स्वतंत्र
शब्दांनी सजवित जावे
वृत्तांचा ना हव्यास
मज वाटे कविता झाली
असतो रचनेचा भास
मी नाही कुठला पंथी
मज नकाच कोठे जुंपू
कुणी शोधित जाती खांब
मी माझा नाथ स्वयंभू
ही माझी स्वतंत्र रचना
हे माझे निराळे कूळ
तुंम्ही अर्थ शोधुनी जाता
तरी गवसत नाही मूळ
एकाकी या वळणावर
मी पुढे चालतो आहे.
शब्दांचा नाजुक गजरा
मी मनी माळितो आहे.
मज ठाऊक नाही पुढती
असणार कोठचे गाव?
नसतात तेथल्या गावी
कुणी राजा आणिक राव