सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून
सुट्टी मिळेल काय?
परवाच कुठेतरी हे गाणं ऐकलं आणि मी एकदम १९७६/७७ सालात पोहोचलो. असेन काहीतरी तिसरी किंवा चवथीत..
तसे आम्ही पयल्यापासनंच आळशी.. निसर्गत:च शाळा-अभ्यासाचा जो कंटाळा येतो तसा तो मलाही यायचा.. नुसती मजा करावी.. आईकडून फक्त छान छान लाड करून घ्यावेत, यथेच्छ खेळा-बागडावं, खाऊ खावा असंच आम्हालाही वाटायचं. म्हणजे एका अर्थी एका नॉर्मल मुलाची जी लक्षणं असतात तीच सगळी माझ्यात होती. मग ही शाळेची भानगड कशाला पायजेल?!.. - : )
शाळेत जायची वेळ झाली की मला अगदी कस्सचंच व्हायला लागायचं.. आता शाळेत जायचं, मग बाई जाड्या चष्म्यातून म्हारक्या म्हैशीसारख्या माझ्याकडे बघणार.. 'कस्सा सापडला हा आता पुढले ४-५ तास आपल्या ताब्यात..' असे त्यांच्या चेहर्यावर विजयी भाव.. - : )
मग बाई गृहपाठ विचारणार, पाढे आणि कविता पाठ म्हणायला लावणार.. छ्या छ्या.. नक्को रे बाबा ती शाळा.. - : )
खूप पाऊस पडावा आणि ऐनवेळी अचानक कुणीतरी येऊन सांगावं की 'शाळेभोवती हे मोठ्ठं तळं साचलं आहे.. अगदी गुडघाभर पाणी आहे.. आणि मास्तरीण बाई स्वत:च त्या पाण्यात धब्बाकदिशी पडल्या आहेत आणि म्हणून आज शाळेला सुट्टी आहे.. भोलानाथा.. अगदी अस्संच घडू दे रे बाबा..! - : )
भोलानाथ दुपारी आई झोपेल काय,
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय?
भोलानाथा, अरे आईनं कालच छान लाडू केल्येत रे.. अगदी डबा भरून.. तू खूप पाऊस पाड, मग शाळेला सुट्टी मिळेल, आणि मग दुपारी आई झोपली की मी हळूचकन् त्या डब्यातला लाडू खाईन.. - : )
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा,
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा..?
किती सुरेख कल्पना आहे.. आठवड्यात तीन तीन रविवार..! - : )
भोलानाथा, आज जमलं नाही तर निदान उद्यातरी भरपूर पाऊस पाड रे बाबा.. उद्या गणिताचा पेपर आहे.. आणि माझे पाढे, पावकी/निमकी अजून पाठ व्हायची आहे रे.. भागाकारही मला नीटसा जमत नाही.. बेरीज-वजाबाकी करताना 'हातचा' कसा घेतात तेच अजून मला समजलं नाहीये रे.. उद्या माझं ढोपर तरी खूप दुखू दे किंवा मी 'पोट दुखतंय..' अशी खोटी खोटी अॅक्टींग करू का रे..?
भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळा येऊन दुखेल का रे ढोपर..?
काहीही कर रे भोलानाथा, पण खूप पाऊस पाड आणि शाळेभोवती तळं साचून सुट्टी मिळू दे.. वाटल्यास तुला आईनं केलेला बेसनाचा लाडू देईन.. - : )
खरंच, काही काही गाणी, काही काही आठवणी अवीट असतात, गोड असतात.. आईनं केलेल्या त्या बेसनाच्या लाडवांसारख्याच..!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
2 May 2013 - 9:14 pm | विकास
गाणे अवीट आहे खरे...
भोलानाथाला बिचार्याला काहीच माहीत नसते तो आपले मालकाने दोरीने हालवली की मान हलवतो आणि पाऊस पडेल म्हणून सांगतो. पण बोलविता धनी मात्र त्यातून आजूबाजूंच्यांकडून जे काही पदरात पाडून घेता येतील ते घेत असतो.
