॥ पगाराचा दिवस॥
पहिल अगदी बर होत
हातात पगार मिळत होता
किती मिळाला पगार
तिथल्या तिथ कळत होता
पगाराचा दिवस तो
सर्वांनाच प्यारा होता
हातात पगार घेण्याचा
आनंदच न्यारा होता
पगाराच्या दिवशी
दांडीबहाद्दर पण यायचे
पगाराच्या रांगेमध्ये
पुढे ऊभे रहायचे
बायको पण विचारायची
झाला का हो पगार?
आणला आहे घरी की
खेळलात सर्व जुगार
मुलांना खाऊ आणायची
हौस तुमची फिटली
स्वतःसाठी मात्र
आणली असेल बाटली
आता मात्र तसे नाही
ईसीएसने पगार जातो
आपापल्या बँकेत
खात्यावरती जमा होतो