कविता

माय मराठीचे श्लोक...!! (ध्वनीफ़ित)

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
28 Feb 2013 - 10:30 am

माय मराठीचे श्लोक...!!

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

अभय-लेखनमराठीचे श्लोककविताभाषामराठीचे श्लोक

आठवण

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
28 Feb 2013 - 9:44 am

तू लाजतेस जेव्हां
आठवण लाजाळूची

अबोल होतेस जेव्हां
आठवण अबोलीची

आरक्त होतेस जेव्हां
आठवण गुलाबाची

मिठीत असतेस जेव्हां
आठवण कमलदलाची

तू नसतेस तेव्हां -
साठवण निवडुंगाची !
.

कविता

दगड

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
28 Feb 2013 - 9:42 am

इकडून एक दगड फेकला
तिकडून दगड वर्षाव आला

दगडालाही भाव आहे
दगडापासून भिती आहे

दगडाने डोके फोडतात
दगडातून देव घडवतात

दगड हाताळावा तरी कसा
ज्याचा त्याचा प्रश्न तसा

वेळेवर फेकला- जीत आहे
वेळ गेल्यावर- फजीत आहे

दगडात शहाणपणा नसतो
फेकणाऱ्यात नक्कीच असतो

दगडांची इमारत का बांधायची
दगडांची नुसती रास का रचायची

दगडा दगडाची गोष्ट फळली
दगड नसेल त्यालाच कळली !
.

कविता

शिकवण

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
28 Feb 2013 - 9:40 am

किनारा स्तब्ध
मीही स्तब्ध !

अजस्त्र लाटा
लाटामागून लाटा

मोठ्या लाटेत लाट लहान
लहान लाटेत तिच्याहून लहान....

शेवट एकच ,
मोठी कोणती अन् लहान कोणती
कोण करू शकणार गणती ?

रुबाबदार लाट फेसाळणारी
येतात परततात विचारलहरी -

एकच शिकवण मिळते मनाला
तू दिसणार नाहीस नंतर कुणाला !

क्षणभंगुर अस्तित्व होईल पारखे
जगून घे छानसे मनासारखे !
.

कविता

कविंचे काव्य...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
26 Feb 2013 - 6:05 pm

अपल्यातून जर कवि गेले,तर अपला काय असेल सूर?
आणी कवितून काव्य गेले,तर कसा असेल त्याचा नूर? ॥ धृ ॥

अपला उदासपणा जायला,काव्य असणार नाहीत.
कुणी हे संकट दूर करावं,तर कवीच असणार नाहीत.
जगणं सगळं हराम होऊन,आयुष्य होइल भेसूर...॥१॥

कुणीतरी मग कवि व्हायला,शब्दांना खेळवत बसेल.
कल्पना आणी शब्दांचे बंध,नुसतेच 'हवेत' चाळवत बसेल.
नंतर नदीत पाणीच नसतांना,नुसता कोरडाच येइल पूर...॥२॥

मग कविची शब्दांबरोबर,जोरदार लढाई होइल.
लढता लढता नकळत तो,खरा कवि होऊन जाइल.
पण रुपकाशिवाय काव्य म्हणजे,शस्त्रांशिवाय योद्धा शूर...!॥३॥

हास्यकवितामौजमजा

रेशिमगाठी

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
26 Feb 2013 - 4:08 pm

ती व्याकुळ होउन गाते
भावार्त, निरागस गाणी तरुण व्यथांची
अन् मनस्मरणीवर जपते
विस्मरली नावे विरलेल्या शपथांची

ती केविलवाणे हसते
भरल्या डोळ्यांच्या रित्या करून पखाली
दंव जसे फिकटते, विरते
सुकतात आसवे तशीच थबकुन गाली

ती अलिप्त होउन लिहिते
कधि तिचीच असुनी नसते अशी कहाणी
वाचून मनाशी म्हणते
'इतकी अगतिक का असते कुणी दिवाणी?'

भिरभिरत एकटी फिरते
भंगून विखुरल्या स्वप्नांच्या वाटांनी
फिरफिरुन रोज सावरते
घरकूल कैकदा विस्कटले लाटांनी

कविता

एक शांत क्षण

ई-पूर्वाई's picture
ई-पूर्वाई in जे न देखे रवी...
26 Feb 2013 - 2:03 pm

या साऱ्या कोलाहालाचा फक्त ‘समय’ एकटाच ‘गवाह’ आहे,
’Technology’ च्या महापुरात बुडाला जनप्रवाह आहे.

‘T.V’ च्या त्या अखंड भट्टीत संस्कारांची वानवा आहे,
अन ‘internet’ च्या मायाजालाचा मोह हर मानवा आहे.

घरच्यांपेक्षा ‘Facebook – friends’ शी बोलणाऱ्यांची वाहवा आहे,
आणि सदैव ‘messengers’ वर ‘chat’ करणारा आजचा जमाना नवा आहे.

या साऱ्या जंजाळात हरवला माणुसकी चा गारवा आहे,
अन ५००+ ‘FB friends’ असले तरी एकटेपणा जीवा आहे.

कविता

पावसाला बोलवायला हवे आता

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
23 Feb 2013 - 11:54 pm

पावसाला बोलवायला हवे आता
-------
तुझ्यासोबत पहिल्या पावसात भिजतांना
तुझ्या पैंजणांची नादनक्षी मनावर
कोरली होतीस
त्या नक्षीतल्या कुयऱ्यांच्या
चक्रव्युहात अभिमन्यु झाला
होता माझा...
-------
अंगणातला पारिजातकही आता फारच
काकुळतीला आला आहे
तुला आठवतं?
पावसाची रिपरिप चालू झाल्यानंतर
इवलेसे थेंब निथळणाऱ्या पारिजातकाजवळ
तुझ्या ओढणीखाली
ते तुझ्या सुगंधी श्वासात भिजणे
.
.
खरचं पावसाला बोलवायला हवे आता
-------
कोसळणाऱ्या धारांमध्ये
खिडकीतुन हात बाहेर काढून

करुणकविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रतिसादांची कविता !!

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
22 Feb 2013 - 10:05 am

प्रतिसादांची कविता !!

‘आवडलेली ‘

कविता फार आवडली !
शेवटची ओळ जास्त भावली !
कल्पना आहे मस्त !
वाचतांना ४ जिलेब्या केल्या फस्त !

..............." धन्यवाद !!!!"

‘ खूप आवडलेली ‘

Best ! super like !
मस्त जमलंय hike !
नवीन concept मांडलेली कविता !
तुम्ही फार छान लिहिता !

............."Thank you !!!!!"

‘ अर्धीच आवडलेली ‘

कविता

माणूस

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
22 Feb 2013 - 10:04 am

खगांचे थवे, पाखरे ही निरागस
काय कसे रज, कण संचिताचे
थकेनात पंख, खळे ना भरारी
रिते मोकळे सोस, निळ्या अंबराचे

न हेवे न दावे, न साठे कशाचे
हवेसे नितळ, पारदर्शी उसासे
ढळे दिवस कोरा, रात्र आणि काळी
जगाची तमा ना, असे खेळ सारे

माणूस मी, भूक, व्याधी उपाधी
मुळी मूढ ईर्षा, अंध, अंग जाळी
परा, बुद्धी-प्रज्ञा, असूनी उपाशी
अवकाळ मोठा, सदा मोह पाशी

.........................अज्ञात

अद्भुतरसकविता