मरण झाले स्वस्त
खरे सांगतो मी देवा तेला एक गोष्ट
जीवन झाले महाग आणि मरण झाले स्वस्त ॥ धॄ ॥
महागाईचा आलेख किती वर गेला
कसे जगावे देवा सांग तुच मला
गरीबाच्या दुखाला नाही कुठे अंत..॥१॥
कर्जापाई शेतकरी हवालदिल झाले
कितितरी आत्म्हत्या करुनिया मेले
देऊनिया जातात अस्वासने फ्क्त...॥२॥
बाँब स्फोट घातपात येथे घडतात
निष्पाप लोक त्यात बळी पडतात
काही आपल्या घरामध्ये रहातात मस्त...॥३॥
दोन गाड्यांमध्ये जेंव्हा टक्कर होते
बघताबघता बस कधी दरीमध्ये जाते
पिऊनिया चालवी गाडी नाही त्याल धास्त..॥४॥