कविता

नाटकी बोलतात साले!

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
25 Apr 2013 - 11:07 am

नाटकी बोलतात साले!

कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!

राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे

रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे

देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;
क्रिया येथे आणि प्रतिक्रिया, दिल्लीत उमटली पाहिजे

अभय-गझलमराठी गझलवीररसअद्भुतरसरौद्ररसकवितागझल

नट्यांचे रहस्य

राजा सोव्नी's picture
राजा सोव्नी in जे न देखे रवी...
24 Apr 2013 - 10:21 pm

रती,रंभा ,मेनका सावध झाल्या ,
मधुबाला,स्मिता ,मुनरो जैश्या वरती गेल्या,
एकमेका करती सेलफोन,
आपल्या पेक्षा ह्या सुंदर कोण?
देवांना घातली त्यांनी आण ,
स्वर्गात नाही अप्सरांचे वाण ,
नका आणू स्वर्गात एकाही नटीला,
पोचल्या असल्या जरी साठीला ,

अभय-लेखनकविता

भेटलाच कधी.....

Bhagwanta Wayal's picture
Bhagwanta Wayal in जे न देखे रवी...
24 Apr 2013 - 6:10 pm

भेटलाच कधी प्रल्हाद तर विचारा त्याला......।
"भक्ती" म्हणजे काय असते ?
देवाचे स्वरुप हे चरचरात असते
कितीही संकटे आली त्याला विसरयचे नसते ॥

भेटलाच कधी ज्ञानेश्वर तर विचारा त्याला......।
"ज्ञान" म्हणजे काय असते ?
सोळव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली
रेड्यामुखी वेद वदवून निर्जीव भिंत चालवली ॥

भेटलाच कधी धृवबाळ तर विचारा त्याला......।
"वैराग्य" म्हणजे काय असते ?
सोडुन रजवैभव त्याने नामस्मरण केले
भेट दिली नारायणाने अढ्ळ पद प्राप्त झाले ॥

कविता

शोध

यशोधरा's picture
यशोधरा in जे न देखे रवी...
24 Apr 2013 - 11:37 am

इतकं कशाला झाकोळायला हवं
माझ्या नसण्याने?

मला शोध ना..
इथं, तिथं,

फुललेल्या रानफुलात,
कोमेजल्या निर्माल्यात.
दवानं भिजलेल्या रानात,
अंगार ओकणार्‍या वाळवंटात.
पक्ष्यांच्या स्वैर गाण्यात,
कुठल्याश्या चिरंतन वेदनेतही.

निळ्या मुक्त आकाशात,
अन् करड्या फांदीवरल्या
हळूच डोकावणार्‍या, बंदिस्त
चार काड्यांच्या घरट्यातही.

जन्म मृत्यूच्या उत्सवात,
आणि निराकार निर्गुणात.
वार्‍याच्या सळसळीत,
हवेच्या झुळुकीत,
जीवघेण्या वादळात,

कविता

खरा चित्रपट

राजा सोव्नी's picture
राजा सोव्नी in जे न देखे रवी...
23 Apr 2013 - 10:03 pm

यमास आवडती हिंदी चित्रपट ,हिरोंना न्यायची करेना खटपट ,
यमाने सनीचा गदर पाहिला ,भेटण्या सनीला उभा राहिला,
वाटले ,सनी हा आहे कोण?,त्याने केला सनीला फोन,
सनीला विचारले यमाने एवढी माणसे कशी मारतो एकट्याने?,
सनी म्हणे हे सर्व आहे खोटे ,तुला एवढे आश्चर्य का वाटे?,
आमच्या पेक्षा तुझा चित्रपट मोठा ,अचानक येतात कशा त्सुनामी लाटा ,
लाखावर माणसे मारतो क्षणात ,आम्हीही मारत नाही रणात ,

