चल परत नव्याने सुरू करू सारे
नांगरले नव्हते कधीच शेत असे पुन्हा नांगरु
पाटाला येईलच पाणी वरच्या
त्या पाण्या समेच आपलं बियाणं पेरुन टाकू
खुप केले आपण नियोजनाने पीक घेणे
त्या पल्ल्याड जाऊन फक्त पीकासाठी राबू
असेल अजूनही सळसळता जोम आपल्यातही
त्या रगेल पणाची थोडी चव चाखून पाहू
चल बरोबर मिळून राबू जरासे
भूगर्भातील अंकुरापर्यंत पर्यन्त असेच आपण पोहोचू
शेतात असणारच उंचसखल थोडेसे खोलगट
त्यातूनच आपल्या मेहनतीचा अर्थही नव्याने उमजू
प्रतिक्रिया
14 Oct 2013 - 6:28 pm | पैसा
अश्लील! अश्लील!
14 Oct 2013 - 6:29 pm | धन्या
अश्लील काय आहे तेव्हढं सांगा. :)
14 Oct 2013 - 6:36 pm | पैसा
यावर उतारा म्हणून एक मारुतीस्तोत्र लिहा!
14 Oct 2013 - 6:42 pm | बॅटमॅन
हे आले अश्लीलतामार्तंड लगेच ओरडत! काय अश्लीलतेचे फ्यासिनेशन असते नै लोकांना ;) =))
शेतकर्याच्या कष्टमय जीवनाचे जोमाने भरलेले आशावादी वर्णन अतिशय आवडले. उंचसखल भाग सपाट करण्याची मेहनत हे एक प्रतीक मात्र आहे. जीवनातील अडचणींवर प्रयत्नाचा रोलर फिरवण्याचा दुर्दम्य आशावाद आहे तो. बाकी रगेलपणाची चव चाखण्याचे वर्णन केशवसुतांनीही काही अंशी "काठोकाठ भरू द्या पेला, फेस उसळू द्या" इ.इ. सांगितले आहेच. नियोजनापोटी सहजप्रेरणा दाबून टाकण्याऐवजी दोहोंचा संगम करू असा उदात्त विचार धनाजीराव मांडताहेत आणि तुम्ही अश्लील म्हणताय! नव्या पिढीचे काही काही कौतुक म्हणून नाही तुम्हाला. अशा वृत्तीमुळेच देश मागे पडलाय.
(चल परत नव्याने अर्थ लावू)
14 Oct 2013 - 7:00 pm | पैसा
आम्ही मारे नव्या पिढीने दादा कोंडक्यांच्या वाटेने जाऊ नये म्हणून रक्त आटवतो आहोत आणि यांना त्याचं काहीच नाही? हे राम!
चोरासारखा विचार केल्याशिवाय चोरी कशी झाली हे कळत नाही हे आता काय मी परत सांगायला पाहिजे?
14 Oct 2013 - 7:58 pm | सोत्रि
एकतर मला कवितेतले काही कळत नाही. ही कविता जरा सोपी होती आणि समजायलाही साधी सरळ होती म्हणून जरा मन लावून वाचायचा प्रयत्न केला तोच हे संपादक आले अश्लील अश्लील करत.
आता काय जो अर्थ लागला होता तो पण बोंबलला. शॅ...
- (काय अर्थ लावावा ह्या विचारात पडलेला) सोकाजी
15 Oct 2013 - 11:45 am | मालोजीराव
लावलेला अर्थ बोंबलला
14 Oct 2013 - 8:18 pm | बॅटमॅन
रक्त आटवू नका. दूध आटवा, चांगला खवा तयार होईल, तो पेढ्यासाठी वापरता येईल किंवा असाच सुद्धा खाता येईल.
(विटा डेअरी मिरज इथल्या खव्याचा अन नरसोबावाडीतल्या यच्चयावत हलवायांघरच्या पेढ्यांचा फ्यान) बॅटमॅन.
