देवा आता हार मान तू
देवा आता हार मान तू
बघुनी खालचे तांडव सारे
दिलास जन्म मानवास तू
पण झाले सगळे वानर साले
उभा केला तुला देवळात
अन उद्बत्तीचे सुवास वारे
तुझ्याच पायावरती सजले
मांसाचे ते ढेर सारे
तुला छीनले दगडातुनी
अन तुझे कोरले देह सारे
हिरवे-भगवे वस्त्र चढवुनी
इथेच ठेवले तुझे नाव रे
उद्गाता तू चराचराचा
उरी तुझ्या हा विश्व भार रे
माणसे माणसा खाण्याअगोदर
देवा आता तू खाली धाव रे