स्वकीय ?
गर्दी आकांत माझ्या
ओशाळणारे ओठ हलले,
ज्यांनी केले वार
शेवटी धीर देऊन गेले !
वादळातील शरीर माझे
पाहायला तमाशा आले,
केले चौकात उभे ज्यांनी
नजरा उंचावून गेले !
कारणे ऐकवण्या अपयशाची
समीक्षक ते होऊन आले,
देऊन धीर उसना
भुंग्यांनी वासे पोकळ केले !
हूल भरारीची देऊन
बळ वांझोटेच दिले,
माझ्या परस्परच त्यांनी आता
घरटे माझे हिरावून न्हेले !
फुंकर घालण्याचे नाटक
सोद्यांनी हुबेहूब वटवले,
उरात दडवल्या दुःखाची
शेवटी किंमत करून गेले !