कविता

मेघावळ....

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
1 Jun 2013 - 5:47 pm

मेघावळ....
मेघांची प्रभावळ.......

मेघ म्हणजे आशा. मेघ म्हणजे दिशा.
मेघ अभिलाषा. मेघ निराशाही.
मेघ एक दाटलेलं सूक्त.
कधि करुणायुक्त कधि दुष्काळभुक्त.

ग्रीष्मात निथळलेला प्रत्येकजण आतूर.
वारा मेघांना फितूर.
आला तर धुवाधार नाही तर पिरपिर रटाळ.

मेघ जीवनाचा आधार.
मेघ इंद्राचा अवतार.
सृजनाचा दातार. सृष्टीचा भ्रातार.

पाऊस बेभान. पाऊस निष्काम.
पाऊस अस्वस्थ. पाऊस बदनाम.

अद्भुतरसकविता

समाधी

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
29 May 2013 - 2:01 am

वेगळी धुंदी इथे अन्
वेगळा हा बाज आहे.
वेगळे हे विश्व आणी
वेगळा हा साज आहे.

शांत सारे हे स्वयंभू
शांत इथला नाद आहे.
शांतिचे संगीत म्हणूनी
कोकिळाही शांत आहे.

बंद होती येथ वाटा
बंदिचे संगीत आहे.
आज बंदी पाहिली मी
मुक्त येथे गात आहे.

बंदिचेही शब्द ऐसे
मानसीचा साज आहे.
सुप्तता अन् शांततेचा
मूळचा आवाज आहे.

बोलण्यासी आतुरे तो
खोल आतलाच आहे.
आज या ही..कारणाने
मुक्त तो ही होत आहे.

शांतरससंस्कृतीकविता

अन्नधान्य स्वस्त आहे

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
28 May 2013 - 5:49 am

अन्नधान्य स्वस्त आहे

अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे
(फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे)

शेर नाही चांगला की, मी नसे कळपात त्यांच्या?
दाद का आलीच नाही, छान! वा... वा!! मस्त आहे!!!

मी म्हणालो फक्त इतुके "शब्द माझे शस्त्र आहे"
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे

अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे

कोण गेले, कोण मेले, कोण पुसतो काळजीला
झोपली सद्भावना अन यादवी आश्वस्त आहे

पुस्तकाने कोणत्याही नोंद नाही घेतली की
कष्ट आणिक भाग्य-लक्ष्मी हाच रेशो व्यस्त आहे

अभय-गझलमराठी गझलकरुणवाङ्मयकवितागझल

सत्तेसाठी कायपण

Bhagwanta Wayal's picture
Bhagwanta Wayal in जे न देखे रवी...
26 May 2013 - 7:50 pm

दादा कोंडके यांची मनापासुन माफी मागुन...
१७/५/२०१३ रोजी गणरायाचरणी मंत्र्याच साकडं ह्या गीतात थोडफार बद्दल करुन व शीर्षक बदलुन पुन्हा प्रकाशीत करीत आहे, तरी सर्व वाचक बंधु-भगिनींनी वाचुन प्रतिक्रिया जरुर कळवाव्यात.(चालः काठी न घोंगड घेऊद्या की र )

शाल आणि श्रीफळ घेऊद्या की र...।
मला बी मंत्री होऊ द्या की...॥धॄ॥

मी निवडुन आल्यावर ।
करेन जनतेचा उध्दार ।
बंगला बांधीन एक सुंदर ।
तो तुमच्याच पैशावर ।
फॉरच्युनर गाडी घेऊ द्या की र...।
मला बी मंत्री होऊ द्या की...॥१॥

कविताविडंबन

कार्या लयात असताना.... ;)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
25 May 2013 - 12:37 am

कोणत्याही मंगल कार्यालयात,भटजी म्हणून 'लग्न' लावायला जाणे ही एक आनंद दायक प्रक्रीया असते......पण केंव्हा??? तर भटजी त्याच्या स्वतःच्या यजमानातर्फे जातो तेंव्हा!!! हा एकमेव अपवाद सोडला,....तर ....

कार्या लयाचा ''गुरुजी'' म्हणून रहाणे,

केटरिंगवाल्याकडून लग्न लावायला जाणे,

क्वचितवेळी व्हिडिओ शूटींग वाल्यांकडच्याही(लग्नाच्या ;) ) ''सुपार्‍या'' वाजविणे...