15 Oct 2013 - 11:42 am | मदनबाण
खुप केले आपण नियोजनाने पीक घेणे
त्या पल्ल्याड जाऊन फक्त पीकासाठी राबू
हॅहॅहॅ... ;)
(विटा डेअरी मिरज इथल्या खव्याचा अन नरसोबावाडीतल्या यच्चयावत हलवायांघरच्या पेढ्यांचा फ्यान)
बॅट्या कुरुंदवाडचे फिक्के पेठे खाउन बघ एकदा ! लयं भारी लागतात. :)
{चांगल्या पीक "घेण्यासाठी" कठोर परिश्रमास सदैव तप्तर असलेला. } ;)
15 Oct 2013 - 1:02 pm | बॅटमॅन
येस्सार! नक्कीच ट्राय औट करतो. :)
14 Oct 2013 - 6:30 pm | विजुभाऊ
पाण्या समवेत बीयाणं पेरणार? शेतकरी हैसा का कोन हैसा तुमी ................
15 Oct 2013 - 11:27 am | डॉ सुहास म्हात्रे
ते जल्शेतीचं नविन प्रकर्ण ऐक्लं नाय व्हय तुमी ? त्येच आसलं भौतेक.
14 Oct 2013 - 6:32 pm | मुक्त विहारि
जबरा....
14 Oct 2013 - 6:36 pm | धन्या
या शेतकरी गीताची प्रेरणा चल परत नव्याने सुरू करू सारे हे काव्य आहे.
14 Oct 2013 - 6:40 pm | प्यारे१
शुद्ध भाषेमुळे ही 'प्रायोगिक तत्त्वावर केलेली शेती' वाटत आहे .
गावच्या मातीचा तो घमघमाट धन्यारावांना उपरोक्त शेतीमध्ये गवसलेला दिसत नाही असं खेदानं नमूद करतो. अतिशहरीकरणाचा परिणाम असावा.
धन्याशेठने आपलेच जुने शेतीचे प्रयोग उघडून पुन्हा एकदा पाहून शहरी तण काढून पुनश्च नांगर हाती धरुन नांगरट करावी अशी विनंती ह्याठिकाणी आम्ही करत आहोत.
पुन्हा शेतीसाठी शुभेच्चहा. ;)
14 Oct 2013 - 6:44 pm | बॅटमॅन
"शुभेच्चहा" वाचून प्यारेकाकांनी टंकण्याआधी "कुकूऽचकू" ऐकले होते असे वाटले. "शुभेऽच्चहा"!!
14 Oct 2013 - 6:58 pm | प्यारे१
बरोब्बर ओळखलंत...
जुन्या चित्रपटातल्या संवादाप्रमाणे वाचावे > ह्या शहरीकरणात; धनाजीरावांची प्रतिभा; ज्याप्रमाणे आपल्या शक्तीचा मारुतीला विसर पडला होता; त्याप्रमाणे; विसरली गेली आहे; झोपली गेली आहे; तिला खडबडून जागं करण्यासाठी; आपल्या शुभेच्चांबरोबर 'चहा' ची गरज नाही का बरे? ;)
14 Oct 2013 - 7:01 pm | बॅटमॅन
बरे च्या जागी चुकून गडे वाचलं आणि हसून डोळे अंमळ पाणावले.
14 Oct 2013 - 7:53 pm | विजुभाऊ
आमच्या "मनमिळाऊ मारुतीला" चहासोबत एक धूम्रशलाका लागते तरच त्याला जागृत अवस्था प्राप्त होते
14 Oct 2013 - 8:44 pm | प्रचेतस
शेतकर्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धनाजीरावांना शतःश धन्यवाद.
आता धनाजीरावांना लहानपणी गुरे वळताना आलेल्या 'हुर्र हुर्र' करणार्या अनुभवांबद्दल पण त्यांनी येथे लेखन करावे अशी त्यांना नम्र विनंती.
14 Oct 2013 - 10:47 pm | अत्रुप्त आत्मा
@धनाजीरावांना लहानपणी गुरे वळताना आलेल्या 'हुर्र हुर्र' करणार्या >>> =))
15 Oct 2013 - 9:33 am | किसन शिंदे
+१०० टू वल्ली. =))
धन्याच्या गुरं वळण्याच्या अनुभवांवर ऐकण्यास म्या पण लय उत्सूक हाये.
15 Oct 2013 - 4:28 pm | इरसाल
वाती वळण्यासारखे आहे का ?
14 Oct 2013 - 9:00 pm | शैलेन्द्र
आहा !!!!
लय्यीचं भारी...
पीक, पाणी आणि बियाणं याचं अद्वैत जमलं की शेती हे काम न राहता साधना होते.. फक्त ही अशी शेती रब्बीच्या हंगामात, हिवाळ्यात करावी, म्हणजे थकवा कमी येतो..
वा वा..
