रक्तरंग
12 मार्च 1993 ला मुंबईतील साखळी बाँबस्फोटां नंतरच्या होळीच्या दिनी ..........................
रक्तरंग
12 मार्च 1993 ला मुंबईतील साखळी बाँबस्फोटां नंतरच्या होळीच्या दिनी ..........................
रक्तरंग
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे
किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे
तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे
तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला
तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे
कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला
तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरे
लेखणी !!
तिला असेल आठवण आपल्या शेवटच्या भेटीची
अंतर पडण्याआधी लिहिलेल्या जवळच्या शब्दांची
तिही विचारत असेल तुला ...
काही लिहीशील का आज माझ्यासाठी ...!!
भिजलो एकदाच पावसात ...डोळेभरून ...
परत भिजलास का रे कधी ...
भेटलो नेहमी त्याच वाटेत ...नजर टाळून ..
फिरकलास का रे तिथे पुन्हा कधी .....
राखून ठेवलेल्या शब्दांना अर्थ दिलास का रे कधी .....
तिही विचारत असेल तुला ...
काही लिहीशील का आज माझ्यासाठी ...!!
' रक्तरेषा '
वेळीअवेळी
आकाश नुसतेच भरून येते
एकदाचे हमसून बरसत नाही.
लेखणी कुंद कुंद :
नुसतीच ठिबकते ; झरत नाही.
रक्तरेषा :
उभ्या, आडव्या, तिरप्या
भावनेच्या भरातले अर्धेमुर्धे वार
कागदाच्या पोटात धारदार ..
असे स्वतःचेच कैक खून वेळीअवेळी...!
डॉ. सुनील अहिरराव
http://aaskmed2.blogspot.in/2013/03/blog-post_22.html
जन्म देता देता जन्म घेणारी
शब्द नि अर्थ जुळवणारी
उंचच उंच गर्दीमध्ये
बोट घट्ट धरणारी
चिंचा, बोरं, भोवरे, चेंडू
गिरगिर, भिरभिर.. खुलणारी
कधी रुजली हे न कळताही
अंगोपांग बहरणारी
कधी अंग चोरून बसणारी
नको असतानाही असणारी
काही आयुष्यभर दिसत, भासत
हुलकावणी देत राहणारी
उणे अधिक मांडता मांडता
हातचा म्हणून राहणारी
अन् ती.. आभाळागत सदैव जागी
फक्त नजरेत सामावणारी
जगणं-बिगणं सुरू असता
'का? कशासाठी?' हे सांगणारी
हरेक माणूस नागमोडी
कुणीच नाही सुतासारखा
सुरी तयाच्या बगलेमध्ये
जरी दिसे हा दुतासारखा !
बुर्ख्यामध्ये दंतकथेच्या
हरेक किस्सा मृतासारखा
गळ्यास येता : विचारवंत
बनून जातो बुतासारखा !
मृदेत किल्ला कशास बांधा
विरून जातो मुतासारखा..
फिरून व्योमी तिथेच येतो
जन्म असा हा भुतासारखा !
- (C) डॉ.सुनील अहिरराव
http://aaskmed2.blogspot.in/2013/03/blog-post_21.html
केला जरी सर्व भाज्यांनी टाटा
उरतो केवळ मी बटाटा
उन्ह-पाऊस-थंडीत राहतो मी
सान-थोर सर्वांस भावतो मी
गाव-शहर असो पाऊल-वाटा
सर्वत्र दिसतो मी बटाटा
पार्टी असो वा उपास
करती जन माझा तपास
गोड अथवा तिखट
कुरकुरीत वा चिवट
परिस्थिती असो बिकट
असतो मी सदैव निकट
असा मी बटाटा
आहे आणि नाही यांच्या
सीमारेषेवर जगणे तसे
फार अवघड असते गं
------
श्वासाइतकीच सवयीची
झालेल्या तुझ्या आणि
माझ्यातील अंतर
आता समुद्र आणि चंद्राइतकेच आहे
एकतर रात्रिशिवाय नजरानजर नाही
आणि समुद्राला तो चंद्र स्पर्शातित....
आहे आणि नाही यांच्या
सीमारेषेवर जगणे
फार अवघड असते गं
-------
सूर्यास्तानंतर चंद्रोदयापर्यंतच्या वेळात
तुझे भास मृगजळासारखे मागेपुढे करतात
कटलेल्या पतंगामागे धावण्यार्या मुलासारखा
मीही त्यांचा पाठलाग करत राहतो
मगं जाणवत ज्या झाडावर पतंग अडकलाय
गहिवरले नभ भिजले कातळ भोर नवीन उगवली
वियोगव्याकुळ तरिही मन; का नयने आतुरलेली ?
कुंद सभोवर स्तब्ध चराचर प्रतिमा हिरमुसलेली
खोल दर्पणी ध्यास एक मज; स्मितरेषा का पुसलेली ?
दूर कुहुक जणु आर्त शोडषी पर कातरलेली
गूढ व्यथित आभास स्पंदने पथी विखुरलेली
कळे न का असुनी नसलेपण; आभा व्यापलेली
भेटीस्तव हुरहुर बहुधा ही; कळा भावओली
..............................अज्ञात
कातर क्षण, अस्थिर मन
द्यावे झोकून, तुझ्या मिठीत
गुंतता हृदय, निष्काम प्रेममय
अविरत लय, तुझ्या मिठीत
अनावर प्रीती, ओढ सांगाती
प्रेमधारा वर्षति, तुझ्या मिठीत
श्वास गुंफले, द्वैत सरले
भानही नुरले, तुझ्या मिठीत
काहूर थमले, मन सावरले
मेघही बरसले, तुझ्या मिठीत
आधार भावनिक, बळ आत्मिक
आश्वासन प्रेरक, तुझ्या मिठीत