रक्त आटते जनतेचे

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
13 May 2013 - 9:16 am

रक्त आटते जनतेचे

रक्त आटते जनतेचे, देश सुंदर घडवायला
एकटा रावण पुरेसा, राज्य धुळीत मिळवायला

जे हुजरे पाळलेस तू, सर्व खाण्याचे पाईक
ढेकर देणे झाले की, ते बघतील सटकायला

सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल
कोण तयार होईल मग, इथे हाडे झिजवायला

निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला
मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला

टाळले होते फुलांनी, आयुष्यभर भेटायचे
आज मात्र सडा पडलाय, मस्त तिरडी सजवायला

दार गेले, धुरा गेला अन कर्जापायी कुंकू
दोन्ही हात उरले मात्र, दररोज उर बडवायला

किती सीता पळवायच्या, तुम्ही लागा पळवायला
श्री बजरंग येत आहे, ’अभय’ लंका तुडवायला

                                           - गंगाधर मुटे
---------------------------------------------------

अभय-गझलमराठी गझलवाङ्मयकवितागझल

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

13 May 2013 - 9:25 am | चाणक्य

शेवटचा शेर सोडुन बाकीची गझल आवडली. खरं तर शब्दरचना आवडली म्हणायला पाहिजे कारण तुम्ही गझलेत मांडलेल्या वास्तवात आवडण्यासारखं काय आहे ? काही नाही.

Bhagwanta Wayal's picture

13 May 2013 - 12:19 pm | Bhagwanta Wayal

वा..! छान..!

:(

श्री बजरंग येत आहे, ’अभय’ लंका तुडवायला
:)

अर्धवटराव