14 Oct 2013 - 10:53 pm | अत्रुप्त आत्मा
@भूगर्भातील अंकुरापर्यंत पर्यन्त असेच आपण पोहोचू>>> =))
पोहोचली.... जिथे पोहोचायची तिथे कविता पोहोचली! =))
कष्टाळू-घामगाळकर श्रमिक कवी धनाजी राव (हवा तो)शीन दे! :-D
यांचा इजय असो!!! =))
14 Oct 2013 - 11:13 pm | बॅटमॅन
कविता बघून रसिक खूष, मिळालेला प्रतिसाद पाहून धनाजीराव खूष, तर शेवटी भांडे अखेरीस लपलेले पाहून बुवाही खूष!!! क्या बात है. कविता करावी तर अशी. मान गये धनाजीराव ;)
14 Oct 2013 - 11:15 pm | प्रचेतस
बाकी ते लपायचा प्रयत्न करत असलेले भांडे तुम्ही पुन्हा पुन्हा हुडकून बाहेर काढ्त असता त्याचे काय? =))
14 Oct 2013 - 11:20 pm | बॅटमॅन
फक्त आम्हीच नाही, त्या इतिहाससंशोधनात तुमचाही "म्हशीचा" वाटा आहे हे विसरू नका ;)
(पळा आता हल्क येतंय मागे)
15 Oct 2013 - 8:25 am | प्रचेतस
हाहाहा.
बाकी तुमची म्हैस पण यादवकालीन मराठीत व्यायली होतीच की. =))
15 Oct 2013 - 8:50 am | पैसा
त्यानंतर बॅटम्यानने त्याच्याकडच्या विश्वकोषातून "अग अग म्हशी, मला कुठे नेशी" ही म्हण खोडून टाकल्याचे कानावर आले.
15 Oct 2013 - 11:11 am | स्पंदना
कशी हो? कशी हो? कशी व्यायली यादवकालिन मराठीत.
बा द वे वल्लीजी आप पिछले भाग में वो कही घाट मे हुइ चर्चा के बारे मे बाते कर रहे थे। कही ये वो तो नही? आय मिन बाते। समझे ना?
15 Oct 2013 - 11:13 am | प्रचेतस
=))
वोहींच वोहींच.
15 Oct 2013 - 11:17 am | स्पंदना
:))
15 Oct 2013 - 11:40 am | बॅटमॅन
ही ह्ही! ही ह्ही!! ही ह्ही!!! ;)
15 Oct 2013 - 11:09 am | स्पंदना
म्हशीचा? (असामी असामी मधल्या गोरं?? च्या तालावर वाचावे.)
14 Oct 2013 - 11:45 pm | अत्रुप्त आत्मा
आगोबा आग लावे काडिकर! :-\
णिसेध! llllllllluuuuuuuu :P
14 Oct 2013 - 11:14 pm | लौंगी मिरची
भयानक प्रकार आहे विडंबनाचा .
15 Oct 2013 - 10:02 am | धन्या
भयानक कसं काय?
एका प्रेमगीतावर आधारीत हे शेतकरी गीत आहे. त्यात भयानक काय आहे?
15 Oct 2013 - 11:07 am | स्पंदना
धन्याऽऽ ! आता रसग्रहणपण तुम्हीच टाका राव. त्याशिवाय हा ताकाला नेलेला हंडा लपायचा नाही.
15 Oct 2013 - 11:08 am | स्पंदना
सुधारणा
पुरता लपायचा नाही.
15 Oct 2013 - 11:18 am | पैसा
वारंवार ताक आणि भांडं यांची आठवण करून देता आहात ते! आता आणि हंडा? बिचारे अत्रुप्तबुवा गरीब सापडले म्झणून त्यांना चिडवता काय? त्यांना राग आला तर घंगाळ्यावर पण कविता लिहितील. समजलेत क्काय?
15 Oct 2013 - 11:26 am | स्पंदना
घंगाळ्यावर? :))
नको!! नको आत्मुस! नको!
15 Oct 2013 - 11:44 am | बॅटमॅन
घंगाळ्यावर लिहिल्यास २१व्या शतकातील ताम्रपटाची एक वेगळी व्हर्जन म्हणून हा पुरावा खपूनही जाईल. अन इ.स. ४००० च्या वेळचा वल्ली "बुवाकालीन" इतिहासावर पीएचडी करेल त्याला हे उपयोगी पडेल.
