कविता

रक्त आटते जनतेचे

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
13 May 2013 - 9:16 am

रक्त आटते जनतेचे

रक्त आटते जनतेचे, देश सुंदर घडवायला
एकटा रावण पुरेसा, राज्य धुळीत मिळवायला

जे हुजरे पाळलेस तू, सर्व खाण्याचे पाईक
ढेकर देणे झाले की, ते बघतील सटकायला

सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल
कोण तयार होईल मग, इथे हाडे झिजवायला

निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला
मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला

टाळले होते फुलांनी, आयुष्यभर भेटायचे
आज मात्र सडा पडलाय, मस्त तिरडी सजवायला

दार गेले, धुरा गेला अन कर्जापायी कुंकू
दोन्ही हात उरले मात्र, दररोज उर बडवायला

अभय-गझलमराठी गझलवाङ्मयकवितागझल

दारु पुराण

Bhagwanta Wayal's picture
Bhagwanta Wayal in जे न देखे रवी...
12 May 2013 - 11:10 am

दारुपुराण सांगतो मी,तुम्ही ऐका शांतचित्ता
ऐका एका दारुड्याची कथा ॥धृ॥

रोज येतो दरु पिऊन
बाटली खिशामद्ये घेऊन
सांगे रुबाबात येऊन
चल वाढ मला भोजन
रोज हवी मच्छी मटण
बायको आण्ल सांगा कुठुन
रागाने ऊठतो पेटून
अर्ध्या जेवणावर ऊठुन
होते त्याची चालू,ही बडबड आता
ऐका एका दारुड्याची कथा ॥१॥

करुणकविताजीवनमान

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
11 May 2013 - 10:35 am

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
.

लाजुनी पाहिले ना रोखून पाहिले
तूज ग्रंथाप्रमाणे वाचून पाहिले

वाढला हा दुरावा स्नेहात का तुझ्या
लाख गुन्हे तरी मी झाकून पाहिले

साथ देण्यास माझे मी हात जोडले
मख्ख मुद्रेत त्याने त्रासून पाहिले

क्रोध ताब्यात माझ्या मी आणतो म्हणे
चांदणे मस्तकाला घासून पाहिले

नम्रता रोमरोमी भिनते म्हणून मी
गाढवांच्या पुढेही वाकून पाहिले

काल अग्नीपरीक्षा त्यांनीच घेतली
कोंबड्यासारखे मज भाजून पाहिले

पूर्ण झाले उणे मी मातीत मिसळता
हातचे मी तरी ना राखून पाहिले

अभय-गझलमराठी गझलकवितागझल

कर्माचरण

Bhagwanta Wayal's picture
Bhagwanta Wayal in जे न देखे रवी...
10 May 2013 - 12:10 pm

राम नाम राहो देवा सदा माझ्या मुखी।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥धृ॥

जनांसंगे गेलो देवा तिर्थ यात्रेला ।
दगडच्या मुर्तिमध्ये तुला शोधियेला।
नाही भेटलास तिथं झालो मी रे दु:खी।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥१॥

उपवास केले नाना नवस सायास ।
लागला ना कधी देवा तुझा निजध्यास।
मंदिरात जाऊनिया नाही झालो सुखी ।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥२॥

ऐकले मी कीर्तन कथा प्रवचन ।
आवरेना तरी माझे चंचळ मन ।
केले अवगुण ते ही चातुर्याने झाकी ।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥३॥

कविता

शोध

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
9 May 2013 - 5:53 pm

काही शे वर्षांपूर्वी कोणीतरी एक शोध लावला
म्हणे चंद्र हा सूर्याचे तेज वाहतो
नाही असेल खरे, सिद्धही झाले होते म्हणे
.
.
बहुदा ज्याने हा शोध लावला त्याने
कधी तुला पहिलेच नसेल
पहिले असते तर
.
.
नको जाऊ दे
झाले ते बरेच झाले
.
.
काय तर म्हणे चंद्र सूर्याचे तेज वाहतो
असेल असेल :)

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(खुप दिवसांपूर्वी लिहीलेली कविता)

शृंगारअद्भुतरसकविताप्रेमकाव्य

हवं असं कुणीतरी

प्रिया ब's picture
प्रिया ब in जे न देखे रवी...
9 May 2013 - 5:22 pm

आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर असो तुझा साथ
काटेरी वाटेवर विश्वासाचा घट्ट हात
शोधात अशा मी प्रेमा तुझ्या
ओवाळून टाकीन जीव तुजवर , होशील का तू माझा सख्या ?

