बालगीत

(तू)

प्यारे१'s picture
प्यारे१ in जे न देखे रवी...
29 Apr 2013 - 12:27 pm

बोटांवर चिकटलेल्या फेविक्विकच्या
थेंबासारखा तू
.
पापण्यांच्या कोपर्‍यांवर साठणार्‍या
घाणीसारखा तू
.

कोडाईकनालभूछत्रीभयानकबालगीतविडंबन

मत आणि मु*

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
8 Apr 2013 - 2:12 pm

आमची प्रेरणा
http://www.misalpav.com/node/24432

मत आणि मु* दोन्ही नव्हे हो समान

मत मिळताच नेते टांग वरती करीती
खाल मानेने मेंढरे त्यांना पुन्हा मत देती

पाण्यातुन पैसा नेता भारंभार काढी
कापलेली करंगळी धरे त्याच धारे खाली

मु*ल्या सारखे कधी मत टाकायाचे नाही
की होणारे वाटोळे, तूला दिसतच नाही

मत मागायाला येता, मु* द्यावे आपणही
असे केल्या वीना मूजोरी, यांची संपायची नाही

पैजार ठाकरे

कोडाईकनालभूछत्रीहास्यप्रेमकाव्यबालगीतऔषधोपचारराजकारण

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
2 Apr 2013 - 4:17 pm

आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी.

या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी.

(कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे)

(ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे. तिच्या आईने तीला बर्‍यापैकी कपडे घालुन चित्रीकरणाला पाठवायचे आश्वासन दिले आहे)

कॉकटेल रेसिपीकोडाईकनालभूछत्रीमराठीचे श्लोकशृंगारभयानकहास्यकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र

झुक झुक गाडी -(बालकविता)

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
18 Mar 2013 - 2:47 pm

मित्रांनो या, मैत्रिणीनो या
एकामागे एक उभे राहूया -

दंगामस्ती कमी करूया
झुकझुकगाडी खेळ खेळूया ,

दादा ड्रायव्हर पुढे नेहमी
सर्वामागे गार्ड हजर मी -

हिरवी निशाणी दाखवली
दादाने कुकशिटी वाजवली -

भाकचुक भाकचुक
भाकचुक भाकचुक !

धुराविना ही धावते गाडी
रुळाविना ही पळते गाडी -

जिथून निघालो तिथे जाणार
सांगा आणखी कोण येणार ?

इथेच सगळयाना फिरवीन
गोलगोल चकरा मारीन तीन -

भाकचुक भाकचुक
भाकचुक भाकचुक !

सिग्नल नाही- स्टेशन नाही
गाडी चकरा मारत राही -

बालगीत

" रविवार आज रविवार -" (बालकविता)

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
17 Mar 2013 - 9:48 am

रविवार आज रविवार
किती छान छान वार
अभ्यास नाही शाळा नाही
खूप मजेचा आज वार !

मारामारी आणि कुस्ती
येत नाही मुळीच सुस्ती
खेळ खेळण्यांची कमाल
दिवसभर नुसती धमाल !

दिवसभर खाणेपिणे
नाचणे अन् हुंदडणे
गट्टी फू अभ्यासाशी
कट्टी फक्त खेळण्यांशी !

नाही धपाटा आईचा
नाही रट्टा बाबांचा
ताईचे ऐकायचे नाही
दादाशी बोलायचे नाही !

दोस्तमंडळ झिंदाबाद
मौजमस्ती झिंदाबाद
धिंगाणा गाणे गाणी
रंगीत फुग्याची पिपाणी !

बालगीत

"माझे विमान - "

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
17 Mar 2013 - 12:03 am

ताई, कर ना लौकर घाई
विमान चालू करून देई -
चावी दे तू विमानाला
फिरवून आणिन मी तुजला !

खेळणी पसरली सगळीकडे
विमान सरकत नाही पुढे ,
भूभू, हत्ती, उंट नि घोडा -
विमान आले रस्ता सोडा !

विमान निघाले, हळूच ये ना
तायडे, खेळणी मोडतील ना...
विमान माझे छान किती
वाटत नाही आता भिती !

घेतला वेग विमानाने जरी
मधेच थांबले विमान तरी -
खुर्र्र... खुर्र... खट..गम्मत झाली
बघ ना ताई, चावी संपली !
.

बालगीत

" डराव डराव -"

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
14 Mar 2013 - 1:21 pm

टकमक टकमक बघत बघत
डोळे मोठे आणखी करत

येता जाता डराव डराव
का ओरडता बेडूकराव

तुमच्या उड्या टुणूक टुणूक
चपळाईची मस्त चुणूक

अंगणातल्या डबक्यात
किती करता बाहेर आत

पाण्यात जास्त भिजू नका
डराव डराव गर्जू नका

सर्दी पडसे झाल्यावर
खोकत बसता काठावर

औषध कधी घेत नाही
डराव डराव थांबत नाही

झोपू द्या ना शांत आम्हाला
नाहीतर सांगीन नांव आईला !

बालगीत

" यु आर लेट .. यु फुल !

जेनी...'s picture
जेनी... in जे न देखे रवी...
6 Mar 2013 - 9:49 pm

आज भेटायचे ठरले होतेना आपले किनार्‍यावर ? :(
कितीतरीच उशिर केलास :-/
कितीवेळ एकटीच उभी होते
.
तुझी वाट बघता बघता वरच्या आळीतला नाम्याच आला :(
एकटीला बघुन चल थोडं ओल्यागार रेतीत चालु म्हणाला :P
इतक्यात तुला... दुरुन येताना बघितलं
.
मनाशिच म्हटलं
यु आर लेट.. यु फुल ! :-/
.

भूछत्रीबिभत्सअद्भुतरसबालगीतविडंबन

आजीच्या गोष्टीमधली खार

कौस्तुभ आपटे's picture
कौस्तुभ आपटे in जे न देखे रवी...
17 Feb 2013 - 11:26 am

आजीच्या गोष्टीमधली खार
आठवते मला फ़ार फ़ार
इवलेसे डोळे, मीच मीच खुळे
शेपुट करडी झुपकेदार!

ससेभाऊ टेलर, उंदीरमामा बेकर
मास्तरीण चिंमणाबाई, न्यायाधीश माकड
प्राण्यांची सभा, नी शेपट्यांचा त-हा
असे सारेच किस्से मजेदार
आजीच्या गोष्टीमधली खार

गोष्टीतून आजी दूर दूर नेई
जात जाता अंगणात, आम्हा येई गाई
दादाचे डोके, कुरळे कुरळे
त्यात मधेच फ़िरे तीचा हात
आजीच्या गोष्टीमधली खार

गीत -कौस्तुभ

बालगीत