15 Oct 2013 - 11:32 am | विजुभाऊ
वारंवार ताक आणि भांडं यांची आठवण करून देता आहात ते!
ते ताक आणि ते भांडं...... घोर अन्याय. फक्त "ते" बद्दल बोलुन तो आणि ती वाचक शब्दांवर अन्याय करणेत आलेला आहे.
तो हंडा , ती कढी हे " तो आणि ती " वाचक शब्द देखील वापरणेत यावेत.
सम्पादक इकडे लक्ष्य देतील काय?
15 Oct 2013 - 11:41 am | स्पंदना
अहो संपादकच मुदपाकखान्यात उतरलेत तर सांगावे काणास?
ओ वल्ली, जरा यादवकालीन मराठीत लिहा वरील वाक्य!
15 Oct 2013 - 2:13 pm | बॅटमॅन
इये मिपाचेया संस्थळी: तयाते संपादकु आणिक सदस्यु: सदस्यु हुंदाडोनि वात आणिती: तर्हीं संपादके ऐसे केलें: कवणासि वदों:
15 Oct 2013 - 2:17 pm | धन्या
ही महानुभाव पंथाच्या ग्रंथांमधील भाषा वाटते.
15 Oct 2013 - 2:49 pm | बॅटमॅन
ते ग्रंथ यादवकालीनच आहेत. :)
15 Oct 2013 - 11:50 am | विजुभाऊ
जरा यादवकालीन मराठीत लिहा वरील वाक्य!
संपादकादी मुत्सद्दीच जर हरप्रकारे मुदपाकखान्यात लाडू वळणेस आणिक जिलबीया तळणेस खासे उतरले करौन इतरेजनांस आता कवणास मुद्दा विदा द्यावा ऐसे प्रश्न पडों लागले. तयास णाविलाज ऐसी अवस्था प्राप्त होतात्सी झाली
15 Oct 2013 - 12:07 pm | प्रचेतस
अहो विजुभौ, तुम्ही ते वाक्य शिवकालीन्/पेशवेकालीन मराठीत लिहिलंय. =))
15 Oct 2013 - 12:09 pm | स्पंदना
15 Oct 2013 - 1:03 pm | बॅटमॅन
आयला, थोरची कुर्हाड म्हणायची का काय ही?
15 Oct 2013 - 2:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
कृहाड "थोर"ची असो किंवा नसो (बादवे, कोण हा थोर?) पण थोरली नक्कीच आहे ;)
15 Oct 2013 - 2:53 pm | बॅटमॅन
थोर हा स्कँडिनेव्हियन पुराणांतील इंद्र. त्याचा हातोडा खरेतर फेमस आहे. त्याच्यावर पिच्चरही बनले आहेत. अॅव्हेञ्जर्स नामक पिच्चरमध्ये त्याचाही रोल आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Thor
15 Oct 2013 - 3:06 pm | सूड
फारच थोर दिसतोय तुमचा हा थोर !!
15 Oct 2013 - 3:38 pm | बॅटमॅन
थोर अन थोरलाही आहेच. :)
15 Oct 2013 - 3:44 pm | धन्या
"व्यासोच्छिष्टं जगत सर्वम" ही ओळ बदलायची वेळ आलीय असं वाटतंय. :)
16 Oct 2013 - 5:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
असं कसं... आर्य तर स्कँडेनेव्हियाचे रहिवासी (फक्त तिकडून इकडे आले की इकडून तिकडे गेले एवढाच काय तो घोळ आहे ;) )... आत्ता इंद्र म्हणजे देवांचा राजा. आता मग तो 'थोर'च नाही काय?
15 Oct 2013 - 2:39 pm | सूड
कवीला शेतीबद्दल असलेली आत्मियता आणि शेती सुरु करण्याबद्दलची ओढ शब्दाशब्दातून दिसली. एक रम्य शेतकरीगीत !!
15 Oct 2013 - 3:53 pm | चौकटराजा
कवि हा परकायाप्रवेशाचा आशीर्वाद लाभलेला असतो. त्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी देखील तो अलौकिक काव्यसंपदा निर्मू शकतो. या कवितेचे कवि बहुदा सोळावं ओलांडून गेले असावेत. त्यांच्या या काव्यात अनेक दृष्टांत आहेत.वा वा ! पण परकाया प्रवेशाचा आशीर्वाद मिळाला म्हणून काय अगदी अंकूरापर्यंत पोहोचायची काय गरज आहे. आपल्याला देण घेणं असतं ते नागरण्याशी व पीक हाती लागण्याशी !