यंदा खर्या पावसाचे काय भाकीत आहे ते माहीत नाही, पण तुमच्या लेखांचा मात्र एकदम जोरात पाऊस सध्या पडतोय! मुसळधार पावसाची पण कधी कधी भिती वाटते. ;)
असो.
2 May 2013 - 10:22 pm | विसोबा खेचर
ठीक आहे. सूचक परंतु विखारी प्रतिसाद आवडला. आपणही आहात, आम्हीही आहेत. भोलानाथ सगळं चांगलंच करेल असा ठाम विश्वास आहे. आपला - (आजही आश्वासक) तात्या.
2 May 2013 - 11:28 pm | विकास
प्रतिसाद नुसताच सुचक आहे मात्र तो ज्या अनुभवावर आधारीत आहे तो विखारी आहे असे तुम्ही म्हणू शकाल कदाचीत. असो.
2 May 2013 - 11:48 pm | विसोबा खेचर
मान्य! विखारी अनुभवाप्रमाणेच चांगला अनुभवही निश्चित येईल याची मला खात्री आहे आणि ते येणारा काळच ठरवेल. म्हणूनच प्हटलं होतं की आम्हीही आहोत, तुम्हीही आहात, जिंदगी अभी बाकी है... Let's See! धन्यवाद...
2 May 2013 - 10:27 pm | बंडा मामा
सहमत आहे. गाणे बजावणे, खाणे पिणे, संगित आणि आता शेअर बाजार आणि गुंतवणुकींवरही एक लेख येऊ दे.
2 May 2013 - 11:30 pm | विकास
आता शेअर बाजार आणि गुंतवणुकींवरही एक लेख येऊ दे.
2 May 2013 - 11:55 pm | प्यारे१
-१-(-२)
बाजारात सगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. मिसळपाव हे खुले दालन असेल तर इथे असणार्या ठराविक आयडींवर ठराविक लेख टाकू नये असं सुचवणं देखील चुकीचं वाटतं.
'तात्यांनी' गुंतवणूकीवर अथवा शेअर बाजारावर लेख टाकू नये असं आहे की तात्यांनी 'गुंतवणूकीवर अथवा शेअर बाजारावर' लेख टाकू नये असं आहे?
मिसळपावचे अधिकृत आर्थिक धोरण सर्वांसाठी जाहीर आहे. त्यानुसार आर्थिक व्यवहार स्वतःच्या जबाबदारीवर करावा वगैरे मान्य. पण लेख टाकूच नये????
स्ट्रेंज! अॅट लिस्ट विकासजींकडून तरी....
3 May 2013 - 12:18 am | विसोबा खेचर
माझ्या मते आता अवांतर चर्चा थांबवून सर्व सभासदांनी एका हलक्याफुलक्या अशा मूळ लेखावर काही टिप्पणी केल्यास ते बरे होईल. धन्यवाद...!
3 May 2013 - 12:21 am | प्यारे१
भावना पोचल्या.
विकासजी क्षमस्व.
3 May 2013 - 12:32 am | विकास
गणिताच्या भाषेतच विचार करायचा झाला तर...
-१-(-२) => -१ +२ => +१ थोडक्यात अप्रत्यक्ष सहमतीबद्दल धन्यवाद :-)
अगदी बरोब्बर! म्हणूनच आपण अनुभवावरून एखाद्या दुकानात जायचे का नाही ते इतरांना सांगत असतो ना! तेव्हढंच समजा म्हणजे झालं.
अहो विकास पण माणूसच आहे! :-) तरी देखील स्ट्रेंज म्हणल्यामुळे मला एकदम नोबेल विजेत्या ग्रामिण बँकवाल्या मोहम्मद युनुस यांचे एक वाक्य आठवले... My greatest challenge has been to change the mindset of people. Mindsets play strange tricks on us. We see things the way our minds have instructed our eyes to see.
असो.
