कविता

रागावणे – समजावणे

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
14 Oct 2013 - 11:20 am

........................१.............................
रागवलेली ती, समजूत काढणारा मी
रागवलेला मी, समजूत काढणारी ती
या दोन विरुद्ध गोष्टी आहेत
.
ती रागावली कि
तिची समजूत काढणे सोपे आहे
ते जमते आजकाल मला
पण तिच्यावर रागावून
ती समजूत काढत असतांना
रागावलेलेच राहणे फार अवघड असते
ते अजूनही जमलेले नाही मला
.
कसं असतं ना,
समजूत काढणारा नेहमीच
समजूतदार असतोच असे काही नाही
पण सांगणार कोणाला?

हास्यकविताप्रेमकाव्यमुक्तक

फोल

आतिवास's picture
आतिवास in जे न देखे रवी...
12 Oct 2013 - 2:06 pm

आवर्तनात
भिरभिरताना
एका क्षणी
गेला तोल;

वेळ उथळ
तळ नाही
म्हणून जमेना
बुडी खोल;

कवच बापडे
गळून पडले
आत-बाहेर
उरले फोल.

कविता

गुंता

सार्थबोध's picture
सार्थबोध in जे न देखे रवी...
10 Oct 2013 - 1:31 pm

का उदास, आज वाटे मला
श्वास श्वासात, जीव हा कोंदला ll १ ll

हृद्य आठवांचा, काय हा उमाळा
नेत्रातूनी अश्रूंचा, हाय तोल गेला ll २ ll

विराण स्मृती, करिती मनी गलबला
का दिशा नित्य, गवसेना पाखराला ll ३ ll

जुनाच गुंता, न सोडवी मनाला
मिळे संकेत, असा नव्या वादळाला ll ४ ll

अडकलो पुन्हा, जुन्या कड्या कपारीला
बुजेना चिरा, जो जो मी सांधला ll ५ ll

मागतो आधार, फिरुनी त्या अंबराला
मज दाखवी, नव्याने निरभ्र चांदण्याला ll ६ ll

- सार्थबोध

कविता

पुरावा

सार्थबोध's picture
सार्थबोध in जे न देखे रवी...
9 Oct 2013 - 11:24 am

काही बोलू कशाला, झालेत शब्द आसू
आयुष्य ओघळून गेले, आणि कितीक सोसू ll १ ll

त्यांचे रक्तही बदलले, वागणे असे बेताल
आम्ही तुमच्यातले नाही, आम्हा रंग नका फासू ll २ ll

तुमच्याच दोर हाती, केले विषण्ण जगणे
आमचेच नशीब होते, आम्ही कोणास कोसू ll ३ ll

भरवसा होताच आमचा, शब्दावर माणुसकीच्या
चुकलो; सापडलो आम्ही, नका दुसऱ्यास नासू ll ४ ll

मारून आम्हास तरीही, उजळ तुमचा माथा
नाही बदलणार दुनिया, असे लागले भासू ll ५ ll

कविता

गुन्हा

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
8 Oct 2013 - 1:27 pm

चल एक गुन्हा, दोघे मिळून करूया
आणि मग परत, आपापलं जगूया

पाऊस पडला नाही तरी
आपण मात्र भिजूया
पावसात कोरडे राहण्यापेक्षा
नभालाच फितवूया
.....चल एक गुन्हा, दोघे मिळून करूया

परीघ आहे तुलाही
परीघ आहे मलाही
परीघातच राहून आपापल्या
त्रिज्या थोड्या वाढवूया
.....चल एक गुन्हा दोघे मिळून करूया

किंवा शहारलेल्या चांदण्यात कधी
नुसते बोलत राहूया
खूप वेळ......रात्रभर....
नुसते बोलतंच राहूया
.....चल एक 'सभ्य' गुन्हा, दोघे मिळून करूया

कविता

लागले वेड मज |

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जे न देखे रवी...
8 Oct 2013 - 1:20 pm

