राम नाम राहो देवा सदा माझ्या मुखी।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥धृ॥
जनांसंगे गेलो देवा तिर्थ यात्रेला ।
दगडच्या मुर्तिमध्ये तुला शोधियेला।
नाही भेटलास तिथं झालो मी रे दु:खी।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥१॥
उपवास केले नाना नवस सायास ।
लागला ना कधी देवा तुझा निजध्यास।
मंदिरात जाऊनिया नाही झालो सुखी ।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥२॥
ऐकले मी कीर्तन कथा प्रवचन ।
आवरेना तरी माझे चंचळ मन ।
केले अवगुण ते ही चातुर्याने झाकी ।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥३॥
वाचले ग्रंथ पोथ्या केले पारायण ।
नाही कळ्ले तरी कोठे आहे नारायण।
भक्तिच्या नावावर केली फेका-फेकी ।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥४॥
राम नाम राहो देवा सदा माझ्या मुखी।
आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2318
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली
प्रतिक्रियेबद्दल मनपूर्वक
भक्तिच्या नावावर केली फेका
बहुतांपरि संकटे साधनांची,
तुझे आहे तुज पाशी.
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचेच
राम नाम राहो देवा सदा माझ्या मुखी।
उपहास समजला.
In reply to राम नाम राहो देवा सदा माझ्या मुखी। by संजय क्षीरसागर
चुकीच्या मार्गावर कितीही चाललात तरी
In reply to उपहास समजला. by प्यारे१
खरंच? ठाऊक नव्हतं ब्वा!
In reply to चुकीच्या मार्गावर कितीही चाललात तरी by संजय क्षीरसागर
चुकिच्या मार्गावर चाललो काय
आहो चालायची गरज कुठे आहे?
In reply to चुकिच्या मार्गावर चाललो काय by Bhagwanta Wayal
चांगली कविता
प्रतिक्रियेबद्दल धन्य्वाद..!
In reply to चांगली कविता by पैसा
चांगली झाली आहे
धन्यवाद...!
In reply to चांगली झाली आहे by सुधीर