बोटांवर चिकटलेल्या फेविक्विकच्या
थेंबासारखा तू
.
पापण्यांच्या कोपर्यांवर साठणार्या
घाणीसारखा तू
.
रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन भरकटलेल्या
बेवड्यासारखा तू
.
हवा मारुन मारुन न पेटणार्या
रॉकेल संपलेल्या स्टोव्हसारखा तू
.
हिवाळ्यातल्या थंडीत गारठलेल्या खिडकीखाली
थरथरणार्या मांजराच्या पिलासारखा तू
.
टळटळीत दुपारी तापलेल्या ढगांखालून
वाहणार्या घामाच्या धारेसारखा तू
.
सूर्यास्ताच्या वेळी हटकून
नेहमीच्या जागी पाय वळणारा तू
.
तोंडी नाव आलं तरी ठसठसणार्या
विखारी जखमेसारखा तू
....
तू, तू आणि तू
...
सांग रे नालायका, हो तूच
तू कुठे चचला आहेस?
प्रतिक्रिया
29 Apr 2013 - 1:16 pm | पक पक पक
:bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
29 Apr 2013 - 1:33 pm | सस्नेह
कोडाईकनाल ला इतक्या भयंकर भूछत्र्या उगवतात ..?
29 Apr 2013 - 1:53 pm | अत्रुप्त आत्मा
@सांग रे नालायका, हो तूच
तू कुठे चचला आहेस?>>> =)) =)) =))
29 Apr 2013 - 1:58 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
बाब्बो, काय केलेस रे हे त्या कवितेचे?? ;)
असो. विडबंनकारांना __/\__!! :)
29 Apr 2013 - 2:02 pm | प्यारे१
हलके घेतल्याबद्दल आभारी आहे. :)
29 Apr 2013 - 2:10 pm | बॅटमॅन
अगायायायायाया, मघवानाचे पार श्वानच करून टाकिलेनीत =)) =)) =))
(विडंबनप्रेमी) बॅटमॅन.
29 Apr 2013 - 8:29 pm | अभ्या..
प्यारे श्वा, मध्वा नि युवा एकाच नजरेने पाहतो. ;)
बादवे हे राहीलेच की,
पनीर खाताच खाजणारी
अॅलर्जी तू... ;)
30 Apr 2013 - 2:15 pm | बॅटमॅन
=)) अजून भरः
डास चावताच उठणार्या
खाजेसारखी तू ;)
29 Apr 2013 - 5:18 pm | भावना कल्लोळ
तू कुठे चचला म्हंजे काय रे दादा?
29 Apr 2013 - 8:37 pm | प्यारे१
हा 'प्रेमानं' वापरला जाणारा शब्द आहे.
चचणे = खपणे = हरवणे = मरणे अशा विविधार्थाने वापरला जातो.
उदा. : गावाकडे एखादा थोडा अप्रिय माणूस मेला की अमुक अमुक चचला म्हणण्याची पद्धत आहे.
-४थी स्कॉलरशिपला पास झालेला प्यारे ;)
30 Apr 2013 - 10:04 am | स्पंदना
स्कॉल्लरशीप्प? बाब्वो!!
30 Apr 2013 - 10:06 am | स्पंदना
या ऐवजी
तोंडी नाव आल तरी फटफटणार्या
अस्सल शिव्यांसारखा तू
हे कस वाटेल कविवर्य?
30 Apr 2013 - 11:13 am | कोमल
:)) :)) :))
30 Apr 2013 - 2:10 pm | प्रचेतस
चान चान