अभय-लेखनकविता

एवढासा

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
23 Apr 2013 - 8:52 pm

भानावरी आज आलो जरासा
माझाच मी भासलो एवढासा

समजावुनी या मनाला पुन्हा मी
दिधला नव्या कल्पनेला दिलासा

रडू कधीचे स्मरून हसलो
आणि टाकला भावनेने उसासा

जशी रात्र आणि दिवस हा जसा
कधी मी नकोसा कधी मी हवासा

नको दूर शोधू सुखाला अपूर्व
खेळच मुळी हा असे एवढासा

२४-४-१३ १८:०१

मराठी गझलकवितागझल

॥स्तवन धरणीमातेचे ॥

Bhagwanta Wayal's picture
Bhagwanta Wayal in जे न देखे रवी...
22 Apr 2013 - 1:03 pm

पृथ्वीदिनानिमित्त धरणीमातेचे स्तवन
पाण्यापासुन निर्माण झाली । पंचभूते ही तिच्यात आली ।
शेषनागाने भार वाहिला । नमस्कार माझा धरणीमातेला ।

एक भाग भूमी तीन भाग पाणी । तिच्या अंतरी नवरत्न खाणी ।
सप्तसागराचा वेढा जियेला । नमस्कार माझा धरणीमातेला ।

सूर्याभोवती स्वतः फिरते । म्हणोन दिवस रात्र होते ।
स्नानसंद्यादी कर्म करण्याला । नमस्कार माझा धरणीमातेला ।

गिरी शिखरे पर्वत रांगा । गंगा यमुना भिमा चंद्र्भागा ।
भारत खंड पवित्र केला । नमस्कार माझा धरणीमातेला ।

कविता

आषाढी

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
22 Apr 2013 - 10:38 am

दाट दाटल्या जुन्या मैफिली काळ थांबला नाही
शरिर जाहले जीर्ण मनी साचल्या सावल्या कांही
बोल अबोलच आणि चाहुली पंख मिटून विदेही
टिपुर चांदणे चंद्राविण नभ अवसेचे संदेही

रूक्ष तरी शीतल वाटे एकांत दिशांना दाही
छाया पडछाया माळावर वृक्ष जरी न तिथेही
कोण सोसते पोसते सुखे घाव झेलते देही
आभाळ अंबरी आषाढी माया ममता कविता ही

..............................अज्ञात

अद्भुतरसकविता

वसंत ऋतू आला -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
22 Apr 2013 - 10:32 am

सकाळी तू ओले केस
फटकारत असताना
आरसाच दिमाखात असतो

पुडीतून हळूच डोकावणारा
मोगरा प्रसन्न हसत असतो
स्वत:शीच मान डोलावत

खिडकीतून डोकावणारी अबोली
काहीतरी पुटपुटत असते
मनातल्या मनांत छानसे

मिठी मारल्यागत
लाजाळू तुझी पाठ पहात
खुदकन लाजलेले असते

आरशासमोर दोन गुलाब
उमलत चाललेले
मला दुरूनही दिसतात

ओठावरचे निसर्गदत्त
डाळिंबाचे दाणे पिळवटून
ओठावर पसरायला पहातात

दोन भुवयांच्या कमानीत
जास्वन्दीचा लालभडक ठिपका
विराजमान होत असतो

अद्भुतरसकविता

त्यांचाच जीव घे तू ..

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
21 Apr 2013 - 10:48 am

त्यांचाच जीव घे तू .....

हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता
म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता

मातीत राबताना इतके कळून आले
फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!!

पर्जन्य, पीकपाणी, दुष्काळ, कर्ज, देणी
शांती महागडी अन केवळ तणाव सस्ता

मरतोय अन्नदाता पर्वा न शासकांना
करतात भाषणे ते आणून आव सस्ता

लाठी उगारताना, बंदूक रोखताना
का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?

सत्याग्रहास आता रक्तात माखवावे
शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता

अभय-गझलअभय-लेखनमराठी गझलवीररसकवितागझल