प्रेमात धड-पडायचंय

यसवायजी's picture
यसवायजी in जे न देखे रवी...
14 Feb 2013 - 8:02 am

frendz & girlfrindz of MipA.,हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे.. love

भाईलोग्ज, वैसे अपुन जैसे टपोरिकु क्या मालुम, के प्रेम कशाबरोबर खातात ते? पण आपल्याला ट्राय मारायचाय राव एकदा..,

'ते' लै भारी असतय म्हणं..
आज ह्या कवितेपासुन स्टार्टर मारतो..
--------------------------------

आता बंद होतील त्या कट्ट्या वरल्या  शिट्ट्या
रोमिओ-मजनू च्या यादीत add होईल अजून एक पठ्या..
टपोरी गिरी सोडून काहीतरी नवीन TRY करायचंय
मला एकदा त्या so called प्रेमात धड-पडायचंय

एकच coffee, एकच ice-cream, एकच sweetcorn दोघामध्ये खायचंय..
कधी तिची scooty , कधी माझी pulser , कधीतरी सुसाट पन्हाळ्याला जायचंय..

रात्र- रात्र तिच्या आठवणीत जागणं....
massages, chatting, आणि गप्पा मारत बसणं..
च्यायला एवढे subject  कुठून आणतात ?..  study  करायचाय
आणि साला त्या चंद्रात दिसतं तरी काय.. हे मला बघायचंय..
मित्रांनो.. मला एकदा त्या so called प्रेमात धड-पडायचंय

वासू- सपना माफिक वाळू वर नाव कोरणं....
maddy माफिक तिच्या घराबाहेर चक्करा मारणं..
मनाचं हूर- हूरणं आणि दिलाचं  धड-धडणं... FEEL  करायचंय..
मला एकदा त्या so called प्रेमात धड-पडायचंय

म्हणे, पाऊस सुद्धा प्रेमातला थोडा HATAKE असतो..
आठवणींचा एक मोर मनात थुई- थुई नाचतो..
shared छत्रीतली मजा कशी येते बघायचीय..
आणी पावसात एकदा सोबत तिच्या चिंब-चिंब भिजायचंय

तिच्या सौंदर्यावर एकदा, मग कविता करायचीय..
मुलायम केसांशी तिच्या लाडे-लाडे खेळायचंय..
गहिऱ्या त्या डोळ्यात LOST व्हायचंय..
नाजूकसं एक फुल त्या फुलाला gift द्यायचंय..

म्हणे corner seat movie ची मजाच बहुत खूब असते..
कडाक्याच्या थंडीत देखील मिळवायला एक ऊब असते.
Barefoot- hand in hand,  किनाऱ्या वर चालायचंय..
तीच्या आठवणीत लाजत लाजत love-letter लिहायचंय

मित्रांनो.. मला एकदा त्या so called प्रेमात धड-पडायचंय
खरच.. प्रेमात धड-पडायचंय
--------------------------------------------
-S.Y.G.-

कविता

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

14 Feb 2013 - 8:07 am | स्पंदना

पडा! आम्च काही म्हणन नाही.

आत्मुस जरा नजर ठेवा, आज ना उद्या तुम्हाकडेच येतील अस दिसतय.

यसवायजी's picture

14 Feb 2013 - 12:23 pm | यसवायजी

हि माझ्यसाठी धोक्यची सुचना आहे का आत्म्यास आमंत्रण??

यशोधरा's picture

14 Feb 2013 - 8:09 am | यशोधरा

धड-पडायच हा श्लेष आवडला.

यसवायजी's picture

14 Feb 2013 - 10:13 am | यसवायजी

धन्स.

सुदेश's picture

14 Feb 2013 - 10:49 am | सुदेश

छान जमलीय कवीता, खरं म्हणजे प्रेमात धड-पडायंच हे खुपच छान!

श्रिया's picture

14 Feb 2013 - 11:14 am | श्रिया

चांगली लिहली आहे कविता.

पैसा's picture

14 Feb 2013 - 12:27 pm | पैसा

धडपडू नका. धडपणे पडा.

वाह्यात कार्ट's picture

14 Feb 2013 - 6:43 pm | वाह्यात कार्ट

massages, chatting, आणि गप्पा मारत बसणं..

अहो massage सोबत message पण करत जा !!!!! ;)

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Feb 2013 - 10:04 am | श्री गावसेना प्रमुख

त्यांना massage मध्ये आंनद मिळतो ना ,ते कशाला message करतील

यसवायजी's picture

15 Feb 2013 - 11:19 am | यसवायजी

:D

sorry फॉर चुकुन केलेली मिश्टेक..

मसाज हां??

बेटा, मन मे लड्डू फुंटा?

दादा कित्ती कित्ती छान कविता केलीयेस रे :)

:P :D

यसवायजी's picture

16 Feb 2013 - 12:48 am | यसवायजी

:P पूजाक्का मी तुझा खूप खूप आभारी आहे गं.. :P

वेल्लाभट's picture

15 Feb 2013 - 10:54 am | वेल्लाभट

अतिशय छान ! आवडलंय काव्य ! टिपलेले सूक्ष्म बारकावे विशेष !

सस्नेह's picture

15 Feb 2013 - 1:28 pm | सस्नेह

अवश्य पडा ! धडपणे पडण्यासाठी शुभेच्छा !

चला और एक बकरा हलाल होने.. :D

आगाऊ म्हादया......'s picture

1 Apr 2013 - 3:28 pm | आगाऊ म्हादया......

massage(मसाज) नाही रे message !!!!:-D

खो खो हसत सुटलो ते वाचून....मग नॉर्मल ला आल्यावर कविता वाचली ...
छान केलीयस ...
____________________________________________________________