शब्दांनी सजवित जावे
वृत्तांचा ना हव्यास
मज वाटे कविता झाली
असतो रचनेचा भास
मी नाही कुठला पंथी
मज नकाच कोठे जुंपू
कुणी शोधित जाती खांब
मी माझा नाथ स्वयंभू
ही माझी स्वतंत्र रचना
हे माझे निराळे कूळ
तुंम्ही अर्थ शोधुनी जाता
तरी गवसत नाही मूळ
एकाकी या वळणावर
मी पुढे चालतो आहे.
शब्दांचा नाजुक गजरा
मी मनी माळितो आहे.
मज ठाऊक नाही पुढती
असणार कोठचे गाव?
नसतात तेथल्या गावी
कुणी राजा आणिक राव
शब्दांचा मी सहकारी
वाटांना शोधित जाई
जोवरी मिळे ना वाट
तोवरी तेथला राही...
प्रतिक्रिया
17 Feb 2013 - 9:28 pm | प्रचेतस
खूप सुंदर
सुरेखच झालीय रचना.
17 Feb 2013 - 9:29 pm | शुचि
मस्त!
17 Feb 2013 - 9:33 pm | jaypal
ह्या ओळी वाचुन मी (अजुन) सावरलो नाही
>>>> कुणी शोधित जाती खांब
मी माझा नाथ स्वयंभू
17 Feb 2013 - 10:07 pm | यसवायजी
>> कुणी शोधित जाती खांब >>
;)
-----
बाकी कविता मस्त..
17 Feb 2013 - 11:47 pm | धन्या
गुरुजी (की गुरुची?) विदया गुरुलाच वगैरे वगैरे...
17 Feb 2013 - 11:56 pm | यसवायजी
>> गुरुजी (की गुरुची?) विदया गुरुलाच >>
परतीक्रिया - अॅज एक्स्पेक्टेड.. ;)
गुर्जी रागावू नका बर्का..
17 Feb 2013 - 9:39 pm | पैसा
छानच लिहिलंत बुवा!
17 Feb 2013 - 9:39 pm | सांजसंध्या
सुरेख रचना
18 Feb 2013 - 7:10 am | चौकटराजा
हेच बोल्तो की बुवा लगे रहो !
बाकी बुवा, माळितो की माळतो ? ( बुवा , स्वस्थ बसवत नाही हो ! - आग्या वेताळाचा दोस्त .)
17 Feb 2013 - 10:04 pm | जेनी...
:)
17 Feb 2013 - 10:18 pm | अग्निकोल्हा
.
17 Feb 2013 - 10:21 pm | प्यारे१
छान जमलीये कविता.
17 Feb 2013 - 11:15 pm | अभ्या..
छान गुर्जी. विदाऊट स्मायल्या आलात. जरा चुकल्याचुकल्यासारखे वाटले. पण छान जमलेय.
असेच लिहा (विदाऊट चित्राला विचित्र म्हणले तर चालते का हो, म्हण्जे सचित्रच्या उलट)
17 Feb 2013 - 11:33 pm | मन१
काव्यात एक गेयता आहे. आम्हाला मराठिच्या पाठ्यपुस्तकात "घननीळ सागराचा घननाद येत कानी" अशी सुरुवात असनारी एक कविता होती. ही अगदि त्याच मीटारमध्ये आहे. आवडली.
18 Feb 2013 - 5:48 pm | शुचि
छान आहे कविता.
19 Feb 2013 - 9:54 am | चौकटराजा
लिहिलेली तुम्ही कविता
एक संथ सूर आहे !
पाणी " आत्म्या" पासूनी
परि फार दूर आहे !
19 Feb 2013 - 12:06 pm | अत्रुप्त आत्मा
@पाणी " आत्म्या" पासूनी
परि फार दूर आहे ! >>> =)) छान , डुबवा आंम्हाला अता ;-)
17 Feb 2013 - 11:51 pm | धन्या
बुवा कविता नक्की तुम्हीच लिहिली आहे ना? की कुणी भाडयाने (म्हणजे पैसे घेऊन) तुमच्यासाठी लिहिली आहे?
तुमच्या आजवर प्रसवलेल्या कवितांपेक्षा ही पुर्णपणे वेगळी आहे. आणि हसर्या बाहूल्या नसल्यामुळे छान वाटतंय :)
18 Feb 2013 - 12:00 am | संजय क्षीरसागर
लिहीत रहा!
18 Feb 2013 - 6:53 am | स्पंदना
मस्त हो आत्मुस! कवितेतल्या वर्णनावरुन मला "मिका" ची आठवण आली.
फार छान लिहिलंत आत्मुस! सुरेख कविता. ते खांबाच कडव जरा गंडलय तेव्हढ सुधारा.
18 Feb 2013 - 7:05 am | पाषाणभेद
सुरेख रचना आहे !!
18 Feb 2013 - 8:01 am | मिसळलेला काव्यप्रेमी
बास, कविने फक्त इतकेच करावे, बाकी कविता करवून घेतेच. :)
मस्त झालीये.
18 Feb 2013 - 8:26 am | फिझा
आवडली कविता !!
18 Feb 2013 - 9:05 am | ज्ञानोबाचे पैजार
बुवा, मस्तच.......
एकदम शॉक ट्रीटमेंट...
कविता वाचल्यावर लेखकाच नाव परत एकदा तपाढुन....चिमटा काढुन.....स्वतःला ...
पैजारबुवा,
18 Feb 2013 - 10:02 am | ज्ञानोबाचे पैजार
असे होते वय झाले की.
कविता वाचल्यावर लेखकाच नाव परत एकदा तपासुन पाहिले....चिमटा काढुन.....स्वतःला ...
असे वाचावे... तसदी बद्दल क्षमस्व.