ना कधी सोडून जाईन
ना अंतर तुला मी देईन
वचन हे माझे नाहीत नुस्तेच शब्द ,
नाही हे खोटे, ना हे म्रुगजळ,
तुझे आश्रू सामावण्यात - सदैव माझी ओंजळ

कविता

माझी गझल निराळी

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
8 May 2013 - 11:44 am

माझी गझल निराळी

घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी

शब्दांची गुळणी नोहे, नव्हेच शब्द धुराडा
निद्रिस्थी जागवण्याला, गातो शेर भुपाळी

एकेका आरोपीची उला पकडतो गच्ची
सानीच्या लाथडण्यावर पिटती मिसरे टाळी

लढवैय्या आशय माझा करतो तांडव तेथे
जन्माला येते जेथे, ती काळरात्र काळी

युगानुयुगे ते बोलले, ऐकत आलो आम्ही
आता माझ्या मतल्याची ऐकवण्याची पाळी

गझल माझी बंड आणि अन्यायाला दंडही
शेतकर्‍यांच्या मुक्तिसाठी आयुधांची थाळी

अभय-गझलमराठी गझलवाङ्मयकवितागझल

संक्षिप्त

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
7 May 2013 - 10:37 am

वेदनेचे रूप आहे हिमनगाची सावली
वाटते ते बेट तरते नाळ कोणी पाहिली
आंधळ्या हृदयास दिसते कोणतीही माउली
अधिकतर अंदोलनांच्या सुप्त वेठी काहिली

लाट भर आघात अगणित पेटलेल्या मैफिली
भेटले अज्ञात कोणी शोधते मन चाहुली
वेध व्याधाचे इथे जाळीत माया गुंतली
जाळ शीतल कोपले आणि समिधा गोठली

एकले हे युद्ध तरिही संगरी प्रश्नावली
उत्तरे संक्षिप्त कलिका कोष झाकुन राहिली
गंध मदनाचे अधूरे झुळुक अवचित थांबली
वादळे उठली; मुक्याने ऐन भाषा संपली

............................अज्ञात

अद्भुतरसकविता

पौरुषाला आव्हान...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जे न देखे रवी...
6 May 2013 - 8:49 pm

राम राम मिपाकरहो,

आपले एक आदरणीय सभासद आणि माझे ज्येष्ठ स्नेही श्री रामदास.. अर्थात, मिपाकर रामदास..

फार पाल्हाळ लावत नाही.. पण एकच सांगतो की हा एक अफाट प्रतिभा असलेला परंतु तेवढाच अगम्य माणूस आहे.. त्यांचा माझ्यावर लोभ आहे, आमचा दोस्ताना आहे हे खरं तर माझं भाग्य..

परंतु आपले हे रामदासबुवा तसे थोडे दूर दूर राहणारे, वाटल्यास थोडे बुजरे म्हणुया..

त्यांनी एक अप्रतिम मुक्तक लिहिलं आहे..आणि आज त्यांनी मला ते सहजच दाखवलं.. परंतु का माहित नाही, रामदासबुवांना ते मिपावर टाकणं तेवढंसं प्रशस्त वाटेना..

कवितामुक्तक

दादी के हाथों को जलता देख...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
6 May 2013 - 11:04 am

प्राध्यापक अशोक चक्रधर.

हिंदीतले एक अत्यंत दिग्गज कवीवर. एक विलक्षण, बहुआयामी व्यक्तिमत्त्व..एक भाषाप्रभू, एक शब्दप्रभू..त्याचप्रमाणे एक अत्यंत मिश्किल, हसरं व्यक्तिमत्त्व. एखाद्या विनोदाला मनमुराद दाद देताना अगदी सोडावॉटरची बाटली फुटावी असं खळखळून, मनमोकळं हसणारं व्यक्तिमत्त्व..परंतु त्याचवेळी एक तेवढंच संवेदनशील व्यक्तित्व..जीवनाकडे, माणसांकडे, त्यांच्या प्रश्नांकडे तेवढ्याच संवेदनशीलतेने पाहणारं एक सहृदय व्यक्तिमत्त्व..

कवितासाहित्यिकसमाजजीवनमानप्रतिक्रियाआस्वादप्रतिभा