कविता

आठवण...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
6 Mar 2013 - 12:10 am

आठवणींनी जीव माझा
बेचैन किती जाहला?
सखये तुझा कुठे तो...
माझाही न राहिला.

दूर किती दूर जाशी
लागे मज हुरंहूरं
शांत आहे ही तृप्तता
की भावनांचे काहूरं?

वेड असे भीत आहे
हाक कशी देऊ मी?
का तुझिया स्मरणाने
फक्त तृप्त होऊ मी???

आसवांचे नजराणे
का मागे प्रीत ही?
सहजाच्या जगण्याची
का अल्लड रीत ही?

दु:ख्ख असे आज नाही
जरी न तुझा राहिलो
देवालयी पुष्पांसम
निर्माल्य अता जाहलो.

वेड्या त्या उद्यानी
तार कुणी छेडिली?
कृष्ण नव्हे कृष्ण अन्
राधा हि न राधा राहिली...

शांतरसकविता

-पारिजातक -

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
5 Mar 2013 - 3:26 am

-पारिजातक -

तुझ्या अंगणातली ती फुले,
ओंजळ भरून घ्यायचे मी ...
तू मात्र ती मोजून बघायचास ,
आणि त्या खोडावर लिहून ठेवायचास.....
मग रागाने फेकून फुले ती, तुझ्याच अंगावर ..
मी निघून जायचे .. तशीच ..!!

दिवस बदलत गेले,
अल्लडपणा संपत गेला ...
मग चुकून समोर आलोच;
तर अडखळत बोलायचो ...
नाहीतर….एरवी नजरही टाळायचो आपण...
..पारिजातक मात्र बहरत राहिला ...तसाच ..!!

कविता

संवाद

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
4 Mar 2013 - 8:18 pm

संवाद स्वरांशी माझा
स्पंदन अविरत रागांचे
हृदयी माया कंठी मार्दव
ओठात जलद शब्दांचे
.........सावल्या किती विझलेल्या
.........झिजलेले कोळ कळांचे
..........नाळेत ओवलेली गांवे
..........अवशेष अमिट नात्यांचे

वाहते प्रवाही गाथा
पेरीत स्मरण मिथकांचे
वादळे पूररेषांची
अंतहीन क्षेत्र नभाचे
...........शत जन्म अधूरे नाथा
...........तोकडे वेध वेदांचे
...........स्तंभीत मती नत माथा
...........रण ओघळते ऋणकांचे

.......................अज्ञात

अद्भुतरसकविता

माय

पंचम's picture
पंचम in जे न देखे रवी...
4 Mar 2013 - 6:07 pm

माय....

मला सुटता सुटेना
माझ्या लेकराची माडी ..
जोडले घरटे कधी रे
वळखीची काडी काडी..

माझ्या पंखातला चिमणा
नवं घरटं बांधतो ..
वेळ नाही माझ्यासाठी
मला दबकत सांगतो ..

नव्या घरट्यात असल
नव्या चिमणीचे राज्य
बघ माऊलीचे पंख
कसे घायाळ रे आज ..

आज माझच लेकरु
दावी आश्रमाचा रस्ता
कशी आली पहा येळ
आज मावळतीले झुकता

पिल्लाची नवी कोठी
किती मोठी रं असावी?
पण माझ्या अडगळीस
तिथे जागा का नसावी?

करुणकविता

अंकुर

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
4 Mar 2013 - 10:22 am

शुष्क दिसे, पोटी पण पाणी,
हृदयी एक कहाणी,
बीजे अगणित दडलेली,..
पाहिली कधी का कोणी ?

श्वासात उसासे जडलेले
आतूर सदा आणीबाणी
छाया मेघांची कुंद जशी
ओठी थिजलेली वाणी ?

सर सर सर शिरवा शिडकावा
काहुरते एक विरह राणी
हुरहुरते सुप्त, डंवरते मन
अंकुरते व्याकुळ धरणी

....................अज्ञात

अद्भुतरसकविता

यु आर लेट यु फुल

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
4 Mar 2013 - 8:15 am

आज भेटायचे ठरले होते आपले किनार्‍यावर
जरा लवकरच आलो
अन् दूर उभा राहिलो
.
मी नसतांनाचा समुद्र आणि
मी तुझ्याबरोबर नसतांनाची तू
दोघांना बघायचे होते म्हणून
.
पण तू माझ्या आधीच पोहचली होतीस
किनार्‍यावर, समुद्राकडे तोंड करून
.
मनात म्हटले,
यु आर लेट यु फुल!
.
बेभान वाहणारा खारट वारा
तुझ्या कुंतलात अडकून तुला छळत होता
वाटले तुझ्या केसांमधून बोटे फिरवून
त्याला मोकळे करावे
पण इतक्यात तू मानेला
एक मोहक झटका देऊन त्याला झटकलेस
वाटले...
यु आर लेट यु फुल!
.

शृंगारकविताप्रेमकाव्यमुक्तक

नास्तिक - भाग २ !!

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
4 Mar 2013 - 6:36 am

नास्तिक - भाग २ !!

कुठे आहेस तू, नाही दिसला मला कधी
जे मानणारे आहेत खूप, त्यांना तरी भेट कधी
“सगळीकडे आहे मी.. हे आकाश, ही धरती, हे विश्वच मी …..
एकदा "समुद्र" म्हणून बघ मला,
या लाटाच देतील सगळी उत्तरे तुला ......"

फिझा ने जब दरिया में पानी को सेह्लाया,
तो जितने बल्खाके पानी किनारोंसे से टकराया,
उतनी बार....... अए खुदा तू याद आया !!

कविता

श्रद्धांजली

शैलेश हिंदळेकर's picture
शैलेश हिंदळेकर in जे न देखे रवी...
3 Mar 2013 - 10:03 pm

नाही विसरलो तुम्हा
स्मॄती अजुन जपल्या
प्रिय होतात रे तुम्ही
परिवारात आपल्या

परिवार म्हणजे मी
आणि भावंडे तुमची
घट्ट होती अशी मैत्री
तेव्हा आपली सर्वांची

होतो एकसाथ जेव्हा
किती वाटायचे छान
सारे लोक न्याहाळती
रोज वळून पाहून

कसे गेलात सोडून
एक एक ते करुन
नाही पाहिलेत तुम्ही
पुन्हा मागेही वळून

वा-यावरती तुमचे
भुरभुरून उडणे
आठवते मज आता
येते मनात रडणे

जाण्यामुळे तुमच्या रे
झाले आहे मी टकला
कंगवाही कधीचा मी
अडगळीत टाकला

कविता

मध्यस्थ

शैलेश हिंदळेकर's picture
शैलेश हिंदळेकर in जे न देखे रवी...
3 Mar 2013 - 10:00 pm

भेट आपुली पहिली वहिली
अशी ठरवली नव्हती
नकोच होते मला कुणी गं
आपल्या अवती भवती

चार फुटांचे अंतर होते
दोघांमध्ये तेव्हा
सवाल माझ्या हृदयीचा
तुज कैसा ऐकू यावा

मनात राहून गेले
सारे शब्द मनातील माझे
माझ्यासम बोलणे
राहिले तसेच अधुरे तुझे

पुन्हा भेटशील एकांती तू
वाट पाहू मी किती
नको आणू पण कुणी
बरोबर मध्यस्थ सोबती

कविता

माय मराठीचे श्लोक...!! (ध्वनीफ़ित)

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
28 Feb 2013 - 10:30 am

माय मराठीचे श्लोक...!!

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

अभय-लेखनमराठीचे श्लोककविताभाषामराठीचे श्लोक