पैजारबुवा.
18 Feb 2013 - 11:02 am | चौकटराजा
वय झाले की अशा तरल कविता सुचतच नाहीत. आमचं असंच झालंय !
18 Feb 2013 - 9:20 am | मनीषा
सुरेख कविता आहे.. अगदी तुमच्या फुलांच्या रांगोळीसारखी
18 Feb 2013 - 10:20 am | क्रान्ति
केवळ अप्रतिम!!!!!!!!!!
18 Feb 2013 - 10:41 am | ५० फक्त
बुवा कविता मस्त,,,, धन्यवाद.
शनिवारच्या रामदेव कट्ट्याच्या swsews आठवणीत एक कडवं, पहा जमलंय का?
काजुंनी सजवित जावे
पिस्त्यांचा ना हव्यास
ही पहा रबडी आली
असतो आईस्क्रिमचा भास
18 Feb 2013 - 10:57 am | अधिराज
कविता आवडली.
18 Feb 2013 - 11:34 am | पक पक पक
एक्दम झक्कास.. :)
18 Feb 2013 - 5:44 pm | अत्रुप्त आत्मा
चौकटराजा>>>
@बाकी बुवा, माळितो की माळतो ? >>> माळतो हेच बरोबर,पण काही ठिकाणी शब्दाला गोलावा आल्याखेरीज समाधान लाभत नाही,म्हणून तसं...इतकच! :-)
@( बुवा , स्वस्थ बसवत नाही हो ! - आग्या वेताळाचा दोस्त .) >>> चालायचच... :-) हा(ही) वयाचाच परिणाम! ;-)
================================================================================
धन्या>>>
@बुवा कविता नक्की तुम्हीच लिहिली आहे ना?की कुणी भाडयाने (म्हणजे पैसे घेऊन)तुमच्यासाठी लिहिली आहे?>>>धनाजीराव, इतकंही महाग नका करू हो आंम्हाला...!!! :-)
@तुमच्या आजवर प्रसवलेल्या कवितांपेक्षा ही पुर्णपणे वेगळी आहे.>>> ही माझी स्वतंत्र रचना
हे माझे निराळे कूळ
तुंम्ही अर्थ शोधुनी जाता
तरी गवसत नाही मूळ........................................................!!! :-)
===============================================================================
aparna akshay>>>
@ ते खांबाच कडव जरा गंडलय तेव्हढ सुधारा.>>> मी नाही कुठला पंथी
मज नकाच कोठे जुंपू
कुणी शोधित जाती खांब
मी माझा नाथ स्वयंभू>>> मुक्त अर्थ- मी या प्रांतात कुठल्याही नव्या अगर जुन्या पंथबाजीला स्वतःला,बांधून/जुंपुन घेण्यास तयार नाही...तेंव्हा काव्य-रसिकानी मला,कुठल्याही नव्या/जुन्या- काव्यप्रकाराच्या/विचारधारेच्या-प्रवाहाचा पुढचा दुवा-मानु नये-(या अर्थी-खांब-हा शब्द आहे.).,कारण--''मी माझा नाथ स्वयंभू'' आहे...म्हणजे मी उघडपणे या प्रांतात आता बंडखोरी करत आहे. किंवा यापुढे माझा स्वतःचा प्रांत/पंथ/प्रवाह निराळाच असेल. :-)
===============================================================================
ज्ञानोबाचे पैजार>>>
@कविता वाचल्यावर लेखकाच नाव परत एकदा तपासुन पाहिले....चिमटा काढुन.....स्वतःला ...>>> मी ही तुमचा प्रतिसाद वाचल्यापासून...असच करून पहात आहे. ;-)
21 Feb 2013 - 9:27 am | चौकटराजा
कुणी शोधित जाती खांब च्या ऐवजी कुणी शोधित जाती झेंडे
कारण कंपू गट पक्ष याचे ओळख चिन्ह झेंडा हे असते. बघा शब्दाला किती महत्व आहे काव्यात. खांब या शब्दाने एकदम
श्वानपंथाची आठवण होते की नाही ?
21 Feb 2013 - 11:00 pm | अत्रुप्त आत्मा
अता याच्यावर मी फार स्पष्टीकरण देत बसत नाही... फक्त शेवतचं एक उदा- देतो...
म्हणजे माझ्या त्याच शब्दावर अडून रहाण्याच्या आग्रहा विषयी कळेल.
18 Feb 2013 - 5:51 pm | बॅटमॅन
आयला!!!!! बुवांची कविता अन तीपण विदौट स्मायली अन टिपिकल कच्चा माल? गोंधळलोच होतो =))
पण नंतर कविता वाचायला सुरुवात केली अन मग एकच शब्द निघाला तोंडातून- "वाहवा!!"
हा उत्तरार्ध विशेष आवडला. जियो!!
19 Feb 2013 - 11:18 pm | कवितानागेश
खूपच आवडली.
पुलेशु
18 Feb 2013 - 7:30 pm | जयवी
सुरेख !!
मस्त वेग आहे कवितेला :)
18 Feb 2013 - 7:35 pm | प्रसाद गोडबोले
ही २ कडवी विशेष भावली
मज ठाऊक नाही पुढती
असणार कोठचे गाव?
नसतात तेथल्या गावी
कुणी राजा आणिक राव
शब्दांचा मी सहकारी
वाटांना शोधित जाई
जोवरी मिळे ना वाट
तोवरी तेथला राही...
क्या बात है !!
20 Feb 2013 - 10:30 am | सुमीत भातखंडे
आवडली कविता
21 Feb 2013 - 8:16 am | अत्रुप्त आत्मा
बॅटमॅन..माऊ..जयवी..गिरिजा...सुमित........ सर्वांना धन्यवाद :-)