कविता

शोध माझ्यातला

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
22 Aug 2013 - 5:47 am

शोध माझ्यातला

मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले
समजण्या मला काय गवसले
अन काय हरवले माझ्यातले
मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले

शुद्ध हवा घेतली का कधी?
निर्मळ पाणी चाखले का कधी?
खळाळता निर्झर कधी का पाहीला?
घाम त्वचेतून कधी का वाहीला?

लहान मुलांवर वा कोणत्या प्राण्यावर?
निर्व्याज प्रेम कधी केले का कुणावर?
मदत का कधी कुठे केली?
न ठेवता आशा परतीची?

शांतरसकविता

मला झोप हवी

वैभव कुलकर्नि's picture
वैभव कुलकर्नि in जे न देखे रवी...
19 Aug 2013 - 5:43 pm

म्हणल आज जरा शांत झोपावे पण छे झोपेण नाकच मुरडले आहे आताशा.
बहुतेक डोळ्यावरची बुबुळ रुसलीत माझ्यावरती ......

आतल्या बाहुल्या नुसत्याच फिरत आहेत इकडून तिकडे एखाद्या निशाचरासारख्या
आणि हि रात्रही काही थांगपत्ता लागून देत नाही..

मी रात्रीला विचारल , काही चुकलं काय माझे असा हा का आसूड या डोळ्यावरती
नेहमीप्रमाणे उत्तर काही मिळाले नाही ...फक्त एक करडा कटाक्ष्य आणि उजव्या काखेत माझ्या झोपेला घेऊन ती देसिनाशी झाली...

कविता

रानपाखरं...

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
19 Aug 2013 - 11:57 am

बांधलं मचाण
वर गाण्यात गळा,
मधुरता मंधी
दुमला शेतमळा !!

येऊन चोर
जोंधळ्यात दडं,
शिवार टिपीत
चाललीत पुढं !!

भिरभिरली गोफण
सुटला दगड,
चोर जोंधळ्यात
त्येनं केलं उघड !!

का म्हून सतावता
सुखानं जगू द्याव,
किती सोसलं पिकासाठी
तुम्हा ते नाय ठावं !!

घरी तान्हं ठिवून
आलिया राखणीला,
सोनं ठिवलं तरच
वरीसभर पीठ भाकरीला !!
मला पीठ भाकरीला !!

श्री. साजीद यासीन पठाण

कविता

ती...

सार्थबोध's picture
सार्थबोध in जे न देखे रवी...
19 Aug 2013 - 10:06 am

ऐकले जाहीर येथे, झुंड माणुसकी तुडवणारे
वाचले जाहीर येथे, रत्न कन्या नाकारणारे ll १ ll

जोडपे कैक नादान, येथे पालकत्वी रंगणारे
तो असेल कि ती?, व्यर्थ शंका काढणारे ll २ ll

माजले क्रूर बाजारी, गैर कर्मे रुजवणारे
विवेक विसरून पालक, वाट आंधळी जोखणारे ll ३ ll

अवैध पैसा अमाप, गर्भश्रीमंत मिरवणारे
कष्टी भगवंत येथे, पाहून गर्भ चिरणारे ll ४ ll

लिखित काही और तरीही, वंशदिवा शोधणारे
हातचे टाकून पायी, कळ्या नाजूक तुडविणारे ll ५ ll

विझल्या ज्योती किती, काळोख भोवती बोचणारे
नवी संज्ञा माय-बापा, जन्म देऊन मारणारे ll ६ ll

कविता

अबोल प्रीत बोलली...

K Sangeeta's picture
K Sangeeta in जे न देखे रवी...
18 Aug 2013 - 10:44 pm

मिहीत रात्र रंगली
कमल पुष्पे फुलली...

अबोल प्रीत बोलली
हळूच गाली हसली...

नभी धुंद चांदणे
फुलाफुलांत हिंडले...

प्रीत आपुली पहिली
अबोल प्रीत बोलली ...

नवे रंग उमटले
अश्रु पुसून गेले...

उगवली पहाट
थांबली चंद्रकोर...

