नकोस

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
18 Jan 2013 - 10:47 am

ती :-

दिवसभराचा उजेड उतरत जातो
झाडांच्या तळकोषी आरामाला
झिरपत जातो हळू हळू अंधार
व्यापतो आभाळाला........

तो :-

नकोस हिणवू नको ओणवू
सावर ग स्वतःला
नभी चांदणे येइल अलगद
सजविल तव मेण्याला

धुके भ्रमाचे विरघळेल
उदयेल नवी स्वरमाला
हरवुन जाशिल तिथे
सोडशिल ना या जन्माला

संध्या- छाया ऊन-सावल्या
खेळविती हृदयाला
उमलविती रोमांकित वलये
जागविती मधुशाला

रंग नभाचे तसेच आपले
अंत नसे क्षितिजाला
शब्द कुंचले घेउन हाती
हो सुसज्ज लढ्ण्याला

......................अज्ञात

शृंगारकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Jan 2013 - 11:57 am | मिसळलेला काव्यप्रेमी

संध्या- छाया ऊन-सावल्या
खेळविती हृदयाला
उमलविती रोमांकित वलये
जागविती मधुशाला

रंग नभाचे तसेच आपले
अंत नसे क्षितिजाला
शब्द कुंचले घेउन हाती
हो सुसज्ज लढ्ण्याला

व्वाह....

अज्ञातकुल's picture

21 Jan 2013 - 9:57 am | अज्ञातकुल

आभार मिका :-)

सुधीर's picture

19 Jan 2013 - 1:25 pm | सुधीर

त्याचं आणि तीचं पहिलं कडवं छान जमलय.

अज्ञातकुल's picture

21 Jan 2013 - 10:00 am | अज्ञातकुल

आभार सुधिर :-)

सांजसंध्या's picture

20 Jan 2013 - 7:17 am | सांजसंध्या

तिचा सूर निराशावादी वाटतोय.

नकोस हिणवू नको ओणवू
सावर ग स्वतःला...

कुठल्यातरी गंभीर परिस्थितीतून ती स्वतःचा धि:क्कार करण्याइतकी खचलेली असताना तो तिला आधार देऊ पाहतोय. या पार्श्वभूमीवर

रंग नभाचे तसेच आपले
अंत नसे क्षितिजाला
शब्द कुंचले घेउन हाती
हो सुसज्ज लढ्ण्याला

हा जबरदस्त आशावादी आणि सकारात्मक दृष्टीकोण आहे. अप्रतिम कविता.

अज्ञातकुल's picture

21 Jan 2013 - 10:00 am | अज्ञातकुल

हं...... खरंय ससं !! आभार मनापासून. आनंद वाटला प्रतिसाद बघून. :-)

अनिल तापकीर's picture

21 Jan 2013 - 3:17 pm | अनिल तापकीर

आवडली