हास्यकविताजीवनमानमौजमजा

जय परशुराम...जय वामन!!!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
22 May 2013 - 6:12 pm

आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय.प्रत्येक जण अगदी आपापली पेजेस करण्यापासून ते ग्रुप्स तयार करण्यापर्यंत अगदी पेटलाय. मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो,आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.आपल्या धर्मातल्या अन्यायी भुमिका/वर्ण श्रेष्ठत्वाचे अहंकार...इत्यादी अनेक गोष्टी आहेत.त्या पाहायच्या नाहीत.समजुनही घ्यायच्या नाहीत. केवळ विरोधकांना नामोहरम करणारी आत्मप्रौढीकडे झुकणारी खंडन/मंडन प्रक्रीया चालु ठेवायची.

शांतरससंस्कृतीधर्मकवितासमाजजीवनमान

सासर्‍या व्यथा

Bhagwanta Wayal's picture
Bhagwanta Wayal in जे न देखे रवी...
19 May 2013 - 6:51 pm

ते आले होते मझाकडे आज एकदम खुशित,
मि हि त्यांचे एकदम हसत स्वागत केले.
मि त्यांला म्हनालो सासरेबुआ मि काहिहि करेन तुम्हाला हसत पाहन्यासाटि,
तुम्ही फक्त एकदा हो म्हना हो"
त्यांने हि हसत उत्तर दिले" हो हो जवईबापु आत मि माझ्या मुलीचा हात तुमच्याच हातात देईल तिला गरज तुमचीच आहे हो .."
आनि ते माझा मिटित विरुन गेले ,
आता मि मि राहिलो नवतो, ते ते रहिले नवते ,
दोघाना हि ओड पिण्याची लगलि होति ,
मग कस कोन जाने या स्व्पनाल नजर माझिच लगलि,
एक पेग मरल्यावर मि त्यांला मझ्या दुसर्‍या लग्नाचि गोश्ट सानगितलि आनि लगेचच रुम त्यांचि गाटलि.

कविताविडंबनस्थिरचित्र

पूल

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
19 May 2013 - 4:30 am

हा पूल कधीच शांत नसतो
----
कधी 'तो' असतो तिथे
धुकेही असते त्याच्या बरोबर
हो, रात्रिचे गर्द धुके... गुढ...
बर्‍याचदा 'ति'चा आवाज
गारुड करतो त्या धुक्यातून
त्याच्या पोटात एकच प्रश्न
या धुक्यात आवाज'सुद्धा' अडकतो?
हम्म.. हा पूल कधीच शांत नसतो
----
कधी 'ती' असते तिथे
त्याने दिलेले पिंपळपान घेऊन
जिर्ण, जर्जर, जाळीदार अन् गडद
खुप जपलयं तिने ते पान
ऊन-वार्‍यापासून, पावसापासून
कधी कधी तिला प्रश्न पडतो
तिच्या हातातले पिंपळपान
जास्त जिवघेणी शिक्षा,
कि,

कविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रेमाचि व्य्था

सुदेश's picture
सुदेश in जे न देखे रवी...
17 May 2013 - 3:46 pm

ति आलि होति मझाकडे आज एकदम खुशित,
मि हि तिचे एकदम हसत स्वागत केले.
मि तिला म्हनालो " सखे मि काहिहि करेन तुला हसत पाहन्यासाटि,
तु फक्त एकदा हो म्हन ग"
तिने हि हसत उत्तर दिले " हो रे सखा आत मि तुझिच आहे रे , मझा स्वासाला गरज तुझिच आहे रे .."
आनि ति माझा मिटित विरुन गेलि ,
आता मि मि राहिलो नवतो . ति ति रहिलि नवति ,
दोघाना हि ओड लग्नचि लागलि होति ,
मग कस कोन जाने या स्व्पनाल नजर माझिच लगलि,
मि तिला माझ्या लग्नाचि गोश्ट सानगितलि आनि लगेचच रुम तिचि गाटलि.
या भाबडिने हात तिचा कापला होत,

कविता

गणराया चरणी मंत्र्याचं साकडं

Bhagwanta Wayal's picture
Bhagwanta Wayal in जे न देखे रवी...
17 May 2013 - 3:41 pm

हे गणराया पडतो मी पाया,निवडून येऊ दे...।
निवडून येऊ दे...मला मंत्री होऊ दे...॥धॄ॥

मी निवडुन आल्यावर ।
करेन जनतेचा उध्दार ।
बंगला बांधीन एक सुंदर ।
तो तुमच्याच पैशावर ।
दारामध्ये फॉरच्युन गाडी ऊभी राहु दे...।
ऊभी राहु दे...मला मंत्री होऊ दे...॥१॥

मग जाईन दिल्लीला ।
पी.एम्.ला भेटण्याला ।
मंत्री पद मागण्याला ।
दिल्या वचना जागण्याला ।
राजभवनावर मंत्रीपदाची शपथ घेऊ दे...।
शपथ घेऊ दे...मला मंत्री होऊ दे...॥२॥

कविता