विसावली सागरी
झोपली गाढ कुशीत...

विसरली निळ्या आभाळास
अबोल प्रीत बोलली...
अबोल प्रीत बोलली...

कविता

न्याय

स्वाती३५११'s picture
स्वाती३५११ in जे न देखे रवी...
18 Aug 2013 - 9:31 pm

काहिंच्या अस्तीत्वाच्या विळख्यात
गुदमरायला होते
सहवासाच्या वणव्यात
होरपळायला होते

काही जणांना पेटत्या आगपेट्या
बनायला आवडत
भाजलेल्या व्रणावर खोटे मलम ही
बनायला आवडत

उपदेशाचे कोरडे पाऊस
ही बरसतात
पावसात कोरडे रहायचे की ओले
हे ही तेच ठरवतात.

न्याय अन्यायाच्या परिभाषा
बदलल्या आहेत
अन्याय करणार्‍यांची लोकप्रियता
वाढतच आहे

आरोपीच्या पिंजर्‍यात
न्याय उभा आहे
अन्यायाच्या काळ्या कोटासमोर
उलट तपासणी होत आहे.

कविता

क्षण

स्वाती३५११'s picture
स्वाती३५११ in जे न देखे रवी...
18 Aug 2013 - 9:19 pm

क्षण
क्षण हातातुन निसटुन जातात
काही क्षण क्षणिक तर
काही रुतून बसतात.

सुखाची झुळुक
तर दुखाची वादळ
झुळुक क्षणिक
तर वादळ रेंगाळतात.

क्षण हातातून निसटुन जातात
मागे पाहताच क्षण ओळख विसरतात
काही मात्र मानगुटीवरची
भूत बनतात.

क्षण हातातून निसटुन जातात
काही दिवाळी असतात
काही होळी असतात
काही सुखाची मोळी बांधतात.

क्षण हातातून निसटुन जातात....

कविता

अथांग

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
18 Aug 2013 - 11:29 am

ऋणात आहे; …. ऋण काटेरी
तरी वाट ती माहेरी
लाघव ओळी हळव्या लहरी
अभंग संचित गाभारी

ठाव न लागे अथांग सारे
उचंबळे कधी मौन उरी
प्रजक्तासम सण एकेरी
एकांताची कास धरी

स्पर्श दंवाचा चित्त थरारे
ओघळ किंचित; बंड करी
म्हणे सवे ये श्रावणात अन
फिरव मला गत माघारी

…………… अज्ञात

शृंगारकविता

आहे!?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
17 Aug 2013 - 7:42 am

आहे!?

आहे? आहे? आहे? आहे? साखर आहे?
आहे! आहे! आहे! आहे! साखर आहे!

आहे? आहे? आहे? आहे? गुळ आहे?
आहे! आहे! आहे! आहे! गुळ आहे!

आहे? आहे? आहे? आहे? तेल आहे?
आहे! आहे! आहे! आहे! तेल आहे!

आहे? आहे? आहे? आहे? खोबरे आहे?
आहे! आहे! आहे! आहे! खोबरे आहे!

(नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे? आहे? आहे?)
(नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे! आहे! आहे!)

किती मोजू सांगा? किती घ्यायचे आहे?
साखर ५ किलो, गुळ अर्धा किलो आहे

कवितामौजमजा

आजहि

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
16 Aug 2013 - 4:15 pm

आजहि बुलबुल तेच बोलते
दुष्कर भाषा परी ही ती
दूर क्षितीजावरती दिसते
क्षीण तेवणारी पणती

आशा नाजुक हिरवळते
दरवळते प्रतिमा ओझरती
अमिट स्वरांचे हे नाते
गुंजारवते अवती भवती

श्रावण धारा लोभस वारा
भाव भावना ओघवती
पागोळी हळुवार उतरते
आतुरल्या काठावरती

वलये वलये उठती विरती
हुर हुर मनभर कातरती
सांज सकाळी आठवती
नयनांत रेखलेल्या भेटी

…………… अज्ञात

अद्भुतरसकविता