कविता

झोपेत वर्गात येणे, अन येऊन पुन्हा झोपणे (विडंबन)

पल्लवी मिंड's picture
पल्लवी मिंड in जे न देखे रवी...
22 Oct 2013 - 3:28 pm

मंगेश पाडगावकरांची माफी मागून

झोपेत वर्गात येणे, अन येऊन पुन्हा झोपणे
ओळखून आहेत सारे , presenty साठी तुझे फक्त येणे

भर दुपारी लेक्चर ला, पेंग तुला का यावा
लागताच डोळा तुझा, प्रश्न नेमका तुलाच विचारावा
तुझ्याच पेंगुळलेल्या डोळ्यांनी तुझ्याशी असा दगा का करावा

तुझ्या निर्भत्सनेचा अर्थही तुला न उमगावा
फेकलेल्या खडूचा नेमही चुकावा
झोपेतल्या बरळण्याला तुझ्या, कोणी आपला अपमान का समजावा

घेता छोटी डुलकी तू, अचानक यावा मोठा वारा
अन जागी होऊन तू, करावास कुठे आहे मी चा देखावा
अन वर्ग सारा हास्य कल्लोळात बुडावा

कविता

तू …. !

BONGALE SANTOSH SHAHU's picture
BONGALE SANTOSH... in जे न देखे रवी...
22 Oct 2013 - 1:17 pm

कुठे आहेस तू ?
काय करतेस आता ?
मी इथे अन
तू …. तिथे
डोळे भरून येतात
आणि
झुकतो ग माथा
न सावरता …
कधी… कधी …
रोज…. रोज….
येत असेल सय
आठवू नकोस
असं कसं म्हणू ?
आठवणीत सारखा असतो
'तू……. '
दोघांच्याही
साथीला
आयुष्यभर …. !!

कविता

आजकाल हे असे आहे...

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
22 Oct 2013 - 12:46 am

आजकाल असे आहे...

खेळाडू "अभिनय" करत आहेत *(मँच फिक्सिंग)
खेळाडू अभिनय करत आहेत *(बॉलीवूड मध्ये प्रवेश करून, जाहिरातीत)

आजकाल हे असे आहे...

अभिनेते राजकारणात शिरत आहेत
अभिनेते "राजकारण" करत आहेत

आजकाल हे असे आहे...

राजकारणी जनतेच्या सेवेचा "अभिनय" करत आहेत
राजकारणी सत्तेच्या रणांगणावरचे "खेळाडू" बनत आहेत

आजकाल हे असे आहे...

बातम्या मनोरंजनाचा वारसा चालवत आहेत
मनोरंजन रक्तरंजीत अपराधी झाले आहे * (गुन्हेगारी सिरियल्स)

आजकाल हे असे आहे...

करुणकविता

अजून आहे मी वनवासी

आनंदमयी's picture
आनंदमयी in जे न देखे रवी...
21 Oct 2013 - 12:11 am

फिरून सरला काळ,अजुनही घुटमळते मी वळणापाशी
युगायुगांची फरफट तरिही,अजून आहे मी वनवासी

नवा साज अन् नवे रूप मज,भोग तरीही जुनेच पदरी
आसपासचे नवीन चेहरे,जुनीच तरिही नजर विखारी
नवे ध्येय मज गाठायाचे,जुनी तरी भिँतीँची घुसमट
उंबरठ्याच्या पल्याड अजुनी जुनेच भयकंपाचे सावट
जुनीच प्यादी जुनाच पट, परि नवा खेळ हा आयुष्याशी
युगायुगांची फरफट,तरिही अजून आहे मी वनवासी

करुणकविता

प्रसाद शेरणीचा

BONGALE SANTOSH SHAHU's picture
BONGALE SANTOSH... in जे न देखे रवी...
20 Oct 2013 - 8:13 pm

पाहुनी नरहरीला । आनंद होई मनाला
माझा माथा हरी लागो दे चरणाला । धृ।

भक्त प्रल्हादासाठी नारायण अवतरला
हिरण्य कश्पूचा वध त्याने केला
संतासाठी हरी खांबी प्रगटला ।१।

राक्षसांनी प्रल्हादाला खूप छळले
हत्ती खाली दिले कड्यावरुनी फेकिले
जेथे तेथे त्याशी नामाने तारिले । २।

वैशाख पुनवेशी यात्रा भरते मोठी
नरुशिहपुरशि भक्त गण लोटती
नरहरीचा जयजयकार करूया सुखाला । ३।

पालखी सजवून मिरवणूक न्यारी
दंग होऊन भक्त रमती भजनात सारी
शेरणी काढून प्रसाद वाटला । ४ ।

कविता

पुन्हा नव्याने..

