कविता

(गेम)

धन्या's picture
धन्या in जे न देखे रवी...
2 Oct 2013 - 10:00 pm

प्रेरणा: प्रेम

गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!

गेम झाली तर माणूस गेला
नाही झाली तर माणूस वाचला

गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!

एक टपकला की दुसरा
दुसरा टपकला की तिसरा

गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!

लपायला अजिबात जंगल नाय
सावली आहे ती वड पिंपळाची

गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!

एकडे आहे मंद मोर
ज्याला सापडत नाही लांडोर !

गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!

काणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगोवाचौरागढनागद्वारभूछत्रीकविता

निळारंभ

सार्थबोध's picture
सार्थबोध in जे न देखे रवी...
24 Sep 2013 - 9:37 am

हे निळारंभ मुक्तसे
काही मला खुणावे
बोलेल जरी मजपाशी
मन करीन मोकळे ll १ ll

माझ्या उरात दाटे
व्यथा बरे कशाची
करतील दूर काय
तिज मेघ सावळे ll २ ll

बोलू कसा तयाला?
जीव आर्त गुदमरे
संकेत विहंग सांगे
घे भरारी अवखळे ll ३ ll

मी बोलता जरासा
तोही भरून आला
तळमळ झुगारुनी
तो विजेत विरघळे ll ४ ll

हा पाऊस आसवांचा
वाहून हर्ष त्याला
मी ही भिजून चिंब
दु:ख सारे निमाले ll ५ ll

- सार्थबोध

कविता

' अधांतरी ..'

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
23 Sep 2013 - 8:22 pm

तुझी आठवण कुंद कुंद दाटून येते.
अनावर ठसठसते,
रक्तासारखी ठिबकते.
दिशांच्या कोनात विझून गेलेले हळवे पक्षी जागे होतात,
उगाच चिवचिवतात,
श्वासांच्या फांदीवर घट्ट रुतून बसतात.
क्षितिजावर सांडलेले रंग सुटतात ;
अलवार आकाशावर दिशाहीन फुटतात.
तुझे भास प्राणांतून विजेसारखे लखलखतात,
धारदार पात्यासारखे आरपार जाणिवेवर फिरतात.
तूझ्या असण्याच्या शक्यतांच्या सीमारेषेवर
जीव इंद्रधनुष्यासारखा सततच अधांतरी ..!

- डॉ. सुनील अहिरराव

कविता

असले कसले जेवण केले

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
22 Sep 2013 - 9:00 pm

असले कसले जेवण केले

जेवण केले अन हात धुतले
धुतलेले हात टॉवेलला पुसले

घरी येतांना खुप भुक लागली
लगेच आयत्या ताटावरती बसले

आमटीत होते पाणीच पाणी
जळक्या पोळ्यांचेही आकार कसले!

ईईई आळणी भेंडी करपा भात
तसेच खावून उपाशी मी उठले

काय नशिबी आले माझ्या
जेवण हे बेचव असले

कित्ती हौसेने आयटीतला नवरा केला
तेथेच आयटीतली बाई मी फसले

सांगितले कितीदातरी त्याला
नको बनवूस जेवण असले कसले

पुढल्या जन्मी एखाद्या शेफशीच
करायचे लग्न मनी ठसले

हास्यकविता

देव नावे भिक्षा चालुच राही....

निश's picture
निश in जे न देखे रवी...
20 Sep 2013 - 1:14 pm

देव नावे भिक्षा चालुच राही
पोटांस ह्यांच्या तडस नाही.

ह्यांना झाला भस्म्या माणुसकीचा
माणसांची श्रध्दा खात सुटती.

देवही आता ह्यांच्या दयेचा भुकेला
ह्यांच्या घरी सदा तुप आणी लोणी.

देवही असा पराधीन झाला
लागली नजर त्याला ह्या डोमकावळ्यांची.

सत्तेचा ह्यांना अस माज आला
माणसाचा ह्यांनी गुलाम हो केला.

देवास नाही गरज पैशांची
तो तर भक्तांच्या भक्तीचा भुकेला.

भ़क्तीचा ह्यांनी बाजार मांडला
देवासही ह्यांनी कैदेत डांबला.

म्हणे दास निश जागे व्हा तुम्ही
देव चराचरी तुम्हां आम्हां ठायी.

