उंदीर मनात म्हणाला
आता गुपचूप खाऊ खाऊ

खाऊ होता माऊसमोर
धीर केला उंदराने
हळूच गेला चालत चालत
मांजरीकडे पाहीले त्याने

खाऊचा वास त्याने घेतला
सुटले पाणी तोंडाला
खाऊ न द्यायचा कोणाला
विचार त्याच्या मनातला

डोळे मिटून सताड पडली
अंग चोरून मनी
मिटक्या मारीत खायचा खाऊ
उंदराने स्वप्न पाहीले मनी

होती निसरडी घराची फरशी
तीवरून त्याचा पाय सरकला
आवाजाने माऊ जागी झाली
आयता खाऊ तिला मिळाला

बालगीत

सांग सांग भोलानाथ.. :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
2 May 2013 - 8:45 pm

सांग सांग भोलानाथ

सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून
सुट्टी मिळेल काय?

परवाच कुठेतरी हे गाणं ऐकलं आणि मी एकदम १९७६/७७ सालात पोहोचलो. असेन काहीतरी तिसरी किंवा चवथीत..

संगीतबालगीतशिक्षणमौजमजाआस्वादविरंगुळा