अपल्यातून जर कवि गेले,तर अपला काय असेल सूर?
आणी कवितून काव्य गेले,तर कसा असेल त्याचा नूर? ॥ धृ ॥
अपला उदासपणा जायला,काव्य असणार नाहीत.
कुणी हे संकट दूर करावं,तर कवीच असणार नाहीत.
जगणं सगळं हराम होऊन,आयुष्य होइल भेसूर...॥१॥
कुणीतरी मग कवि व्हायला,शब्दांना खेळवत बसेल.
कल्पना आणी शब्दांचे बंध,नुसतेच 'हवेत' चाळवत बसेल.
नंतर नदीत पाणीच नसतांना,नुसता कोरडाच येइल पूर...॥२॥
मग कविची शब्दांबरोबर,जोरदार लढाई होइल.
लढता लढता नकळत तो,खरा कवि होऊन जाइल.
पण रुपकाशिवाय काव्य म्हणजे,शस्त्रांशिवाय योद्धा शूर...!॥३॥
मग कवि मनात म्हणेल,असे ना का काव्य साधे?
नसल्या कल्पना नसली रूपकं,तर उरेल...तेवढेच काव्य माझे!
अर्थच कळला नाही तर,काय करायचा बाकिचा धूर?...॥४॥
कवि आणी सामान्यजनांचा,सूर साधत इथे आलो...
इतका वेळ तुमच्यात होतो,पण आता बोंबलायला कवि झालो... ;-)
पण तरिही मला स्टेजवर ढकलून,तुमच्यातून करू नका दूर...!!! ॥५॥
कोणिही कित्तीही कवि झाला,तरी गर्दी त्याला हवी असते.
अगदी कॉन्सटेबलचा डी.वाय.एस.पी.झाला,तरी त्यालाही वर्दी हवीच असते.
कारण लेबलं कित्तीही पुसली,तरी मुखवटा कसा सारायचा दूर??? ॥६॥
चला मी खूप पुराण लावलं,आणी तुंम्हीही ते ऐकुन घेतलं.
आता तुंम्हाला सांगतो मी,जाता जाता गुपित आतलं.
गर्दी शिवाय कवि म्हणजे,शेकोटी शिवाय नुसताच धूर...!!! ॥७॥
प्रतिक्रिया
26 Feb 2013 - 6:14 pm | नाना चेंगट
कवि आणि काव्य याठिकाणी अनुक्रमे संपादक आणि संपादन, सल्लागार आणि सल्ला, विचारवंत आणि ओकार्या, इत्यादी टा़कून पाहिलं.
26 Feb 2013 - 9:03 pm | शुचि
मस्त आयडीआ =))
26 Feb 2013 - 6:17 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
आत्मुस... मेल्या कां जिवावर उठलायस??
असो. On serious note:
कविता आवडली, पण पटली नाही..
या वाक्याशी जरा मतभेद आहे. पण कल्पना छानच आहे.
26 Feb 2013 - 6:25 pm | अत्रुप्त आत्मा
@आत्मुस... मेल्या कां जिवावर उठलायस??>>>
26 Feb 2013 - 9:03 pm | पक पक पक
26 Feb 2013 - 8:59 pm | पक पक पक
येकदम्म झिम्माट... :)
26 Feb 2013 - 11:28 pm | प्रचेतस
कविता ठीकठाक वाटली.
26 Feb 2013 - 11:43 pm | अभ्या..
ठिकठाक म्हणजे तशी आवडली आपल्या गुर्जींची आहे म्हणून, पण..
पण ओक्के. :)
26 Feb 2013 - 11:45 pm | प्रचेतस
खी खी.
उगा ओढून ताणून केल्यासारखी वाटली हे खरेच.
पण जाउ दे. एका कवीचे मनोगत आहे ते.
27 Feb 2013 - 3:40 am | फिझा
पण खालच्या ३ कडव्यांमध्ये अचानक इंग्लिश शब्द आले .......अशी वाटली .........