कविता

ओढ दर्शनाची

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
18 Sep 2013 - 7:08 pm

तुझ्या दर्शनाची मनास लागली रे ओढ
मन होते कासावीस लागुनिया वेड

काम करता लक्ष नाही कामामधे चूक
नाही जाणीव पोटाला मरते तहानभूक

घर नाही दार नाही विसरतो संसार
जीवनात सार सारे वाटू लागते असार

नामस्मरण राहे मुखी हात टाळामधे गुंग
डोळ्यापुढे चरण तुझे मनी दर्शनाचा चंग

करी जिवाचे सार्थक अर्पिले जीवन माझे
एकदाच डोळे भरून पाहू दे रे रूप तुझे

नाही मोठा मी रे संत ना कुणी महंत
इवलासा जीव माझा होई तू कृपावंत . . .

.

अभंगशांतरसकविता

नवथर

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
18 Sep 2013 - 10:32 am

धुके सभोवर मन काठावर
गूढ प्रभात रुपेरी
भास आभासे असलेलेपण
भ्रामक दुनिया सारी

दंव; लव तृण पानांवर पसरे
अगाध नीर पथारी
गंध मोकळा मातीचा
असमंती घेई भरारी

कोण संग तो कुणा व्यापतो
अगतिक आभा चकोरी
नील आकाशी पाचू रानी
नवथर हिव अंबारी

………………. अज्ञात

अद्भुतरसकविता

बोल बैला बोल : नागपुरी तडका

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
18 Sep 2013 - 9:46 am

बोल बैला बोल : नागपुरी तडका

        बोल बैला बोल तुला बोललंच पाह्यजे
        बांधलेलं मुस्कं आता सोडलंच पाह्यजे...!

नांगर ओढू ओढू जेव्हा तोंड फेसाळंले
कोणी तरी आला का रे हाल पुसायाले?
ज्यांच्यासाठी पिकवलेस वखारभरून धान्य
आहेत का रे तरी त्यांना हक्क तुझे मान्य?
फ़ुकामधी रक्त आटणं थांबलंच पाह्यजे....!

        थंडी-पाऊस, ऊन-वारा छातीवरी पेलतोस
        वादळाचे तडाखे शिंगावरी झेलतोस
        तेव्हा कुठे हिरवीगार होते काळी आई
        तरी का रे तुझे श्रम मातीमोल जाई?
        लुटीचं अर्थकारण तू शिकलंच पाह्यजे...!

अभय-काव्यअभय-लेखननागपुरी तडकावाङ्मयशेतीकविता

२०१४

सांजसंध्या's picture
सांजसंध्या in जे न देखे रवी...
17 Sep 2013 - 12:59 am

देशाच्या प्राक्तनाचे
लिलाव जवळ येताच
भावी विधात्यांची
स्वप्नांची दुकानं
पॉश एरीयातल्या
आर्ट गॅलरीतली
कोलाज बनून सजतात
गूढ, अगम्य, गुंगवणारी
पण प्रेक्षणीय
आणि चक्क श्रवणीयही
तेव्हां..
टाळ्या पिटायला
आख्खी धारावी धावते
आणि वाट पाहते
पुढच्या शो ची
पुन्हा पाच वर्षांसाठी

- संध्या
१७.९.१३

अद्भुतरसकविता

शिवबाचि तलवार

kalpana joshi's picture
kalpana joshi in जे न देखे रवी...
16 Sep 2013 - 1:55 pm

शिवरायांची भवानी तलवार चाले -
जिने हिंदुधर्माचे रक्षण केले ,
निराधार प्रजेला संरक्षण दिले
निष्पाप प्रजेला भयमुक्त केले.
बलाढ्य औरंगजेबाला भयग्रस्त केले ,
अशी ही शिवरायाची भवानी तलवार चाले .
मोगलाई बरखास्त झाली,
स्थापला महाराष्ट्र धर्म ,
लोकशाहीची तुतार फुंकली ,
सरंजामशाहीच्या अन्याया विरुद्ध बंड पुकारले ,
अशी ही शिवरायाची भिवानी तलवार चाले .
बलाढ्य अफजल खानाचा वध झाला,झाले शीर धडा वेगळे ,
प्रराक्रमी किती ते शिवराय अन मावळे ,
किती एक गड किल्ले काबीज केले.
अशी ही शिवरायांची भवानी तलवार चाले .

कविता