3 May 2013 - 12:25 am | सूड
मराठी बालगीताचं मराठीतलं भाषांतर आवडलं. :)
3 May 2013 - 12:30 am | उपास
मराठीतून शिकलात काय आणि इंग्लिश मधून शिकलात काय.. :)
3 May 2013 - 6:40 am | साऊ
मी मिसळ्पावची खुप जुणी वाचक आहे. तात्यांचे लेख ही माझ्यासारख्या वाचकांसाठी अगदी पर्वणीच. तात्या कुणाबद्दलही लिहिताना अगदी तळमळीणे लिहीतात, मग ती रोशनी असो वा आणि कोणी. तसे तात्या बरेच मोठे हस्ती असावेत, कारण सुधीर फडकें, भिमसेन जोशी, अगदी नवा सलीले कुलकर्णी, नाना पाटेकर, सगळे सगळे त्यांच्या अगदी रोजच्या बैठकीतले. पण मग मध्यंतरी काहीबाही वाचल अन मग त्या नंतर ही घोषणा आली. तात्यांच्या लिखाणाची अतिशय मोठी चाहती असल्याणे तात्यांवर पुण्हा कोणतेही बालंट येउ णये याची मला वैयक्तीक जबाबदारी घ्यावीशी वाटते.
त्या णात्याणे मी महत्वाची सूचना - आर्थिक व्यवहार आणि मिसळपाव ही लिंक देते आहे.
मला वाटतय सर्वांनीच पुन्हा एकदा हे वाचावे. अन तात्यांना वाचवावे.
3 May 2013 - 7:52 am | विसोबा खेचर
Kind attn : नीलकांत आणि संपादक मंडळ. - माझ्या सदर लेखावर वरील बरीचशी चर्चा पूर्णत: गैरलागू आहे असे वाटते. कृपया लक्ष घालणे.
3 May 2013 - 9:14 am | कुंदन
सारखं काय रे "नीलकांत आणि संपादक मंडळ...."
त्यांना काय बाकी कामे नाहीत का रे ? ;-)
3 May 2013 - 9:08 am | कुंदन
"$ झाला खोटा" असा बदल करावा का आता?
3 May 2013 - 9:54 am | मदनबाण
चला कुद्या बोलला तर ! मी वाट पाहतच होतो आता बोलेल, आता बोलेल... शेवटी "भोलानाथ" पावला म्हणायचे तर !
3 May 2013 - 4:52 pm | विकास
>>>शेवटी "भोलानाथ" पावला म्हणायचे तर <<<
मला वाटते तो भोलानाथांवर कावला आहे. ! ;)
3 May 2013 - 9:15 am | श्रीरंग_जोशी
हे गीत मी प्राथामिक शाळेत असताना आकाशवाणीवर लागायचं. पण शाळा त्या काळी अप्रिय वाटत नव्हती.
हलका फुलका लेख आवडला. फोटोंनी ४ चंद्र लावले आहेत.
4 May 2013 - 2:31 am | अभ्या..
श्रीरंगा, रोजच्या रोज गृहपाठ पूर्ण असणार्या, सर्व शिक्षकांकडून 'हुशार आहे जोशी' असे कौतुक मिळवणार्या, घरी आले की हात्पाय्तोंड धूवून रामरक्षा म्हणणार्या मुलांना कशी अप्रिय वाटेल रे शाळा? ;)
हो की नै?
(हल्के घे रे बाबा ;) )
4 May 2013 - 3:49 am | श्रीरंग_जोशी
प्राथमिक अन माध्यमिक शाळेत गुरूजनांकडून असेच कौतुक व्हायचे. जे महाविद्यालयात गेल्यावर जोशीसाहेब केवळ फायनल परीक्षेतच पेपर लिहायचे कष्ट घेतात अशा कौतुकात परावर्तित झाले :-).
बाकी मला कळत नसताना १-२ स्तोत्रे पाठ करविली गेली असतील पण कळायला लागल्यापासून जी स्त्रोत्रांकडे जी पाठ फिरवली ती आजवर. गेल्या वर्षी गणेशोत्सवामध्ये अथर्वशीर्षाचे पारायण सुरू असताना सतरंज्या टाकायला म्हणून तिथे पोचलो अन एक जण जो छापिल अथर्वशीर्ष वाचणार्या गड्याला म्हणालो, अच्छा ते अथर्वशीर्ष का काय म्हणतात ते हेच का? हे ऐकून कुठून आला रे हा? असे भाव त्याच्या चेहर्यावर उमटले.
4 May 2013 - 12:37 pm | वेताळ
माझ्या लहान पोरी तर जाम आवडते.