उंदीर मांजराचा खाऊ

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
1 Jun 2013 - 1:29 am

उंदीर मांजराचा खाऊ

एकदा थंडी वाजते म्हणून
एका माऊने केली गाऊ
तेथला उंदीर मनात म्हणाला
आता गुपचूप खाऊ खाऊ

खाऊ होता माऊसमोर
धीर केला उंदराने
हळूच गेला चालत चालत
मांजरीकडे पाहीले त्याने

खाऊचा वास त्याने घेतला
सुटले पाणी तोंडाला
खाऊ न द्यायचा कोणाला
विचार त्याच्या मनातला

डोळे मिटून सताड पडली
अंग चोरून मनी
मिटक्या मारीत खायचा खाऊ
उंदराने स्वप्न पाहीले मनी

होती निसरडी घराची फरशी
तीवरून त्याचा पाय सरकला
आवाजाने माऊ जागी झाली
आयता खाऊ तिला मिळाला

- पाभे

बालगीत

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

1 Jun 2013 - 2:03 am | प्रभाकर पेठकर

अरे व्वा! मस्त आहे बालगीत.

प्रचेतस's picture

1 Jun 2013 - 5:58 am | प्रचेतस

सुरेख बालगीत.

चाणक्य's picture

1 Jun 2013 - 6:45 am | चाणक्य

छान आहे

प्यारे१'s picture

1 Jun 2013 - 2:33 pm | प्यारे१

मत्त मत्त!

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jun 2013 - 3:35 pm | अत्रुप्त आत्मा

@होती निसरडी घराची फरशी
तीवरून त्याचा पाय सरकला
आवाजाने माऊ जागी झाली
आयता खाऊ तिला मिळाला>>> http://cdn.content.sweetim.com/sim/cpie/emoticons/0002031F.gif

तिमा's picture

1 Jun 2013 - 4:58 pm | तिमा

सतत टॉम अँड जेरी बघितल्यामुळे, शेवटची ओळ पटली नाही.

पाषाणभेद's picture

2 Jun 2013 - 2:36 am | पाषाणभेद

(अन मला वाटलेच होते की कुणालातरी टॉमजेरीची आठवण येईल ती.) टिव्हीचा परिणाम दुसरं काय? :-) ह.घ्या.

तिमांना टॉम अ‍ॅन्ड जेरी मुळे शेवट आवडला नाही. त्यावर प्यारे१ यांनी खालचे कडवे लिहीले आहे:

आयता खाऊ मला मिळाला
वाटून माऊने आ पसरला
उंदीर मोठा चलाख निघाला
माऊच्या समोर नाचून पळाला.

- प्यारे१

पैसा's picture

1 Jun 2013 - 10:13 pm | पैसा

मस्त बालगीत!

किसन शिंदे's picture

1 Jun 2013 - 10:21 pm | किसन शिंदे

बालगीत मस्त लिहलंय हो पाभे.

सस्नेह's picture

2 Jun 2013 - 5:32 pm | सस्नेह

मला खूप खूप आवललं गानं !

भावना कल्लोळ's picture

13 Jun 2013 - 5:36 pm | भावना कल्लोळ

मला पन..

वेल्लाभट's picture

14 Jun 2013 - 4:16 pm | वेल्लाभट

सुंदर ! सुंदर आहे काव्य. सोपं आणि सरळ. आवडलं !

गंगाधर मुटे's picture

9 Jul 2013 - 1:26 pm | गंगाधर मुटे

छान बालगीत.

सुधीर's picture

9 Jul 2013 - 2:18 pm | सुधीर

मस्त बालगीत.

अग्निकोल्हा's picture

9 Jul 2013 - 3:53 pm | अग्निकोल्हा

छानच.

दफोराव कविता लयं आवडली बघा. :)

(बोका ) ;)