आनंदमयी's picture
आनंदमयी in जे न देखे रवी...
20 Oct 2013 - 1:24 pm

पुन्हा नव्याने फुलती स्वप्ने
पुन्हा नव्या उलगडती वाटा
पुन्हा नवी अधरांवर लिहिली
नाविन्याची लोभस गाथा

अस्तित्वाचा नवा अर्थ अन्
जगणे सारे नवेच झाले
बुरसटलेले पाश तोडुनी
नवे पाखरू नभी उडाले...

नव्या नव्याची नवलाई ही
व्यापुन घेते सारे जीवन
नव्या नभीची नवीन बिजली
छेदून जाते जुने कृष्ण घन

नव्या सुरांची नवी भुपाळी
नवी सुगंधी पहाट गाते
अधीर राधा पुन्हा नव्याने
श्यामनिळ्याची होऊन जाते!!

© अदिती जोशी
11.6.13

कलाकविता

सल अंतरीचा..

फुंटी's picture
फुंटी in जे न देखे रवी...
17 Oct 2013 - 9:18 am

खंतावून सोडणारी एक अस्वस्थ पोकळी..
हुरहूर आजवर अव्यक्त राहिलेली..
त्या सूक्ष्म वेदनेला स्मरून खरडतोय काही...
कविता बिविता जे काय समजायचं ते समजा..
तिच मला टाळण
फलाची इच्छा मनात न धरता कर्म करा म्हणे...
प्रेम करता येईल अस?
फलेच्छा सोडून...??
कर्म आणि फलेच्छा वेगळी कुठे आहे इथे??
सगळ एकच दिसतंय...तुझ्यात...

कविताप्रेमकाव्य

शब्द चिमुकले सांडत होते ...

जेनी...'s picture
जेनी... in जे न देखे रवी...
16 Oct 2013 - 11:53 pm

त्या इवलुश्या पानावरती
शब्द चिमुकले सांडत होते
फुलपाखरापरी फडफडणारे
कवितेचे मन भासत होते

अलगद कागद हातावरती
हाताच्याही बोटावरती
मन बोटासंगे बोलत होते
शब्द चिमुकले सांडत होते

बरेच काहि अवती भवती
भोवतालीच्या ओठावरती
सार तयाचे मांडत होते
शब्द चिमुकले सांडत होते

मी न माझी, माझे न काहि
माझ्यासाठी मीपण नाहि
नाहि नाहि म्हणता म्हणता
कवितेला मी सांगत होते

ओळी ओळीवर अक्षरांचे
पुंजकेच जणु साठत होते
शब्द म्हणुनी शब्दासंगे
कवितेचे मन डोलत होते

कविता

वानोळा

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
16 Oct 2013 - 10:24 am

गूढ धीर गंभीर मेघदळ स्तब्ध अचल का वारा ?
चंचल मन बेभान चिंतनी पहाटेस पट कोरा
रुधिराचे घर विषम स्वरांचे हृदयी अलख चकोरा
अंतर्यामी कल्लोळांचा सागर उसळे खारा

नकोच वाटे पण ना त्यजवे कर्तव्याचा तोरा
आस आंसवे अभिलाषेची गोचिड सम अंगारा
पंख निखळले मिटले डोळे अंध दिशा धांडोळा
ना कळते आकळते मग हा जन्म कसा वानोळा ?

........................अज्ञात

अद्भुतरसकविता

रेडा कायें (म्हणोन) लपविता... ???

बॅटमॅन's picture
बॅटमॅन in जे न देखे रवी...
15 Oct 2013 - 8:45 pm

प्रेरणा खरेतर वेगळे सांगणे न लगे. पण तरीही लिङ्क देतोच.

लिङ्क.

धनाजीरावांनी शिरेस लिहिलेल्या लेखाचे स्मरण करून, धनाजीराव अन बुवा दोघांची माफी मागोन ही कविता सादर केल्या गेली ऐसीजे.

नकळितां न्हाण आलें ग बायें
म्हैसरु झट्या घेवों लागलें ग मायें

म्हैशीसि लागियलें जुगतपिसें
नुमगे मज कैसे हे अपैसें

नेवोनि रेडा जवळी, येर्‍हवीं ओरडा हाकाळोंनि का वो
परिं भादवियाते नलगे, लागतां जुगणियाचा लाहो का वो

जुगतां पहिलेया वारी रेडा लागितां म्हयशीसी
समापणी होतां हरिखे, दाबियलें कैसें तिजशी

कविता