कविता

उरली फक्त आठवण ..

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
26 Jan 2013 - 5:14 pm

बहरलेला वृक्ष होतो ,
एकदा मी छानसा -
गळुन गेली फूल पाने..
एकटा मी हा असा !

नाचती पक्षी कसे
बघुनिया खांद्यावरी..
खेळताना, होइ मजला
हर्ष माझ्या अंतरी -

फूल फळ हुंगावया
जमति जेव्हां पाखरे -
हृदय माझे भरुनिया
जातसे तेव्हां खरे !

सावली शोधावया
पांथस्थ ते येती कुणी -
बाहु पसरुन स्वागताला
धन्यता वाटे मनीं !

आज काही नाही उरले
भोवती माझे इथे -
एकटा मी दु:ख माझे
सांगतो मजला इथे !
.

करुणकविता

अनुनय

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
25 Jan 2013 - 10:17 am

असतात रंग ढंगहि वेडे
झरतात छटा रत रुधिराच्या
हृदयात बंदिशी अनोळखी
डोळ्यांकाठी रति भावुकशा

खल मदन उरी रण रिपुकांचे
ओठांवरती नित शब्द मुका
काया माया बहु काटेरी
ओढाळ मती अस्वस्थ सखा

चंद्रास न कळते झिजलेले
पाण्यास व्यथा परि आकळते
फेसाळ शिरी कल्लोळे जळ
एकांत कुंद साहतो कळा

सारेच कसे हे अवरोही
तळ नितळ सकळ ढवळे गात्री
आभाळ दूर दूरच सरके
मग श्वास फिरे नत माघारी

डोहात बंद अगणित रात्री
गंधर्व क्षणांच्या गंध कुपी
अस्पर्शधुंद हा ओलावा
अनुनय समिधांचा मापारी

कविता

मनमुक्त

समयांत's picture
समयांत in जे न देखे रवी...
22 Jan 2013 - 1:08 pm

परिधान केलेला घनक्लांत तो,

मनमुक्त बोल उधळत आहे..
जीवाच्या काहिलीने मी शोधत राहतो त्याच्या घनविभोर परिश्रांतीसाठी युगुल युक्त नजारा....
पण दाटून येतो निव्वळ विरहनियुक्त किनारा.. ;)

त्याच्या भेटीच्या असोशीने.....

n

शांतरसकविताचारोळ्यामुक्तकभाषाव्युत्पत्ती

आनंदसागर

श्रिया's picture
श्रिया in जे न देखे रवी...
22 Jan 2013 - 11:10 am

आपला परमात्म्याशी नित्य आणि शाश्वत संबंध आहे.तो धूसर होऊन ह्या जगातील जीवनास प्रारंभ ती "सुरूवात" आणि परमात्म्याशी पुन्हा नित्य,आनंददायी संबंध प्रस्थापित होणे हा "शेवट" किंवा "मोक्ष".ह्या संकल्पनेवर आधारीत ही रचना आहे. कशी वाटली जरूर सांगा!

आनंदसागर

सुरूवात ही तुझ्याकडून
शेवट ही तुझ्याकडेच
पण मधला प्रवासच भरकटलेला
अशाश्वतात गुरफटलेला

ह्या भरकटलेल्या वाटेवरती
पुन्हा गवसतो तोच गांव
विस्मरून ते पावन तत्व
अन् मीही मांडते तोच डाव

कवितामुक्तकसमाज

घे उत्तुंग भरारी,

अनिल तापकीर's picture
अनिल तापकीर in जे न देखे रवी...
21 Jan 2013 - 11:50 am

घे उत्तुंग भरारी,दाही दिशा मोकळ्या आहेत
भिऊ नकोस डगमगू नकोस,अनंत वाट खुल्या आहेत

रस्ते बंद आहेत म्हणून, चालायचे तू थांबू नकोस
नवीन रस्ता शोधण्याचा, प्रयन्त मात्र सोडू नकोस

एका जागी थांबून, तुला कोणी काही देणार नाही
हात हलवल्याशिवाय, घास तोंडात जात नाही

सुरुवातीच्या अपयशानंतर हि, पुढे उज्वल यश आहे
दाट अंधारानंतरही, पुढे तेजस्वी प्रकाश आहे

चढ उतार,सुख दुख: तर जीवनात येतच असतात
इथे समर्थपणे लढनारेच, यशस्वी होत असतात

कविता

ओढ तुझी

आर्णव's picture
आर्णव in जे न देखे रवी...
21 Jan 2013 - 11:31 am

अद्रुश्य भावनांचे,
अस्तित्व जाणवावे.
विसरुनी या जगाला,
तुजला मिठीत घ्यावे.

स्पंदनांनी ही मग,
वेगळे नसावे.
असल्या एका क्षणाचे,
मी काय मोल द्यावे.

असता जवळ तूची,
इतरत्र क्षुद्र आहे.
बिन तू चातक हा मी,
तव-वृष्टी वाट पाहे.

आठवणी तुझ्याच,
एकेक गोड आहे.
या कोरड्या निशांना,
तुझीच ओढ आहे.

कविता

'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

मोदक's picture
मोदक in जे न देखे रवी...
19 Jan 2013 - 9:45 am

3

भूछत्रीभयानकरौद्ररसधर्मकविताप्रेमकाव्यगझलव्याकरणव्युत्पत्तीसमाजजीवनमानऔषधोपचारमौजमजा