चौकार आणि षटकार
चेंडू तो तडीपार।
धावांचा डोंगर ।
शतक रचण्याचे ।
लागले वेड मज।
सचिन म्हणे || १ ||

फायलींचा डोंगर ।
कामाचा बट्याबोळ ।
लाच खोरी, भ्रष्टाचार ।
कितीतरी पैसे खायचे
लागले वेड मज |
मंत्री म्हणे ||२||

दिंडी पताका भजन।
रंगले कीर्तन ।
भान हरपून ।
वाट चाले पंढरी |
भेट द्या हो माउली |
लागले वेड मज |
वारकरी म्हणे ||३||

कविता

अविचल

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
8 Oct 2013 - 10:35 am

पुसू पहातो पुसू शके ना अवकाशातिल मेघ दळे
उचंबळे तळ लाटेवरती अस्पर्शच पण चंद्र खळे
फुटे किनारा व्रण काठावर कातळ अविचल स्वर आदळे
घोंघावे वारा माडातुन वय झालेले गोत गळे

.................... अज्ञात

अद्भुतरसकविता

आज पुन्हा उडावेसे वाटले

पल्लवी मिंड's picture
पल्लवी मिंड in जे न देखे रवी...
7 Oct 2013 - 8:20 pm

आज पुन्हा उडावेसे वाटले
पंखाना जरा विहारावेसे वाटले
दगदग काय रोजचीच
आज उसंतीला चाखावेसे वाटले

घोटभर शांततेसाठी
हे मायाजाल हटवावेसे वाटले
आज पुन्हा उडावेसे वाटले
आकाशात हरवावेसे वाटले

धावपळीत विरघळलेल्या मला
अलगद ओढावेसे वाटले
आज पुन्हा उडावेसे वाटले
नभीचे तरंग वेचावेसे वाटले

विस्मृतित गेलेल्या बालपनाला
परत जगावेसे वाटले
त्या निरगसतेत
झोकून द्यावेसे वाटले

उंचावरच्या जगात
मला आजमावेसे वाटले
अंहपणाचा जप सोडून
आज पुन्हा उडावेसे वाटले

कविता

दोष

सार्थबोध's picture
सार्थबोध in जे न देखे रवी...
4 Oct 2013 - 10:09 am

मिसळलो त्यांच्यात ना मी, पाडले एकटे मला
पाहून संधी; काढून वेळ, दोष लावला मला ll १ ll

दिवसातले डावपेच रात्री, टाकायचे ठरवले तयांनी
रात्र त्यांची चोरली मी, हा दोष लावला मला ll २ ll

सभ्य कृतीत चौर्य, काय लागावी झोप तयांना
स्वप्ने तयांची चोरिली मी, हा दोष लावला मला ll ३ ll

फेडले वागलेले त्यांनी, सोने-पैसा लुप्त झाला
परीस त्यांचा चोरला मी, हा दोष लावला मला ll ४ ll

सजा तयांना द्याया ईश्वरे, योजून धाडिले संकटाला
कृपा ईश्वराची चोरली मी, हा दोष लावला मला ll ५ ll

कविता

व्यथा

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
3 Oct 2013 - 2:38 pm

गरिबीचा आसूड
दुनिया माझी न्हवं,
पायात डोकं
दुमडून घ्यावं .....!

अछुत जीव
मनास ठावं,
क्षुद्र मराण
भाळी ल्यावं .....!

हक्काचं मागणं
घोर जीवा लावं,
शिक्षेच्या झाकोळात
मुजून जावं .....!

आक्रीत करण्यां
मन वेडं धावं,
चाकोरीबाहेर पाऊल
मरणास भ्यावं .....!

आश्रूंभिजल्या भूमीच्या
गंधात न्हावं,
'कर' नभाकडं
मातीत एकरूप व्हावं .....!

श्री. साजीद यासीन पठाण

करुणकविता