बाकी अनेक निसर्ग कवि मराठीत वाचले. बा भ बोरकर, ना धो महानोर, बालकवि . पण धन्या यांचे निसर्ग कविचे घराणे यांच्या पासूनच चालू होते. हे घराणे फार अभिजात वाटले नाही तरी प्रत्ययकारी नक्कीच आहे !
15 Oct 2013 - 3:54 pm | मृत्युन्जय
श्रमाचे महत्व पटवुन देणारी उत्तम कविता. कामकर्यांच्या चेहर्यावर दिवसरात्र श्रम करुन घाम गाळुन आलेले चैतन्य पदोपदी जाणवते आहे.
उषेच्या गर्भात आदित्याने त्याची किरणे सोडल्यावर नव्या नव्हाळीचा जो उन्मेष जाणवतो तोच या गीतातुन प्रतीत होतो आहे. चला सगळे जण कामात स्वतःला झोकुन देउयात आणि या गीताला एक उन्नत सलामी देउयात.
15 Oct 2013 - 3:59 pm | मोदक
सलामी देण्यात आली आहे!
( झैरात करणारा ;) ) मोदक
16 Oct 2013 - 12:56 pm | प्रसाद गोडबोले
जसा गणपती नंतर पितृपंधरवडा असतो , तसा नवरात्री नंतर अश्लीलपंधरवडा असतो काय ??
16 Oct 2013 - 5:18 pm | धन्या
तुमची अश्लील शब्दाची व्याख्या काय आहे तसेच या विडंबनात अश्लील काय आहे ते सांगू शकाल का?
16 Oct 2013 - 6:08 pm | सूड
आपल्याला कावीळ झाली की जग पिवळं दिसतं म्हणतात. अश्लील काय दिसलं ते आता जरा सांगाच !!
20 Oct 2013 - 1:31 pm | प्रसाद गोडबोले
कावीळ झाल्याचे कबुल करत आहे :D
19 Oct 2013 - 11:53 pm | मारवा
या कवितेत काहीही अश्लील नाही असे माझे प्रांजल मत आहे. जर ही कविता अश्लील वाटत असेल तर मग या संत एकनाथांच्या भारुड ला ही अश्लील च म्हणावे लागेल परंतु ते तसे नाही आहे.
सद्गुरुमाय कुंटीण झाली माझी । व्यभिचारा ठेविलें साये आजी ॥ध्रु०॥
अद्वैताचा मज पांघरविला शेला । एकान्तासी तिणें चालविलें मला ॥ १ ॥
परपुरुषाचे शेजेवरी नेउनी घातली । मागल्याची सोय सोडविती झाली ॥ २ ॥
भ्रांति पदर काढुनी ओढिती झाली । आलिंगन घ्यावया सरसावली ॥ ३ ॥
वासनेचे कंचुक सोडियेले । मायामय कुच हे मर्दियेले ॥ ४ ॥
जीवशिव मिठी घाली धरी आवळून । करून ऐक्यता माझें चुंबिलें वदन ॥ ५ ॥
अलक्ष पदातींत घातलें आसन । देहातीत भोगिला भोग त्याणें ॥ ६ ॥
एका जनार्दनीं भोळी नारी । परपुरुष भोगी निरंतरीं ॥ ७ ॥
20 Oct 2013 - 12:12 am | अत्रुप्त आत्मा
खि: खि: खि: खि: खि: जोरदार +१ :)
20 Oct 2013 - 3:10 am | खटपट्या
मस्त आहे की. हे भारुड तर एकदम आरपार आहे.
20 Oct 2013 - 12:44 pm | प्यारे१
वाह!
अप्रतिम.
सुंदर भारुड.
आता 'असं' काही वाचनात्/बघण्यात आलं की पटकन हे भारुड आठवेल.
20 Oct 2013 - 1:28 pm | प्रकाश घाटपांडे
अश्लील अश्लील! काय हे दिवस आलेत. आदुगर अश्लिल लिवायच आन नंतर जीवशिवा ची भानगड आणून त्याला अध्यात्मिक टच द्यायचा! ही संतांची जुनी खोड आहे. अहो साहित्यात जरा चावट रस पाहिजेच ना? पण अशा साहित्याला प्रतिष्ठा नसल्याने संत तरी काय करनार बिचारे! मंग ओढून तानुन अध्यात्मावर गाड आनून सोडायच.