चल एक गुन्हा, दोघे मिळून करूया
आणि मग परत, आपापलं जगूया
पाऊस पडला नाही तरी
आपण मात्र भिजूया
पावसात कोरडे राहण्यापेक्षा
नभालाच फितवूया
.....चल एक गुन्हा, दोघे मिळून करूया
परीघ आहे तुलाही
परीघ आहे मलाही
परीघातच राहून आपापल्या
त्रिज्या थोड्या वाढवूया
.....चल एक गुन्हा दोघे मिळून करूया
किंवा शहारलेल्या चांदण्यात कधी
नुसते बोलत राहूया
खूप वेळ......रात्रभर....
नुसते बोलतंच राहूया
.....चल एक 'सभ्य' गुन्हा, दोघे मिळून करूया
आणि नाहीच जमलं काही
तर नजरेनेच सांगूया
अनाहूत या 'वाटण्याचा'
सोहळा साजरा करूया
.....चल एक गुन्हा, आवर्जून करूया
आणि मग परत आपापलं जगूया
प्रतिक्रिया
8 Oct 2013 - 1:39 pm | स्पंदना
परीघ आहे तुलाही
परीघ आहे मलाही
परीघातच राहून आपापल्या
त्रिज्या थोड्या वाढवूया
अंहं!
8 Oct 2013 - 1:48 pm | अत्रुप्त आत्मा
@चाणक्य>>>तुंम्हाला विडंबन केलेलं चालतं का हो!? =))
8 Oct 2013 - 1:52 pm | चाणक्य
जरूर. बाकी ईतकी नम्रता पाहून डोळे पाणावले हो.
8 Oct 2013 - 2:24 pm | अत्रुप्त आत्मा
@नम्रता पाहून डोळे पाणावले हो.> =)) नम्रता नव्हे, नरमता आहे ही! =))
8 Oct 2013 - 2:26 pm | स्पंदना
:)) :))
8 Oct 2013 - 3:19 pm | चाणक्य
अंतु बर्वा मोड ऑन- व्वाह, अहो पुण्याचे तुम्ही. बोलण्यात ऎकणार काय आम्हाला- अंतु बर्वा मोड ऑफ
:-)
8 Oct 2013 - 5:53 pm | तिमा
परीघातच राहून आपापल्या
त्रिज्या थोड्या वाढवूया
परीघातच राहून आपल्या
त्रिज्यांचा व्यास करु या
9 Oct 2013 - 10:59 am | स्पंदना
तिमा!
व्यास आला म्हणजे महाभारत आलं. मग या कवितेच महाकाव्य होणे आलं.
8 Oct 2013 - 3:03 pm | मदनबाण
मस्त !
8 Oct 2013 - 3:17 pm | सस्नेह
पुन्हा पुन्हा करावा असा गुन्हा..
8 Oct 2013 - 3:23 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
व्वाह यासारखे दुसरे सुख कुठले?
चाण्क्य.. सुंदर रचना, पुन्हा पुन्हा वाचावी अशी झालीये...
8 Oct 2013 - 3:29 pm | आतिवास
सुंदर रचना. आवडली.
8 Oct 2013 - 5:31 pm | अग्निकोल्हा
फ्रेकि कुल काव्य !