ती व्याकुळ होउन गाते
भावार्त, निरागस गाणी तरुण व्यथांची
अन् मनस्मरणीवर जपते
विस्मरली नावे विरलेल्या शपथांची
ती केविलवाणे हसते
भरल्या डोळ्यांच्या रित्या करून पखाली
दंव जसे फिकटते, विरते
सुकतात आसवे तशीच थबकुन गाली
ती अलिप्त होउन लिहिते
कधि तिचीच असुनी नसते अशी कहाणी
वाचून मनाशी म्हणते
'इतकी अगतिक का असते कुणी दिवाणी?'
भिरभिरत एकटी फिरते
भंगून विखुरल्या स्वप्नांच्या वाटांनी
फिरफिरुन रोज सावरते
घरकूल कैकदा विस्कटले लाटांनी
मुखवटे कितीक घडविते
लावून वर्ख ती फसव्या हास्यासाठी
हट्टाने बांधत बसते
तुटल्या नात्यांच्या सुटल्या रेशिमगाठी
प्रतिक्रिया
26 Feb 2013 - 4:28 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त!! तुफान!!! भन्नाट !!!!
28 Feb 2013 - 1:19 am | सूड
हेच म्हणतो !
1 Mar 2013 - 12:25 am | अत्रुप्त आत्मा
+++++++++++१११११११११११११११११११११११
26 Feb 2013 - 4:50 pm | पैसा
छान रचना!
27 Feb 2013 - 5:08 am | स्पंदना
हं!
वाचुन एक उसासा दाटला मनात.
27 Feb 2013 - 8:03 am | इन्दुसुता
ती अलिप्त होउन लिहिते
आजकाल तिने लिहीणेही सोडून दिले आहे.
हट्टाने बांधत बसते
तुटल्या नात्यांच्या सुटल्या रेशिमगाठी
त्या अश्या बांधल्या जात नाहीत हे तिला कसे आणि कधी समजणार, कोण समजवणार?
ती एकदा दिसली मजला
आरश्यात पाहता पाहता
मी ओळखले तिजला नाही
आसवात हरवून जाता
कवितेवर प्रतिसाद देण्यासाठी जीव थार्यावर नाही. या निमित्ताने नानांची एक जुनी कविता आठवली " हे अताशा मला काय होते" असे काहीसे शीर्षक होते....
27 Feb 2013 - 11:29 am | फिझा
अतिशय सुंदर कविता ..... खूपच छान मांडली आहे रचना !!अप्रतिम !!
27 Feb 2013 - 11:32 am | नगरीनिरंजन
वा! सुंदर!
27 Feb 2013 - 11:04 pm | शुचि
छान आहे.
28 Feb 2013 - 1:16 am | जेनी...
क्रांती ... तु खरच शतजन्मी मीरा !
मी तुझ्या दोन कविता आईला वाचुन दाखवल्या .
जस्ट फक्त इमॅजिन कर किती कौतुकाने ऐकत होती ती .. खुप छान वाटलं मला ..
थॅंक्स डीअर .
28 Feb 2013 - 1:40 am | अभ्या..
अगदी सहमत.
मिका आणि क्रांतीतैंच्या कविता खरेच फार आवडतात मला आणि सार्यांनाच
28 Feb 2013 - 8:22 am | किसन शिंदे
सुंदर!
28 Feb 2013 - 8:37 am | लौंगी मिरची
सुंदर कविता .
28 Feb 2013 - 5:21 pm | शैलेन्द्र
काळजावर रेघ उमटावी असे शब्द .. सलाम..
28 Feb 2013 - 5:52 pm | अधिराज
खूपच सुंदर!!
28 Feb 2013 - 11:38 pm | सांजसंध्या
अप्रतिम रचना आहे ही