(तू)
बोटांवर चिकटलेल्या फेविक्विकच्या
थेंबासारखा तू
.
पापण्यांच्या कोपर्यांवर साठणार्या
घाणीसारखा तू
.
रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन भरकटलेल्या
बेवड्यासारखा तू
.
हवा मारुन मारुन न पेटणार्या
रॉकेल संपलेल्या स्टोव्हसारखा तू
.
हिवाळ्यातल्या थंडीत गारठलेल्या खिडकीखाली
थरथरणार्या मांजराच्या पिलासारखा तू
.
टळटळीत दुपारी तापलेल्या ढगांखालून
वाहणार्या घामाच्या धारेसारखा तू
.
सूर्यास्ताच्या वेळी हटकून
नेहमीच्या जागी पाय वळणारा तू
.
तोंडी नाव आलं तरी ठसठसणार्या
विखारी जखमेसारखा तू
....
तू, तू आणि तू
...
सांग रे नालायका, हो तूच
तू कुठे चचला आहेस?
वाचन
4906
प्रतिक्रिया
0