बुद्धी आणि मन….
आपल्या अंतरी नेहमीच अस घडत असत
बुद्धी आणि मनाचं बरयाचदा पटत नसत
एकदा असंच त्याचं पटेनास झाल
या ना त्या कारणावरून सारखच भांडण होवू लागल
भांडता भांडता बुद्धीने घेतला पवित्रा
नि दुषणे लावत बोलू लागली मनाशी
असा कसा रे तू नेहमी वागतोस ..
स्वप्नांच्या दुनियेतच का तू राहतोस
स्वप्न आणि सत्य यातील फरक तुला कधी कळणार
जादूनगरीतून अखेर बाहेर तू कधी येणार
मान्य.. तिथ सगळ अगदी तुझ्या मनासारखे घडत
पण वेड्या … अरे ....
दुरून सुखमय भासणार ते फक्त एक मृगजळ असत
भावनेच्या भरात किती चुकीचे निर्णय घेशील
परिणामाने नंतर किती रे मग रडशील
असा कसा तू नेहमी मूर्खासारखा वागतोस
आणि तुझ्या अशा वागण्याने तू ..
नकळत माझा छळवाद कि रे मांडतोस
किती वेळा सांगितल ‚….
be practical…be practical
तरी परत परत त्याच चुका का रे तू करतोस ?
सांग मला.. तुझे हे किती दिवस चालणार
सावरताना तुला आणखी किती मला त्रास होणार
ऐकून सगळ मन बिचारे झाल मग घायाळ
समजावण्याच्या सुरात बोलू लागल अगदी मवाळ
नको ग अशी तू मला सारखी दुषणे लावूस
कसाही वागलो तरी ..
माझ्या इच्छांना मुरड घालतो मी तूझच ऐकून
माझ्या वागण्याला माझाही असतो ग नाइलाज
आशेच्या हिंदोळ्यावर झुलत असतो मी खुशाल
नकळतच स्वप्नांच्या मागेही मी धावतो
वेड्या आशेने बेमालूमपणे धुंद होतो
का कोण जाने …
सगळ जाणून हि..कसा मी मूर्खासारख वागतो
‘कळतंय पण वळत नाही’ असा कसा मी होवून जातो
पण तरीही …
शेवटी आदेश मात्र तुझेच पाळतो ..
मर्जी तुझी राखण्यासाठी माझी उपेक्षाही मी सहन करतो
असा मी मूर्ख म्हुणुन तर तुझ्या हाती अंकुश आहे
….उगाच का मानवाच्या शरीरात तुला महत्वIच स्थान आहे …
आणि बहुतेक म्हणूनच …
म्हणूनच…. मी तिथे लुब्ध आहे
....सौ स्मिता चौगुले (तेजु)
प्रतिक्रिया
12 Feb 2013 - 6:57 pm | अग्निकोल्हा
आशयही सुंदर.
12 Feb 2013 - 8:30 pm | धन्या
तुमच्या कवितेतील मन शहाण्या माणसाचं दिसतंय. काही वेडया माणसांचं मन त्यांच्या बुद्धीचं मुळीच ऐकत नाही आणि मग नको ते होऊन बसतं. :)
12 Feb 2013 - 8:35 pm | शुचि
सुंदर!
12 Feb 2013 - 8:39 pm | शुचि
मला तो सैनिकांच्या फर्माईशी गाण्यांचा कर्यक्रम, बेला के फूल हा रात्रीचा कार्यक्रम आवडायचे. दुपारची मराठी तर काय वर्णावी महाराजा. खूप नॉस्टॅल्जिक वाटतं आहे आठवून.
12 Feb 2013 - 8:40 pm | शुचि
अरे सॉरी चूकीची खिडकी :(
12 Feb 2013 - 8:46 pm | मनीषा
छान आहे मुक्तक
.... पण कधी कधी मनाचे ऐकण्यातच शहाणपणा आहे हे बुद्धीला फार उशीरा कळतं.
13 Feb 2013 - 8:26 am | स्मिता चौगुले
धन्यवाद सर्वांचे.. :)